सेट-नेट पीएचडीधारकांसाठी खुषखबर: रखडलेली प्राध्यापकांची भरती लवकरच उच्च शिक्षण मंत्री उदय सामंत यांचे संघर्ष समितीला आश्वासन

पुणे : प्रतिनिधी

मागील एकवर्षापासून कोरोना विषाणूमुळे रखडलेली प्राध्यापकांच्या रिक्त जागांची भरती प्रक्रिया लवकरच सुरु करण्यात येणार असल्याचे आश्वासन उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी देत ही भरती ३ हजार ६४ रिक्त पदांसाठीची राहणार असल्याचे त्यांनी सांगितले.

सेट-नेट पीएचडी पात्रता धारक संघर्ष समितीच्यावतीने २१ जून २०२१ रोजी पासून विविध मागण्यासंदर्भात पुणे येथील उच्च शिक्षण संचालनालयाच्या कार्यालयासमोर आंदोलन करण्यात येत होते. या समितीबरोबर मंत्री सामंत यांनी जिल्हाधिकारी कार्यालय अधिकाऱ्यांची बैठक घेतल्यानंतर ते प्रसार माध्यमांशी बोलताना दिली.

उच्चस्तरीय समितीच्या वतीने एकून ४,०७४ प्राध्यापकांच्या जागांच्या भरतीला मान्यता देण्यात आली होती. त्यापैकी १,६७४ प्राध्यापकांच्या रिक्त जागेची भरती पूर्ण करण्यात आलेली आहे. या निर्णयाचे स्वागत करत नेट-सेट पीएचडी पात्रताधारक संघर्ष समितीच्या वतीने करण्यात येत असलेले आंदोलन मागे घेण्याचा निर्णय घेण्यात आला. वित्त विभागाकडील प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर अर्थमंत्रालयाकडून मान्यता घेतल्यानंतर भरती संदर्भात लवकरच शासन निर्णय काढणार असल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले. २०२० या वर्षापर्यंत एकूण रिक्त पदे गृहित धरुन ७०० पदांचा प्रस्ताव उच्चस्तरीय समितीकडे सादर करण्याचे निर्देश दिले. २०२० या वर्षापर्यंत प्राध्यापकांची किती पदे रिक्त आहेत याबाबतच दोन महिन्यात सर्वेक्षण करुन करण्याचा निर्णय त्यांनी घेतला.

तासिका तत्वावर काम करणाऱ्या प्राध्यापकांच्या मागणीच्या अनुषंगाने ४८ मिनिटांची तासिका याप्रमाणे मानधन देण्याचा निर्णय घेण्यात आला. तसेच सीएचबी संदर्भात निर्णय घेण्यासाठी संचालक धनराज माने यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठित करुन तीन महिन्यात अहवाल सादर करण्याचा निर्णयही घेण्यात आला.

संवर्गनिहाय धोरणासाठी उच्च व तंत्रशिक्षण मंत्री, सामाजिक न्याय मंत्री, आदिवासी कल्याण मंत्री व इतर मागास बहुजन कल्याण विभागाचे मंत्री यांची समिती स्थापन करुन लवकरच योग्य तो निर्णय घेण्यात येईल असे सांगत यासंदर्भात मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्याशी चर्चा करणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

About Editor

Check Also

इराणचा इशारा, हल्ला केल्यास अमेरिका आणि इस्रायल लक्ष्य राहणार सरकार विरोधात इराणमधील निदर्शनात वाढ

इराणमधील सरकारविरोधी निदर्शनांच्या लाटेदरम्यान अमेरिकेने हल्ला केल्यास, अमेरिका आणि इस्रायलला लक्ष्य करण्याचा इरारा इराणने दिला. …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *