उदयनराजे भोसलेंचा ८३ हजाराने लोकसभा पोटनिवडणूकीत पराभव माजी राज्यपाल श्रीनिवास पाटील ४ लाख ८३ हजार मतांनी विजयी

मुंबईः प्रतिनिधी
सातारचे खासदार उदयनराजे भोसले यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमधून भाजपात प्रवेश करत पोटनिवडणूक लढविली. मात्र त्यांच्या या पक्षप्रवेशाने नाराज झालेल्या सातारकरांनी उदयनराजेंना पराभव करत राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत राष्ट्रवादीचे उमेदवार श्रीनिवास पाटील यांना विजयी केले.
या पोटनिवडणूकीत श्रीनिवास पाटील यांना ४ लाख ८२ हजार ९४७ मते मिळाली. तर भाजपाचे उदयनराजे भोसले यांना ४ लाख ७४४ मते मिळाली. उदयनराजेंना मिळालेल्या मतांपेक्षा जास्तीची ८२ हजार ९४७ मते श्रीनिवास पाटील यांना मिळाल्याने ते विजयी ठरले.

About Editor

Check Also

मंत्रालयाला लागून नव्या इमारतीत, बाहेरचे विभाग आणि राज्यमंत्र्यांना मिळाली जागा आरोग्य व वैद्यकीय शिक्षण विभाग एकाच इमारतीत, प्रशासकीय कामकाज अधिक सुटसुटीत होणार

महाराष्ट्र सरकारच्या मंत्र्यांना आणि विभागांना मंत्रालयाच्या मुख्य आणि अनेक्स इमारतीत जागा कमी पडत असल्याने गार्डन …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *