देवेंद्र फडणवीस यांचा टोला, मविआ सरकार नेहमीच उशीरा जागे होते म्हणून… ओबीसी आरक्षणावरून मुख्यमंत्री आणि ओबीसी मंत्र्यांना टोला

राज्यात सध्या ओबीसींचे गेलेले आरक्षण परत मिळविण्यासाठी जो काही इम्पिरिकल डेटा गोळा करायचे काम सुरु आहे. ते काम अंत्यत चुकीच्या आणि सदोष पध्दतीने होत असल्याचा गंभीर आरोप विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडी सरकारवर करत आपले सरकार नेहमीच उशीराने जागे होते. म्हणून मी आताच त्यांना जागे करत असल्याचा उपरोधिक टोलाही त्यांनी लगावला.

तसेच अशा सदोष पध्दतीने डेटा गोळा करण्याचा परिणाम ओबीसी समाजावर होईल असा इशाराही त्यांनी सरकारला दिला.

सागर या आपल्या शासकिय निवासस्थानी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी त्यांच्यासोबत प्रविण दरेकर, प्रसाद लाड आदी उपस्थित होते.

एक सारखी आडनावे ही अनेक समाजात आहेत. मात्र आडनावावरून तो कोणत्या समाजाचा आहे हे निश्चित करता येत नाही. तसेच ओबीसीच्या सर्व्हेक्षण हे सध्या फोन करून विचारून केले जात आहे. अशा पध्दतीचा सर्व्हेमुळे ओबीसींची संख्या मोठ्या प्रमाणावर घटलेली दिसून येईल अशी भीती व्यक्त करत राज्यातील सरकारला नेहमीच उशीराने जाग येते. त्यामुळे सरकारला आताच जागे करू इच्छितो की असाच सर्व्हे सुरु राहील्यास ओबीसींची संख्या मोठ्या प्रमाणावर घटलेली दिसेल आणि त्याचा परिणाम ओबीसींच्या आरक्षणावर होईल अशी भीतीही त्यांनी यावेळी व्यक्त केली.

या सर्व्हेक्षणात जिल्हानिहाय ओबीसींची चुकीची आकडेवारी लिहिली जात आहे. यामुळे नाराजी उफाळून येईल असा इशारा देत मध्य प्रदेश सरकारने सर्वोच्च न्यायालयात सादर केलेला अहवाल मान्य केला. त्यासंदर्भात मी तेथील मुख्यमंत्र्यांची चर्चा केली. त्यावेळी त्यांनी मला सांगितले की, आम्ही जिल्हानिहाय ओबीसींची माहिती गोळा केली आणि ती माहिती त्यांनी न्याायलयात सादर केली. मात्र आपल्या येथे माहिती फोनवरून गोळा केली जात आहे. याचा परिणाम अन्य समाजाच्या आरक्षणावर परिणाम होईल अशी भीती व्यक्त करत सरकार जर या गोष्टीकडे लक्ष देणार नसेल तर मला माझी माहिती घेवून उतरावे लागेल असा इशाराही त्यांनी यावेळी दिला.

About Editor

Check Also

आकाश फुंडकर यांची माहिती, स्थानिक माथाडी भूमिपुत्रांना रोजगारात प्राधान्य द्या भारत पेट्रोलियम कार्पोरेशन आस्थापनेत माथाडी कामगारांना काम

राज्यात कुठल्याही आस्थापनेत माथाडी कामगारांची आवश्यकता असल्यास त्या ठिकाणी स्थानिक माथाडी भूमिपुत्र असलेल्या कामगारांना रोजगारात …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *