“आधी अपमान सहन केला, पण आता नाही”, असे म्हणत संदीप नाईक यांनी हाती घेतली तुतारी जयंत पाटील यांच्या उपस्थितीत बेलापूरात संदीप नाईक यांचा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवारमध्ये प्रवेश

भाजपाचे आमदार गणेश नाईक यांचे सुपुत्र माजी आमदार संदीप नाईक यांनी आज पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात (शरदचंद्र पवार) अधिकृत प्रवेश केला. बेलापूर, नवी मुंबई येथे आयोजित एका कार्यक्रमात पक्ष प्रवेश केला. त्यामुळे नवी मुंबईतील राजकिय समिकरणं बदलणार असल्याचे दिसून येत आहे.

आयोजित कार्यक्रमात रॅलीला संबोधित करताना जयंत पाटील यांनी पक्षाच्या वाढीसाठी नाईक यांच्या क्षमतेवर विश्वास व्यक्त केला. तसेच पूर्वी, मी जेव्हाही नवी मुंबईत आलो तेव्हा काहीतरी हरवल्यासारखं वाटायचं. पण आज हरवलेला तुकडा सापडल्यासारखं वाटतं, असे सांगत नाईक यांनी राष्ट्रवादीशी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश करण्याचा घेतलेल्या निर्णयाचे स्वागत केले.

भाजपाचे ज्येष्ठ नेते गणेश नाईक यांचे पुत्र संदीप नाईक यांनी पक्ष प्रवेशानंतर सांगितले की, मी पूर्वी अपमान सहन केला, पण आता सहन करणार नाही असे भूमिका जाहिर करत नवी मुंबईच्या राजकारणातील मुळे मजबूत असल्याने राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार मध्ये सामील होण्याचा निर्णय घेतला. या निर्णयामुळे नवी मुंबईत राष्ट्रवादीची लाट निर्माण होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

या कार्यक्रमादरम्यान, जयंत पाटील यांनी अनेक नवी मुंबईतील प्रलंबित प्रश्नांकडे लक्ष वेधत म्हणाले की, राष्ट्रवादी (एसपी) नाईक यांच्या नेतृत्वाखाली समस्या सोडवण्यासाठी वचनबद्ध आहे. यामध्ये अपूर्ण १२.५% ​​जमीन वितरण प्रकल्प, झोपडपट्टी पुनर्वसनाचे रखडलेले प्रयत्न आणि सध्या सिडकोकडे असलेल्या इमारतींचे मालकी हक्क सुरक्षित करणे आदी प्रमुख मागण्याचा समावेश असल्याचे सांगितले.

जयंत पाटील पुढे बोलताना म्हणाले की, या समस्यांकडे खूप दिवसांपासून दुर्लक्ष केले गेले, आणि निर्णायकपणे निर्णय घेण्याची वेळ आली आहे, प्रदेशात विकासाच्या नव्या टप्प्यासाठी मंच तयार करण्यात आल्याचेही यावेळी सांगितले.

संदीप नाईक यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये (एसपी) प्रवेशामुळे, विधानसभा निवडणुकीपूर्वी पक्षाने नवी मुंबईत आपले पाऊल बळकट केले आहे.

About Editor

Check Also

पुण्यात टीपू सुलतानवरून काँग्रेस-भाजपाचे कार्यकर्त्ये आमने-सामने भाजपाच्या कार्यकर्त्यांकडून राज्यभर निदर्शने

महाराष्ट्राच्या राज्यपाल पदावर असताना भगतसिंग कोश्यारी यांनी छ्त्रपती शिवाजी महाराज यांचे गुरु म्हणून समर्थ रामदासाचे …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *