Breaking News

विजय वडेट्टीवार यांचे आव्हान, …कोणाला फाशी दिली त्याचे नाव जाहिर करा खुद्द मुख्यमंत्र्यांकडून फेक नॅरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न

राज्यात वाढत्या लैंगिक अत्याचाराच्या घटनांवरून संतापाची लाट उसळलेली असताना दुसरीकडे मुख्यमंत्री मात्र भर सभेत खुलेआम जनतेशी खोटं बोलून स्वतःची पाठ स्वतःच थोपटून घेत आहेत. खुद्द मुख्यमंत्रीच दोन महिन्यात एका आरोपीला फाशी दिल्याचे सांगत फेक नरेटीव्ह सेट करत आहेत. पराभवाच्या चिंतेने ग्रासल्यानेच फेकू सरकारच्या नेत्यांची फेकाफेकी सुरु असल्याची सांगत विधानसभा विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी महायुतीच्या नेत्यांची पोलखोल केली. त्याचबरोबर दोन महिन्यात कोणाला फाशी दिली त्याचे नाव मुख्यमंत्र्यांनी जाहीर करावे, असे आव्हानही यावेळी विजय वडेट्टीवार यांनी दिले.

विजय वडेट्टीवार म्हणाले की, बलात्काराचा गुन्हा असलेल्या आरोपीला दोन महिन्यात फाशी दिली, असं भर सभेत सांगून मुख्यमंत्री धडधडीत खोट बोलतात? मुख्यमंत्र्यांनी सांगावं महायुती सरकारच्या काळात दोन महिन्यात कोणत्या आरोपीला फाशी दिली? महायुती सरकार आल्यापासून बलात्कारी तर सोडा, इतर कोणत्या प्रकरणातील आरोपीला दोन महिन्यात फाशी झाली? त्या आरोपींची नावं मुख्यमंत्र्यांनी जाहीर करावीत असे आव्हानही यावेळी दिले.

हे महाविनाशी सरकार आल्यावर फक्त एसआयटीची स्थापना होते, त्याचा अहवाल येतो का, कारवाई होते का? असा सवाल उपस्थित करत विजय वडेट्टीवार म्हणाले, मुख्यमंत्री खुलेआम भर सभेत जनतेशी खोटं बोलून स्वतःची पाठ स्वतःच थोपटून घेण्यात पुढे आहेत. मुख्यमंत्र्यांनी न केलेल्या कामाचे श्रेय घेऊ नये असा खोचक सल्लाही यावेळी दिला.

विजय वडेट्टीवार म्हणाले, बदलापूर प्रकरणी केलेले आंदोलन हे राजकीय दृष्ट्या प्रेरित होते, यातील आंदोलनकर्ते बदलापूर बाहेरचे होते असे म्हणणाऱ्या सत्ताधाऱ्यांनी पोलिसांची रिमांड कॉपी बघावी. अटक केलेल्या सगळे आंदोलकांचे पत्ते बदलापूरचे आहे. या सरकारला फक्त स्वतःची पाठ थोपटून घ्यायची आहे. पण सरकारवर एखादा आरोप झाला की लगेच विरोधकांना दोष द्यायचा. स्वतः मात्र कोणत्याच घटनेची जबाबदारी घ्यायची नाही. फक्त फेकाफेकी करून जनतेच्या डोळ्यात धूळफेक करण्यात महायुतीचे नेते पटाईत असल्याची टीकाही यावेळी केली.

Check Also

विधानसभा निवडणुकीसाठी भाजपाची व्यवस्थापन समिती माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब पाटील दानवे यांची माहिती

आगामी विधानसभा निवडणुकीसाठी प्रदेश भारतीय जनता पार्टीतर्फे व्यवस्थापन समिती स्थापन करण्यात आल्याची माहिती माजी केंद्रीय …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *