Breaking News

उद्धव ठाकरे यांची घोषणा, मी स्वतः तोंडाला काळी फित लावू बसणार जी तत्परता दाखविली, तशी न्याय देण्यातही दाखवा

बदलापुर अत्याचार प्रकरण दडपण्याचा प्रकाराच्या निषेधार्थ महाविकास आघाडीने महाराष्ट्र बंद ची हाक दिली. परंतु राज्यातील महायुती सरकारला धडकी भरताच सरकार पुरस्कृत लोकांनी उच्च न्यायालयात धाव घेत याचिका दाखल केली. त्यावर उच्च न्यायालयाने कोणत्याही राजकिय पक्षाला बंद करण्याचा अधिकार नाही असा निकाल दिला. त्यावर उद्धव ठाकरे यांनी तिखट प्रतिक्रिया व्यक्त करत आपल्या भूमिका मांडली.

शिवसेना उबाठाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी उद्या होणारा बंद मागे घेतला असून बंद मागे घेण्याच्या बाबतील न्यायालयाने जेवढी तत्परता दाखविली तशीच तत्परता या प्रकरणी न्याय देण्यासंबधात दाखवावी अशा खोचक शब्दात ठाकरे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.

पुढे बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले की, उच्च न्यायालयाच्या विरोधात सर्वोच्च न्यायालयात जाता आलं असतं मात्र पुरेसा वेळ नाही. आम्ही बंद करा म्हणजे तोडफोड करा बेकायदेशीर पणे काही करा असे काही नव्हतं सांगितलं पण उत्फुर्तपणे बंद करा, शांततेने बंद करा असं आवाहन केलं होते. त्याला आता तुम्ही मनाई केली तर तोंडं बंद करून बसतो. मात्र राज्यातील अत्याचारा विरोधातले आंदोलन थांबणार नाही असा इशाराही यावेळी जाहिर केले.

उद्धव ठाकरे पुढे बोलताना म्हणाले की, राज्यघटनेने दिलेल्या फ्रिडम एक्सप्रेशन या कलमाखाली मी स्वतः शिवसेना भवनाजवळील चौकात तोंडाला काळ्या फिती लावून आणि काळे झेंडे घेऊन आंदोलन करणार असून त्यास कोणाचा आक्षेप असण्याचे कारण नाही. त्यास तर कायद्याचीच मान्यता आहे असे सांगत शिवसैनिकांनीही त्यांच्या त्यांच्या जिल्हा शहरातील मुख्य चौकात तोंडाला काळ्या फिती लावत काळे झेंडे धरत शांततेत आंदोलन करावे, असे आवाहनही यावेळी केले.

\गुणरत्न सदावर्ते यांच्यावर उपरोधिक टीका करताना उद्धव ठाकरे म्हणाले की, आमच्या बंद विरोधात जे कोणी न्यायालयात गेले जे कोणी याचिकाकर्ते आहेत त्यांच्यावर या अत्याचाराची जबाबदारी आहे. यातील पिडीतेला न्याय देण्यासाठी त्यांनी प्रयत्न करावेत असा खोचक सल्ला देत सदावर्ते यांचे नाव न घेता दिला.

शेवटी बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले की, बंद करायचा नाही, संप करायचा नाही केला तर ते बेकायदेशीर ठरविले जात असेल तर मग अशा प्रसंगी लोकशाहीत कोणत्या पद्धतीने व्यक्त होण्यासाठी काय करावे लागेल म्हणजे त्याला मान्यता मिळेल असा उपरोधिक सवाल केला.

 

Check Also

छगन भुजबळ यांचा आरोप, जरांगेच्या मागे राजेश टोपे आणि रोहित पवार… राजेश टोपे यांचा बोलण्यास नकार

राज्यातील आगामी विधानसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर मराठा आरक्षण समर्थक आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी भाजपा प्रणित …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *