Breaking News

सुप्रिया सुळे यांचा आरोप, आधी आरोप नंतर पक्षात प्रवेश ही भाजपाची स्टाइल सत्ता आणण्यासाठी गलिच्छ राजकारण केलं जातयं

माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर लावण्यात आलेले आरोपामधील एकही आरोप सिद्ध झालेला नाही. मात्र ऐन निवडणुकीच्या तोंडावर हे पत्र आरोप प्रत्यारोप कसे काय येते असा सवाल खासदार सुप्रिया सुळे यांनी विचारला.

सुप्रिया सुळे पुढे बोलताना म्हणाल्या की, या पत्राची वेळ बघा, विधासभेच्या निवडणुका दोन महिन्यावर आल्या आहेत. इतके वर्षे गल्लीपासून दिल्लीपर्यंत यांची सत्ता आहे. गेली दहा वर्षे यांची सत्ता आहे. या गोष्टी आताच कशा काय येतात? गेली अडीच वर्षे त्यांचे सरकार महाराष्ट्रात आहे. बरोबर विधानसभेआधीच हे पत्र, आरोप-प्रत्यारोप कसे काय येतात? अशी प्रश्नांची सरबती भाजपावर केली.

पुढे बोलताना सुप्रिया सुळे पुढे बोलताना म्हणाल्या की, अनिल देशमुख यांच्या विरोधात जे आरोप करण्यात आले, यातील एकही आरोप सिद्ध झालेला नाही. ते सगळे खोट ठरलेले आहे. १०० कोटी आरोपाचे काही झालेले नाही. त्यामुळे आता दुसऱ्या कोणाची यात नाव येणं म्हणजे मला आता हे सगळे बालिशपणाचे वाटत आहे अशी टीकाही यावेळी केली.

सुप्रिया सुळे पुढे बोलताना म्हणाल्या की, महाराष्ट्राचं राजकारण गलिच्छ झाले आहे, बालिशपणाचे आरोप केले जात आहेत. आमचा पक्ष सुसंस्कृत आहे. गलिच्छ गोष्टी आम्ही कधी केल्या नाहीत. भाजपाची स्टाइल आहे ही आधी आरोप करायचे नंतर त्यांनाच आपल्या पक्षात घ्यायचे. पत्र कोणी लिहिलंय? कधी लिहिलंय? मीही उद्या पत्र लिहून आरोप करेन, असं नसतं आयुष्य खूप सिरिअस आहे. आम्ही कधीही खोटे आरोप करत नाही. आम्ही बदल करण्यासाठी राजकारणात आल्याचंही यावेळी सांगितले.

पुढे बोलताना सुप्रिया सुळे म्हणाल्या की, संजय राऊत, छगन भुजबळ, हसन मुश्रीफ या सर्व नेत्यांना त्यांनी किती त्रास दिला, ते पाहिलं आहे, भारतीय जनता पार्टीने ज्या १२ लोकांवर आरोप केले होते ते आज कुठे आहेत. आजचे राजकारण खूप गलिच्छ झाले आहे. निवडणुकीच्या तोंडावर हे बाहेर आले आहे. निवडणुकीच्या आधी पत्र आणि नाव त्यांनी का घेतलं असा सवालही यावेळी केला.

सुप्रिया सुळे पुढे बोलताना म्हणाल्या की, महाराष्ट्राची आर्थिक परिस्थिती, धोरणे, महागाई बेरोजगारी, भ्रष्टाचार यांवर लक्ष देणे गरजेचे आहे. आम्ही कधीच कोणावर आरोप केले नाहीत. आरोप केलेले ते शंभर कोटी कुठे आहेत. मग आरोप खोटा ठरला ना, असा खोचक सवालही यावेळी केला.

पुढे बोलताना सुप्रिया सुळे म्हणाल्या की, महाराष्ट्राची आर्थिक परिस्थिती आणि महाराष्ट्रात वाढणारी बेरोजगारीची परिस्थिती यावरही कोणीतरी बोललं पाहिजे. पण त्यावर कोणीही बोलत नाही. भ्रष्ट्राचार झाकण्यासाठी भाजपाचं वॉशिंग मशीन आहे. आम्ही यशवंतराव चव्हाण यांच्या विचारावर चालणारे लोक आहेत. कोणाचा बदला घेण्यासाठी किंवा अशा प्रकारचं गलिच्छ राजकारण आम्ही कधी करत नाहीत आणि पुढेही कधी करणार नाही. अशा प्रकारचे आरोप आम्ही कधीही कोणावरही केले नसल्याचे यावेळी सांगितले.

Check Also

भाजपा सोलापूरातील एका आमदाराला घरी बसविणार वाढत्या असंतोषाच्या पार्श्वभूमीवर भाजपामध्ये खलबतं सुरु

आगामी विधानसभा निवडणूकांच्या पार्श्वभूमीवर सत्ताधारी महायुतीतील प्रमुख घटक पक्ष असलेल्या भाजपाकडून पुन्हा सत्तेत येण्याच्या अनुषंगाने …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *