वंचित बहुजन आघाडी म्हणते, आमची शिवसेनेशी युती, मविआने जागावाटप…

जवळपास सहा महिन्यापासून वंचित बहुजन आघाडीकडून महाविकास आघाडीत सहभागी करून घ्यावे यावरून शिवसेना उबाठा, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसबरोबर चर्चा करण्याचा प्रयत्न करत आहे. तसेच वंचितने काँग्रेसला पत्र पाठवून सहभागी करून घेण्याबाबत पत्रही लिहिले. त्यास काँग्रेसकडून अद्याप कोणताही प्रतिसाद मिळालेला नाही. त्यातच शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांनी वंचित बहुजन आघाडीचा समावेश महाविकास आघाडीत करण्याबाबत काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांशी चर्चा केल्याचे जाहिर केले. मात्र काँग्रेसकडून अद्याप कोणताच प्रतिसाद मिळत नसल्याने वंचितच्या सहभागाविषयी प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. या सगळ्या पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडीचे प्रवक्त सिद्धार्थ मोकळे यांनी एक प्रसिध्दी पत्रक जाहिर करत म्हणाले की, आमची युती शिवसेनेशी महाविकास आघाडीने परस्पर जागावाटपाबाबत चर्चा करावी असे सांगत जागा वाटपाच्या फॉर्म्युल्यातून माघार घेतल्याचे अप्रत्यक्ष सांगितले.

सिद्धार्थ मोकळे पुढे म्हणाले की, वंचित बहुजन आघाडीला अद्याप महाविकास आघाडी किंवा I.N.D.I.A मध्ये आमंत्रित करण्यात आलेले नाही. मात्र शिवसेना पक्ष महाविकास आघाडी आणि I.N.D.I.A चा घटक पक्ष आहे. अशा परिस्थितीमध्ये जोवर महाविकास आघाडीच्या तिन्ही घटक पक्षांचे आपापसात जागावाटप होत नाही तोवर शिवसेनेच्या वाट्याला किती आणि कोणत्या जागा आल्या हे स्पष्ट होणार नाही. आणि हे स्पष्ट होत नाही तोवर आम्हाला शिवसेनेबरोबर जागा वाटप करता येणार नाही अशी अडचण असल्याचेही सांगितले.

तसेच पुढे बोलताना सिद्धार्थ मोकळे म्हणाले की, आम्हाला I.N.D.I.A मध्ये आमंत्रित करीत नसले तरी किमान महाराष्ट्रातील काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना या तिन्ही पक्षांनी आपापसात जागावाटप करावी जेणे करून वंचित बहुजन आघाडी आणि शिवसेनेला आपसात जागावाटप करण्याचा मार्ग मोकळा होईल अशी भूमिका आम्ही अनेकदा मांडली आहे. मात्र अद्याप या तीन पक्षात जागावाटपाची बोलणी झाली नसल्याचे समोर आले आहे. त्यामुळे शिवसेना आणि वंचित बहुजन आघाडीच्या प्रतिनिधी मध्ये झालेल्या बैठकीत ही भूमिका घेण्यात आली की आधी या तीन पक्षांनी आपापसात जागावाटप करावे मगच शिवसेना आणि वंचित बहुजन आघाडी मध्ये जागावाटपाची चर्चा करता येईल असेही स्पष्ट केले.

About Editor

Check Also

प्रताप सरनाईक यांची माहिती, परवानाधारक रिक्षा व टॅक्सी चालकांसाठी १ मे पासून मराठी भाषा आवश्यक अन्यथा लायसन्स इश्यू करणाऱ्या अधिकाऱ्यावर आणि चालकावर कारवाई करणार

येत्या १ मे, महाराष्ट्र दिनापासून परवानाधारक रिक्षा व टॅक्सी चालकांना मराठी भाषा येणे आवश्यक करण्यात …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *