वक्फ बिलावरील चर्चेच्या वेळी अखिलेश यादव यांचा अमित शाह यांना चिमटा राष्ट्रीय अध्यक्ष निवडण्यावरून अखिलेश यादव यांचा टोला

वक्फ विधेयकाचे सुधारीत विधेयक आज संसदेत सादर करण्यात आले. या विधेयकावरील चर्चेसाठी आठ तासांचा वेळ निर्धारित करण्यात आला. त्यावेळी सत्ताधारी आणि विरोधी बाकावरील अनेक सदस्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. मात्र या चर्चेच्या वेळी समाजवादी पार्टीचे प्रमुख खासदार अखिलेश यादव आणि भाजपाचे नेते अमित शाह यांच्यात सर्वात मोठा पक्ष म्हणणाऱ्या भाजपाला अद्याप राष्ट्रीय अध्यक्ष निवडता आला नसल्याचे वक्तव्य केले. त्यावरून अमित शाह आणि अखिलेश यादव यांच्यात शाब्दीक चकमक उडाल्याचे चित्र लोकसभेत पाह्यला मिळाले.

लोकसभेत वक्फ सुधारीत विधेयकावरील चर्चेला सुरुवात झाल्यानंतर विरोधकांकडून समाजवादी पार्टीचे प्रमुख अखिलेश सिंग हे बोलायला उभे राहिले. यावेळी वक्फ विधेयकावर आपली भूमिका स्पष्ट करता करता हळूच अखिलेश यादव यांनी भाजपाच्या राष्ट्रीय अध्यक्ष पदावर नियुक्ती करण्यावरून केंद्रीय मंत्री अमित शाह यांना चिमटा घेतला.

यावेळी अखिलेश यादव म्हणाले की, जेवढे इथे पक्ष असतील त्यांना केवळ पाच जणांना एकत्र येत त्यांच्या त्यांच्या पक्षाचे अध्यक्ष निश्चित करायचे आहेत. मात्र आमच्या पक्षात १२ ते १३ कोटी सदस्यांमधून एकाची निवड करायची असते त्यासाठी तर वेळ लागणारच असा चिमटा काढला.

यावर अमित शाह यांनी अखिलेश यादव यांच्या वक्तव्यावर उत्तर देत म्हणाले की. तुमच्याबाबतीत फार वेळ लागणार नाही. मला तर वाटतं की तुम्ही पुढली २५ वर्षे अध्यक्ष असाल असे प्रत्युत्तर दिले. त्यावर अखिलेश यादव यांनी हसत त्यांच्या उत्तराचा स्विकार केला.

यावेळी बोलताना अखिलेश यादव यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नागपूर दौऱ्यावर भाषण करत म्हणाले की, नुकतीच जी नागपूरची यात्रा पार पडली, ती पुढच्या ७५ वर्षाच्या एक्सटेन्शनची यात्रा तर नाही ना असा उपरोधिक टोलाही यावेळी भाजजपाला लगावला. मात्र अखिलेश यादव यांनी भाजपावर सतत टीकेचा भडिमार सुरु केल्याने लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी मध्यस्थी करत तुम्ही वक्फच्या मुद्यावर बोला असा इशारा दिला.

त्यावर अखिलेश यादव म्हणाले की, वक्फ विधेयक मुस्लिम समुदायाबाबत निर्णय घेतला जात आहे. मात्र या समुदायाची सहमती घेतली जात नाही. धर्माचं परिवर्तन व्यवसायात करू नका असे उपरोधिक वक्तव्यही यावेळी केला.

दरम्यान गेल्या १० महिन्यापासून भाजपाच्या राष्ट्रीय अध्यक्षाची निवड बाकी आहे. सध्या सुरु असलेल्या अर्थसंकल्पिय अधिवेशनानंतर भाजपाकडून ही प्रक्रिया पुन्हा सुरु करण्यात येणार असल्याचे सांगत एप्रिल महिन्याच्या तिसऱ्या आठवड्यापर्यंत राष्ट्रीय अध्यक्षाची निवड जाहिर होण्याची शक्यता आहे.

 

About Editor

Check Also

मेहबूबा मुफ्ती यांचा इशारा, गांधी, नेहरूचा हिंदूस्तान लिंचिस्तान बनत चाललाय बांग्लादेशातील हिंदूची हत्या झाल्यानंतर केली केंद्रावर टीका

बांग्लादेशातील हिंदू समुदायांवर स्थानिकांकडून हल्ले करण्यात येत असल्याच्या पार्श्वभूमीवर एका हिंदू तरूणाची हत्या झाल्यानंतर जम्मू …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *