Breaking News

२०-ट्विटी वर्ल्ड कप विजेत्या इंडिया टीमला १२५ कोटींचे बक्षिस विराट कोहली रोहित शर्मा नंतर आता रविंद्र जडेजाही घेणार वन डे मधून निवृत्ती

नुकत्याच झालेल्या दक्षिण आर्फिकेला २०-२० वर्ल्ड कप क्रिकेट सामन्यात पराभूत केलेल्या भारतीय क्रिकेट टीमला बीसीसीआयने १२५ कोटी रूपयांचे बक्षिस जाहिर आज केले. एकाबाजूला १७ वर्षानंतर २०-२० सामन्यातील वर्ल्ड कप जिंकल्यानंतर उत्सव साजरा केला जात असताना दुसऱ्याबाजूला मात्र विराट कोहली, रोहित शर्मा यांच्या पाठोपाठ रविंद्र जडेजा यानेही एक दिवसीय क्रिकेटमधून आपली निवृत्ती जाहिर केली आहे.

क्रिकेट कसोटी सामन्यात विराट कोहली, रोहित शर्मा आणि रविंद्र जडेजा हे खेळत राहणार आहेत. यावेळी रविंद्र जडेजाने, आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामन्याला अलविदा म्हणत एखाद्या धावणाऱ्या घोड्याप्रमाणे देशासाठी मी योगदान देत आलोय यापुढेही देत राहिन. विशेष म्हणजे २०-२० सामन्याचे विश्वचषक चषक जिंकण्याचे स्वप्न आज सत्यात उतरले असून आजपर्यंत तुम्ही दिलेल्या आठवणी आणि सदिच्छांबद्दल धन्यवाद ही दिले.

२०-२० मध्ये दक्षिण आफ्रिकेला पराभूत करत वर्ल्ड कप जिंकल्यानंतर आयसीसीकडून बक्षिस तर मिळालंच. त्याचबरोबर देशाच्या बीसीसीआय़नेही १२५ कोटी रूपयांचे बक्षिस जाहिर केल्याची माहिती बीसीसीआयचे सचिव जय शाह यांनी दिली.

यावेळी जय शाह म्हणाले की, टीम इंडियाने संपूर्ण सामन्यात असाधारण कामगिरी केली. त्या स्पर्धेत दृढ निश्चय आणि प्रतिभेचा अतुलनीय दर्शन घडविले. तसेच खिलाडू वृत्तीही दाखविली. त्यामुळे प्रशिक्षकासह सर्व स्टाफच अभिनंदनही यावेळी केले.

Check Also

डिआरडीओचे अध्यक्ष डॉ समीर व्ही कामत यांना एक वर्षाची मुदतवाढ लष्कर प्रमुख मनोज पांडे यांच्यानंतर डॉ समीर व्ही कामत यांनाही वाढ

मंत्रिमंडळाच्या नियुक्ती समितीने २७ मे रोजी संरक्षण संशोधन आणि विकास विभागाचे अर्थात डीआरडीओ सचिव डॉ …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *