अजित पवार यांच्या पक्षाचे आमदार किरण लहामटे यांच्या विरोधात लेखी तक्रार कामात टक्केवारी खात असल्याचा मुंबई काँन्ट्रक्ट असोशिएशनचा आरोप

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसचे अकोले विधानसभा मतदारसंघातील  आमदार डॉ. किरण लहामटे हे  विकास कामासाठी कंत्राटदारांकडून टक्केवारी घेत असल्याचा आरोप मुंबई कॉन्ट्रॅक्टर्स असोसिएशनने केला आहे. यासंदर्भात असोसिएशनने सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांची भेट घेऊन त्यांच्याकडे लेखी तक्रार केली आहे.

अकोले तालुक्यातील रस्ते कामांच्या निघणाऱ्या ई निविदा प्रक्रियेत डॉ. किरण लहामटे हस्तक्षेप करतात. आपल्या मर्जीतील कंत्राटदारांना काम न मिळाल्यास अन्य कंत्राटदाराला ते ब्लॅकमेल करतात. डॉ. किरण लहामटे कोणताही अनुभव नसलेल्या कंपन्यांना शासकीय कामे  मिळवून देतात. कंपनीकडे कोणतीही यंत्रसामुग्री, मनुष्यबळ उपलब्ध नसल्याने कामाचा दर्जा राहत नाही, असे असोशिएशनने आपल्या तक्रारीत म्हटले आहे.

डॉ. किरण लहामटे यांनी आतापर्यंत अकोले विधानसभा मतदारसंघात जेवढी विकास कामे केली आहेत,  त्यामध्ये त्यांनी आपल्या मर्जीतील कंत्राटदारांकडून टक्केवारी घेऊन कामाचे वाटप केले आहे. अकोले तालुक्यातील रस्त्यांची कामे दर्जा राखून गुणवत्तापूर्वक न झाल्याने येथील रस्ते वाहून गेले आहेत. त्यामुळे शासन स्तरावरून अकोले मतदारसंघातील रस्ते कामाची सखोल चौकशी करण्यात यावी, अशी मागणी असोशिएशनने केली आहे. सार्वजनिक बांधकाम मंत्र्यांना दिलेल्या तक्रार अर्जावर असोशिएशन अध्यक्ष मुकुंद काकड  आणि अन्य पदधिकाऱ्यांच्या सह्या आहेत.

About Editor

Check Also

महाराष्ट्रात धार्मिक स्वातंत्र्य विधेयक कायदा विधानसभेत सादर प्रलोभन किंवा फसवणुकीद्वारे धर्मांतर केल्यास शिक्षेची तरतूद ० धार्मिक धर्मांतराच्या ६० दिवस आधी लेखी सूचना आवश्यक

महाराष्ट्रात जबरदस्तीने धर्मांतर आणि तथाकथित “लव्ह जिहाद” रोखण्याच्या उद्देशाने, भाजपाच्या नेतृत्वाखालील महायुती सरकारने शुक्रवारी विधानसभेत …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *