Breaking News

उद्धव ठाकरे यांचे आवाहन, …उद्याची सकाळ उजडली तरी मतदान कराच

मुंबई आणि एमएमआर परिसरातील अनेक मतदान केंद्रांवर वेळेत मतदानाची प्रक्रिया पार पाडली जात नाही. त्यामुळे अनेक मतदार हे मतदान केंद्रावर वेळ लागत असल्याने मतदान न करताच परतत आहेत अशा तक्रारी सातत्याने येत आहेत. हा वेळ जेणेकरून मतदारांनी मतदानच करू नये यासाठी जाणीवपूर्वक करण्यात येत आहे. तर माझे मतदारांना आवाहन आहे की, वेळ संपण्याच्या आत मतदान केंद्रावर जा आणि उद्याची सकाळ झाली तरी मतदान केल्याशिवाय मतदान केंद्रावरून परतू नका असे आवाहन शिवसेना उबाठा गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज केले.

लोकसभा निवडणूकीच्या पाचव्या अर्थात महाराष्ट्रातील शेवटच्या टप्प्यातील १३ लोकसभा मतदारसंघात मतदान पार पडत आहे. मात्र मुंबईतील अनेक लोकसभा मतदारसंघात मतदान केंद्रावर आलेल्या नागरिकांचे मतदान वेळेत पूर्ण करून घेण्यात येत नाही. त्यामुळे अनेक मतदार मतदान न करताच परत माघारी फिरत असल्याचे चित्र अनेक मतदान केंद्रावर दिसून येत होते. तर संध्याकाळी वातावरणातील उष्माची तीव्रता कमी झाल्यानंतर अनेक मतदान केंद्राबाहेर मतदानासाठी मतदान केंद्राबाहेरही भल्या मोठ्या रांगा लागल्याचे चित्र पाह्यला मिळत होते. तर दुसऱ्याबाजूला मतदान केंद्रांमधून वेळत मतदानाची प्रक्रिया पार पाडली जात नसल्याचे दिसून येत होते. या कमी मतदानाचा फटका शिवसेना उबाठा गटाच्या आणि काँग्रेसच्या उमेदवारांना बसण्याची शक्यता अधिक आहे. त्यामुळे मतदानासाठी नागरिकांनी मतदान केंद्रावर जाऊन मतदान करावे यासाठी सातत्याने आवाहन करण्यता येत आहे.

https://x.com/ShivSenaUBT_/status/1792539553921933429

उद्धव ठाकरे पुढे बोलताना म्हणाले की, काहीही झाले तरी मतदारांनी आपला हक्क बजाविण्यासाठी मतदान केंद्रावर पोहोचावे आणि मतदानाचा हक्क बजावल्यानंतरच परत आपल्या घरी जा. जरी मतदानाची वेळ संपली असली तरी रांगेतील प्रत्येकाचे मतदान झाल्याशिवाय मतदान केंद्र बंद करता येत नाही. तसेच मतदानाच्या रांगेत उभे राहिल्यानंतरही जरी मतदानासाठी तुमचा नंबर दुसऱ्या दिवशी सकाळी ६-७ वाजता आला तरी मतदारांनी जाऊन मतदान करावे. लाईनमधील प्रत्येकाचे मतदान नोंदवून घेतल्याशिवाय मतदान केंद्र बंद करता येत नाही. जर मतदारांचे मत नोंदवून न घेतल्यास आम्ही वेळप्रसंगी न्यायालयाचे दार ठोठाऊ असा इशाराही केंद्रीय निवडणूक आयोगाला दिला.

Check Also

भाजपा सोलापूरातील एका आमदाराला घरी बसविणार वाढत्या असंतोषाच्या पार्श्वभूमीवर भाजपामध्ये खलबतं सुरु

आगामी विधानसभा निवडणूकांच्या पार्श्वभूमीवर सत्ताधारी महायुतीतील प्रमुख घटक पक्ष असलेल्या भाजपाकडून पुन्हा सत्तेत येण्याच्या अनुषंगाने …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *