Breaking News

संजय राऊत यांच्या त्या वक्त्यावर बाळासाहेब थोरात, नाना पटोले असे का म्हणाले? संजय राऊत यांचे फारसे ऐकत नका जाऊ

राज्यात आगामी विधानसभा निवडणूकांच्या पार्श्वभूमीवर शिवसेना उबाठा गटाचे नेते संजय राऊत यांच्याकडून सातत्याने महाविकास आघाडीच्या दृष्टीने एखादी तरी माहिती देत असतात किंवा काँग्रेससंदर्भात व्यक्तव्य करत असतात. मात्र आज आज महाविकास आघाडीच्या जागा वाटपाच्या अनुषंगाने संजय राऊत यांनी काँग्रेसबाबत वक्तव्य केले. त्यामुळे काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात आणि नाना पटोले या दोन्ही नेत्यांनी संजय राऊत यांच्या वक्तव्य फारसे ऐकत जाऊ नका असे सांगितल्याने महाविकास आघाडीत शिवसेना उबाठा गटाच्या भूमिकेवरून मतमतांतरे असल्याचे दिसून येत आहे.

शिवसेना उबाठा गटाचे नेते संजय राऊत आज बोलताना म्हणाले की, आगामी विधानसभा निवडणूका या महाविकास आघाडी म्हणून एकत्रित लढविणार आहोत. लोकसभा निवडणूकीत मिळालेल्या विजयामुळे काँग्रेससह तिन्ही पक्षांचा आत्मविश्वास दुणावला आहे. मात्र आत्मविश्वास आणि महाविकास आघाडी आणखी मजबूत होण्यासाठी एकमेकांमध्ये विश्वास वाढयला हवा असे सांगत एकमेकांच्या भूमिकेनुसार भूमिका घ्यायला हवी. आता शिवसेना उबाठा गटाकडील सांगली, अमरावती आणि अन्य एके ठिकाणची जागा आम्ही काँग्रेसला दिली. आता आम्हालाही ज्या ठिकाणी शिवसेनेचा प्रभाव आहे अशा काँग्रेसच्या ताब्यातील जागा हव्या आहेत अशी एकप्रकारची मागणी केली.

यासंदर्भात काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांना विचारले असता बाळासाहेब थोरात म्हणाले की, संजय राऊत हे तुम्हा सारख्या प्रसारमाध्यमाला बातमी मिळावी म्हणून काही बोलले असतील. मात्र तुम्ही त्यांचे फारसे ऐकत जाऊ नका असे प्रत्युत्तर देत महाविकास आघाडीच्या बैठकीत यासंदर्भात आम्ही चर्चा करू आणि कोणत्या जागा त्यांनी आम्हाला दिल्या आणि आमच्या कोणत्या जागा त्यांनी घेतल्या यावर मैत्रीपूर्ण बैठकीत चर्चा करू असे सांगत संजय राऊत यांच्या वक्तव्यावर फारसे बोलणे टाळले.

तर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना संजय राऊत यांच्या वक्तव्यासंदर्भात विचारले असता ते म्हणाले की, संजय राऊत यांचे जास्त ऐकू नका, विधानसभा निवडणुका मविआ म्हणूनच लढवल्या जात आहेत. जागा वाटपाबाबत कोणतेही मतभेद नाहीत आणि मुख्यमंत्रीपदाचा निर्णय निवडणुकीनंतर वरिष्ठ नेते घेतील असेही यावेळी स्पष्ट केले.

त्यामुळे महायुतीतील नेत्यांप्रमाणे महाविकास आघाडीतही संजय राऊत यांच्या वक्तव्यावर फारसे मत व्यक्त करायचे नाही अशी भावना निर्माण होत चालली आहे काय असा सवाल या निमित्ताने महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांमध्ये उपस्थित करण्यात येत आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत