विधान परिषदेच्या नवनिर्वाचित ११ आमदारांचा शपथविधी सोहळा संपन्न उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी नवनिर्वाचित सदस्यांना दिली शपथ

विधान परिषदेच्या ११ जागांसाठी १२ जुलै रोजी मतदान पार पडले होते. या निवडणुकीमध्ये निवडून आलेल्या सर्व सदस्यांना उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी यावेळी शपथ दिली.

यामध्ये पंकजा मुंडे, सदाभाऊ खोत, परिणय फुके, भावना गवळी, कृपाल तुमाने, योगेश टिळेकर, डॉ. प्रज्ञा सातव, शिवाजीराव गर्जे, अमित गोरखे, मिलिंद नार्वेकर, राजेश विटेकर या ११ सदस्यांनी शपथ घेतली.

विधान भवनातील सेंट्रल हॉलमध्ये हा शपथविधीचा कार्यक्रम पार पडला. यावेळी उपसभापती डॉ. गोऱ्हे यांनी सर्व नवनिर्वाचित विधानपरिषद सदस्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.

About Editor

Check Also

नरहरी झिरवाळ यांची माहिती, ‘ब्लिंकइट’द्वारे कालबाह्य अन्न वितरण प्रकरणात कंपनीवर कारवाई विधानसभेत भीमराव तापकीर यांच्या प्रश्नाला उत्तर देताना माहिती

पुणे शहरात ब्लिंकइट या ऑनलाईन अन्न वितरण सेवेच्या माध्यमातून कालबाह्य खाद्य पदार्थांचे वितरण होत असल्याबाबत …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *