इराणचे परराष्ट्र मंत्री सय्यद अब्बास अराघची यांनी बुधवारी सांगितले की, आपल्या सर्वोच्च सुरक्षा अधिकाऱ्याचा मृत्यू होऊनही इराणचा लढा सुरूच राहील. कतारच्या अल जझीरा या वृत्तवाहिनीशी बोलताना अराघची म्हणाले, “एका व्यक्तीच्या उपस्थितीचा किंवा अनुपस्थितीचा इराणच्या राजकीय आणि आर्थिक रचनेवर परिणाम होत नाही.” आखात्यातील युद्धाला तीन आठवडे पूर्ण होण्याच्या मार्गावर असताना, अमेरिका-इस्रायलच्या …
Read More »होर्मुझमध्ये भारतीय ध्वजाधारीत जहाजांमध्ये २ लाख मेट्रिक टन गॅस, तर १६.७ लाख मेट्रिक टन कच्चे तेल एकूण जहाजापैकी अद्यापही काही जहाज होर्मुझमध्येच
पश्चिम आशियातील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर, होर्मुझच्या बंद असलेल्या सामुद्रधुनीमध्ये जहाजांमध्ये अडकलेल्या भारताच्या ऊर्जा पुरवठ्याबद्दलच्या वाढत्या चिंतेवर भाष्य करताना, नौवहन आणि जलमार्ग मंत्रालयाचे विशेष सचिव राजेश कुमार सिन्हा यांनी बुधवारी दैनंदिन आंतर-मंत्रालयीन पत्रकार परिषदेत पत्रकारांना सांगितले की, पर्शियन आखाताला मिळणाऱ्या या भागात सध्या असलेले भारतीय ध्वज असलेले टँकर २ लाख मेट्रिक …
Read More »ममता बॅनर्जी म्हणाल्या, दिल्लीचा लाडू जिंकू शकणार नाही भवानीपूर मतदारसंघातून मुख्यमंत्री ममता बँनर्जी विरूद्ध सुवेंद्रू अधिकारी यांच्यात लढत
पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचा सामना कोलकाताच्या भवानीपूर मतदारसंघात विरोधी पक्षनेते सुवेंदू अधिकारी यांच्याशी होणार आहे. त्यामुळे २०२६ च्या विधानसभा निवडणुकीत एक रोमांचक लढत अपेक्षित आहे. तृणमूलच्या सर्वेसर्वा ममता बॅनर्जी यांनी स्वतः या अत्यंत महत्त्वाच्या निवडणुकीसाठी उमेदवारांची यादी जाहीर करताना ही घोषणा केली. या निवडणुकीत ममता बॅनर्जी सलग चौथ्यांदा …
Read More »केंद्र सरकारचे आवाहन, इंधन आणि एलपीजी अंशत पूर्ववत पीएनजी (PNG) हा एलपीजी (LPG) सिलिंडरपेक्षा अधिक स्थिर पर्याय
लिक्विफाइड पेट्रोलियम गॅस अर्थात एलपीजी च्या संभाव्य तुटवड्याबद्दल वाढत्या चिंतेच्या पार्श्वभूमीवर, केंद्र सरकारने सोमवारी या इंधनाचा वापर करण्याचे आवाहन केले आणि पाईपद्वारे नैसर्गिक वायू अर्थात पीएनजी च्या पायाभूत सुविधांचा विस्तार करण्यासाठी प्रयत्न करण्याचे संकेत दिले. पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयाच्या सहसचिव (विपणन आणि तेल शुद्धीकरण) सुजाता शर्मा म्हणाल्या की, घरगुती …
Read More »इस्रायलचा दावा सुरक्षा अधिकारी अली लारीजानी यांचा हल्यात मृत्यू अयातुल्ल्ल्ला खामेनी यांचे सुरक्षा रक्षक म्हणून ओळखले जात
इराणच्या सुरक्षा धोरणाचे सुकाणू सांभाळण्याची जबाबदारी ज्यांच्यावर होती आणि इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामोनी यांचे सुरक्षा सल्लागार म्हणून काम पाहणारे अली लारीजीनी यांनी संघर्षादरम्यान तेहरानचा चेहरा बनले होते, त्या अली लारीजानी यांचा इस्रायली हल्ल्यांमध्ये मृत्यू झाला, असे संरक्षण मंत्री इस्रायल काट्झ यांनी मंगळवारी सांगितले. या घटनेमुळे इराणी नेतृत्वाला आणखीच …
Read More »ओडिशा : कटकमधील एससीबी मेडिकल कॉलेजमध्ये आगीत १० रुग्णांचा मृत्यू
कटक, ओडिशा : ओडिशामधील कटकमध्ये सोमवारी सकाळी एक दुःखद घटना घडली. कटकमधील एससीबी मेडिकल कॉलेजच्या ट्रॉमा केअर आयसीयूमध्ये पहाटे २:३० वाजता आग लागली. मुख्यमंत्री मोहन चरण मांझी यांनी आगीत १० रुग्णांचा मृत्यू झाल्याची पुष्टी केली. घटनास्थळी पोहोचलेल्या तीन अग्निशमन दलाच्या जवानांनी आग आटोक्यात आणली आणि रुग्णांना सुरक्षित ठिकाणी हलवले. अपघातानंतर …
Read More »राहुल गांधी यांचे पंतप्रधान मोदी यांना पत्र, कांशीराम यांना भारतरत्न प्रदान करा उत्तर प्रदेशातील कांशीराम यांच्या जयंती निमित्त आयोजित कार्यक्रमानंतर केली मागणी
काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी रविवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून, बहुजन समाज पक्षाची (BSP) स्थापना करणारे आणि दलितांचे प्रेरणास्थान असलेले कांशीराम यांना भारताचा सर्वोच्च नागरी सन्मान ‘भारतरत्न’ प्रदान करण्याची मागणी केली. राहुल गांधी यांनी ‘X’ (पूर्वीचे ट्विटर) वर लिहिले: “मी अशी मागणी करतो की, भारत सरकारने सामाजिक न्यायाचे …
Read More »तामीळनाडूत भाजपाकडून आंध्र प्रदेशची पुनरावृत्ती ? अभिनेता विजयच्या पक्षाला युतीची ऑफर तामीळनाडूच्या उपमुख्यमंत्री पदाची ऑफर
भाजपाने दक्षिण भारतात प्रवेश करण्यासाठी आंध्र प्रदेश मधील विधानसभा निवडणूकीत तेलगू चित्रपट अभिनेता पवन कल्याण यांच्या पक्षाबरोबर युती केली. तसेच एन चंद्राबाबू नायडू यांच्या पक्षाबरोबर अभिनेता पवन कल्याण यांच्या पक्षाबरोबर आघाडी केली. या आघाडीक तेलगू देसम पक्षाबरोबर पवन कल्याण यांच्या पक्षालाही चांगला फायदा झाला. भाजपाने त्या बदल्यात पवन कल्याण यांना …
Read More »केंद्रीय निवडणूक आय़ोगाकडून पाच राज्यातील निवडणूकांच्या तारखा जाहिर सर्व मतदान केंद्रावरीलवर प्रक्षेपण करण्यास निवडणूक आयोग सक्षम
आसाम, केरळ, पुद्दुचेरी, तामिळनाडू आणि पश्चिम बंगालमधील २०२६ च्या विधानसभा निवडणुकांचे वेळापत्रक जाहीर करण्यासाठी भारतीय निवडणूक आयोगाने पत्रकार परिषद घेतली. ही पत्रकार परिषद माहिती नवी दिल्लीतील विज्ञान भवन येथे आयोजित करण्यात आली. निवडणूक आयोगाने रविवारी सांगितले की, आसाम, केरळ, पुद्दुचेरी, तामिळनाडू आणि पश्चिम बंगालमधील आगामी विधानसभा निवडणुकीत एकूण १७.४ कोटी …
Read More »अकासा एअरकडूनही इंधनाचा खर्च म्हणून तिकिटावर सरचार्ज प्रसिद्धि पत्रकातून तिकिट दरात वाढ करत असल्याची दिली माहिती
एअर इंडिया आणि इंडिगोनंतर, मध्य पूर्वेतील सध्याच्या संकटाशी संबंधित जेट टर्बाइन इंधनाच्या किमतींमध्ये तीव्र वाढ होत असताना, अकासा एअरने शनिवारी देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय मार्गांवर इंधन अधिभार जाहीर केला. “मध्य पूर्वेतील भू-राजकीय घडामोडींमुळे विमान टर्बाइन इंधनाच्या किमतीत लक्षणीय वाढ झाली आहे. इंधन हे विमान कंपन्यांच्या ऑपरेटिंग खर्चाचा एक महत्त्वाचा भाग असल्याने, …
Read More »
Marathi e-Batmya