Mantralay
Mantralaya

६ वर्षे झालेल्या अधिकारी-कर्मचाऱ्याची बदली करा, आधीच पर्यायी नियुक्तीही करा सामान्य प्रशासन विभागाच्या अप्पर मुख्य सचिवांचे सर्व विभागांना आदेश

मंत्रालयातील सामान्य प्रशासन विभागाच्या अप्पर मुख्य सचिव व्ही राधा यांनी सर्व विभागाच्या आस्थापना आणि सामान्य प्रशासन विभागाच्या आस्थापनेस निर्देश देत सर्व विभागातील सहसचिव, उपसचिव, अवर सचिव, कक्ष अधिकारी आणि सहायक कक्ष अधिकारी, कक्ष अधिकारी, लिपिक-टंकलेखक व लघुलेखक यांच्या बदल्या एप्रिल-मे २०२६ करण्यात येणार आहे. मात्र या बदल्यांची कार्यवाही पूर्ण करण्याचे आदेश एका पत्रान्वये जारी करण्यात आले आहे.

या पत्रात अप्पर मुख्य सचिव व्ही राधा म्हणाल्या की, मागील अनेक वर्षापासून अधिकारी-कर्मचाऱ्यांची बदली केल्यानंतर त्यांच्या बदलीस मुदत वाढ देण्याची मागणी-बदली रद्द करण्याची मागणी संबधित प्रशासकीय विभाग करतात. त्यामुळे बदली झालेल्या अधिकारी-कर्मचाऱ्यास विभागाने कार्यमुक्त न केल्याने प्रशासकीय अडचणी निर्माण होत असल्याची बाब निदर्शनास आणून देण्यात आली आहे.

पुढे पत्राद्वारे अप्पर मुख्य सचिव व्ही राधा म्हणाल्या की, बदली अधिनियमानुसार बदल्यांची काटेकोरपणे अंमलबजावणी होणे गरजेचे आहे. त्यामुळे सन २०२६ च्या सार्वत्रिक बदल्यांमध्ये आपल्या विभागातील जे अधिकारी-कर्मचारी बदलीस पात्र आहेत. त्यांनी यादी करून त्यांच्या जागी पर्यायी अधिकारी-कर्मचारी यांची व्यवस्था करण्याची कार्यवाही आतापासून करण्याची कार्यवाही आतापासून सुरु करण्यात यावी. जेणेकरून बदली झालेल्या अधिकारी-कर्मचाऱ्यांना कार्यमुक्त केल्यानंतर आपल्या विभागातील कामकाज सुरळीतपणे पार पाडण्यात अडचण निर्माण होणार नाही असेही या आदेशात सांगण्यात आले आहे.

हेच ते पत्र वजा आदेश

About Editor

Check Also

Nagpur Blast

मुख्यमंत्री फडणवीस यांची माहिती, स्फोटक कारखान्यांसाठी नियमांमध्ये सुधारणासाठी केंद्राकडे निवेदन स्फोटक कारखान्यातील अपघात टाळण्यासाठी प्रक्रिया ऑटोमेशनवर भर

स्फोटक पदार्थ हाताळण्याच्या प्रक्रियेत ऑटोमेशनवर आधारित उपाययोजना करणे अत्यंत आवश्यक आहे. यामुळे मानवी हस्तक्षेप कमी …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *