उद्धव ठाकरे यांचा टोला, काल झालेला स्फोट चार दिवस आधी झाला असता तर… मतमोजणीच्या एक दिवस आधीच भाजपाचा पदाधिकारी शिवसेना उबाठात

पंतप्रधान नरेद्र मोदी यांचे मित्र उद्योगपती गौतम अदानी यांच्या विरोधात अमेरिकन न्यायालयाने भारतीय अधिकाऱ्यांना लाच दिल्याच्या प्रकरणावरून अटक वॉरंट अमेरिकन न्यायालयाने काढले. त्यावरून देशाच्या राजकारणात एकच खळबळ उडाली. या प्रकरणावरून काँग्रेससह अनेक विरोधी पक्षांकडून याप्रकरणी गौतम अदानी आणि भाजपावर टीका केली.

याप्रकरणाला जवळपास दोन तीन दिवसाचा कालावधी उलटून गेल्यानंतर शिवसेना उबाठाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी याप्रकरणी टीकास्त्र सोडत काल जो झाला स्फोट झाला तो जर स्फोट चार दिवस आधी झाला असता तर आणखी एक स्फोट झाला असता असे सांगत भाजपावर अप्रत्यक्षपणे टीका केली.

विशेष म्हणजे उद्या मतमोजणी होणार असून या मतमोजणीच्या एक दिवस आधीच मुंबई भाजपाचे सचिव सचिन शिंदे यांनी आज त्यांच्या समर्थक कार्यकर्त्यांसह शिवसेना उबाठात प्रवेश केला. यावेळी शिवसेना उबाठाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते.

यावेळी बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले की, काल परवा जो काही अमेरिकन न्यायालयाकडून स्फोट करण्यात आला. तो स्फोट जर चार दिवस झाला असता तर विधानसभा निवडणूकीच्या निमित्ताने आणखी स्फोट झाला असता. ज्या घोटाळेबाजाचा स्फोट झाला. त्यानं संपूर्ण जग हादरलं. त्या घोटाळेबाजाचं करायचं काय. त्याचबरोबर काल विरारमध्ये एक बॉम्ब फुटला. तो सगळ्या महाराष्ट्रानं आणि देशानं पाहिलं. उद्या मतमोजणी असल्याने उद्या जो काही बॉम्ब फुटणार आहे तो फुटणारच आहे. पण अमेरिकेत स्फोट झाला. त्याने मात्र संपूर्ण जग हादरलं. त्यामुळे हाच जो बॉम्ब काल फुटला तो चार दिवस फुटायला पाहिजे होता अशी टीकाही यावेळी केली.

दरम्यान, निवडणूकीच्या मतमोजणीच्या एक दिवस आधी भाजपाचे सचिन शिंदे यांनी शिवसेना उबाठात प्रवेश करत असल्याचे यावेळी जाहिर केले. त्यावर बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले की, राजकारण करताना आपणं फक्त आपलंच न पाहता समाजातील इतरांनाही देतो त्या राजकारणात सचिन शिंदे यांना योग्य ते स्थान देऊ असे आश्वासनही यावेळी दिले.

About Editor

Check Also

हर्षवर्धन सपकाळ यांचा आरोप, अशोक खरात महाराष्ट्राचा ‘आसाराम बापू’, खरातला कोणाचा राजकीय आशिर्वाद? राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष भोंदूबाबाच्या पाद्यपुजा करतात हेच पुरोगामी महाराष्ट्राचे दुर्दैव, रुपाली चाकणकरांची हकालपट्टी करा

नाशिकमधील भोंदूबाबा अशोक खरातला पोलिसांनी बेड्या ठोकल्या ते बरेच झाले पण हा भोंदूबाबा महाराष्ट्राचा आसाराम …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *