सुनेत्रा पवार यांना पहिली महिला उपमुख्यमंत्री म्हणून राज्यपालांकडून शपथ विधिमंडळ पक्षाच्या नेते पदी निवड झाल्यानंतर संध्याकाळी शपथ

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या विधिमंडळ पक्षाच्या गटनेते पदी सुनेत्रा पवार यांनी निवड करण्यात आली. त्यानंतर संध्याकाळी पाच वाजता राजभवनावर झालेल्या छोटेखानी शपथविधी संमारंभात उपमुख्यमंत्री म्हणून सुनेत्रा पवार यांना राज्यपाल आचार्य देवव्रत यांनी शपथ दिली.

मागील काही वर्षापासून पुरोगामी महाराष्ट्रात पहिली महिला मुख्यमंत्री पदी कधी विराजमान होणार असा सवाल उपस्थित करण्यात येत होता. मात्र उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती निधनामुळे त्यांच्या ठिकाणी त्यांच्याच पत्नी सुनेत्रा पवार यांची नियुक्ती करण्यात आली. त्यामुळे अशा दुःखद घटनेच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री नाही पण पहिली महिला उपमुख्यमंत्री झाल्याचे चित्र पाह्यला मिळालं.

यावेळी राजभवनात सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेताच अजित पवार अमर रहे. एकच वादा अजित दादा यासारख्या घोषणा राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांकडून राजभवनातच दिल्या. या शपथविधी सोहळ्याला सुनेत्रा पवार यांचे भाऊ तथा शरद पवार यांचे एकेकाळचे मंत्रीमंडळातील सहकारी डॉ पद्मसिंह पाटील, भाचे तथा आमदार राणा जगजीत सिंह आदी उपस्थित होते.

About Editor

Check Also

बारामती आणि राहुरी पोटनिवडणुकीसाठी भाजपाचे स्टार प्रचारक जाहीर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह ४० नेत्यांचा समावेश

बारामती आणि राहुरी विधानसभा मतदारसंघांमध्ये होणाऱ्या पोटनिवडणुकांच्या प्रचारासाठी भाजपाच्या केंद्रीय कार्यालयाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *