Breaking News

उद्धव ठाकरे यांचा टोला, मोहन भागवतजी बोलले पण एक वर्ष उशीराने बोलले आता तरी पंतप्रधान अद्यापही जळत असलेल्या मणिपूरला जाणार की नाही

लोकसभा निवडणूकीपूर्वी मणिपूरमध्ये उसळलेला हिंसाचार हा काही केल्या शांत व्हायला तयार नाही. तिकडे अद्यापही पंतप्रधान नरेंद्र मोदी हे गेलेले नाहीत. त्यावर राष्ट्रीय स्वंयसेवक संघाचे प्रमुख मोहन भागवतजी बोलले तरी खरे पण एक वर्षाने बोलले. मग आता तरी पंतप्रधान नरेंद्र मोदी जळत असलेल्या मणिपूरला जाणार की नाही असा सवाल शिवसेना उबाठा गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी केला.

विधान परिषदेच्या मुंबई पदवीधर मतदारसंघातून शिवसेना उबाठा गटाकडून पदवीधर मतदारसंघातून उमेदवारी अॅड अनिल परब यांना देण्यात आली. त्याच्या संकल्प पत्राचे लोकर्पण जाहिर केल्यानंतर उद्धव ठाकरे हे बोलत होते. यावेळी आमदार आदित्य ठाकरे हे ही उपस्थित होते.

यावेळी पुढे बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले की, नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणूकीत आणि तत्पूर्वी ३७० कलम आम्ही हटविले म्हणून सातत्याने अबकी बार…वाले सातत्याने देशभरातन सांगत होते. पण ३७० हटविण्यापूर्वीही तेथील स्थानिक नागरिकांचे प्राण जातच होते आताही तेथील नागरिकांचे प्राण जातच आहेत. मात्र ३७० हटविल्याचे सांगणारे मात्र आम्ही तिसऱ्यांदा सरकार स्थापन केले म्हणून सांगण्यात व्यस्त आहेत असा खोचक टीकाही केली.

उद्धव ठाकरे पुढे म्हणाले की, नुकतेच मागील तीन दिवसांपासून काश्मीरमध्ये सलग तीनदा हल्ले झाले. मात्र तिथेही पंतप्रधान जाणार नाहीत का असा सवाल करत एकाबाजूला मणिपूर जळत आहे, तर दुसऱ्या बाजूला पुन्हा एकदा जम्मू काश्मीर पेटतेय मग तिथेही पंतप्रधान मोदी जाणार नाहीत का असा सवालही करत फक्त या राज्यातील सरकार स्थापनेच्या कार्यक्रमाला जाणार, त्या राज्यातील सरकार स्थापनेच्या कार्यक्रमाला जाणार असा उपरोधिक टोला लगावत सत्तेत बसल्यानंतर देशासमोरील समस्या संपविणार की देशातील इथल्याच नागरिकांचे राजकिय पक्ष संपविण्यात सगळा वेळ घालविणार असा खोचक टोलाही यावेळी लगावला.

तसेच उद्धव ठाकरे शेवटी म्हणाले की, आम्हाला कोणत्या राज्यात कोणाचे सरकार एनडीएचे सरकार की भाजपाचे सरकार स्थापन झाले याच्याशी काहीही देणेघेणे नाही. मला देशातील नागरिकाच्या समस्या सोडविण्यात आणि संपविण्यात आम्हाला रस आहे असेही यावेळी सांगितले.

याशिवाय विधान परिषदेच्या निवडणूकीत काँग्रेसने संपर्क करण्याचा प्रयत्न केला. मात्र तुमच्याशी संपर्क होऊ शकत नाही असे सांगण्यात येत असल्याबाबत विचारले असता उद्धव ठाकरे म्हणाले की, काही वेळा दूत मिस कम्युनिकेशन होत असते. पण यासंदर्भात आम्ही योग्य काय तो निर्णय घेऊन त्याची माहिती तुमच्यासमोर ठेवू. त्याचबरोबर आमची आघाडी, युतीत ठरल्याप्रमाणे आम्ही आमची भूमिका पार पाडू अशी ग्वाहीही यावेळी दिली.

 

 

Check Also

पैठण, गंगापूर येथे जिल्हा अतिरिक्त न्यायालय हिंगोली स्वतंत्र न्यायिक जिल्हा परभणी आणि हिंगोली या जिल्ह्यांचे न्यायिक काम परभणीतून

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पैठण व गंगापूर येथे जिल्हा अतिरिक्त सत्र न्यायालय तसेच हिंगोली स्वतंत्र न्यायिक …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *