उद्योग मंत्र्यांची शिफारस महिला शिक्षिकेला एमएसआरडीसीत प्रतिनियुक्ती द्या मंत्रालयातील सार्वजनिक बांधकाम विभाग लागला कामाला

राज्य सरकारच्या अखत्यारित असलेल्या विविध असे मिळून जवळपास ३६ खाती आहेत. तर जवळपास विविध स्थानिक स्वराज्य संस्था आणि अंगीकृत महामंडळे आहेत. या सर्व विभागातील कर्मचारी आणि अधिकाऱ्यांसाठी त्या त्या विभागाची एक नियमावली आहे. त्या नियमाच्या आधारेच संबधिक कार्यालयांची कामे, कर्मचारी-अधिकाऱी यांच्या बदल्या, प्रतिनियुक्त्या केल्या जातात. मात्र एका महिला शिक्षिकेने वैद्यकीय कारणास्तव मुंबईत बदली मागितली आहे. विशेष म्हणजे त्यासाठी राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी पुढाकार घेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे पाठपुरावा सुरु केला असल्याची धक्कादायक माहिती हाती आली आहे.

राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या बदल्यांचा मौसम दर वर्षी एप्रिल-मे महिन्यात सुरु होतो. कोण कोणते कारण देऊन बदलीची मागणी संबधित विभागाकडे करेल हे सांगता येत नाही. मात्र प्रशासनाकडून संबधित कर्मचारी-अधिकाऱ्याची खरीच अडचण असेल म्हणून त्या कारणावर विश्वास ठेवून सदर कर्मचारी-अधिकारी बदलीस पात्र समजून संबधिताची बदली करण्यात येते. मात्र पालघर जिल्हा परिषदेच्या शाळेत कार्यरत असणाऱ्या महिला शिक्षकेस वैद्यकीय कारणास्तव मुंबईत बदली हवी आहे म्हणून उद्योग मंत्री उदय सामंत यांनी चक्क सदर महिलेस एमएसआरडीसी विभागात अर्थात राज्य रस्ते विकास महामंडळात प्रतिनियुक्ती द्यावी अशी शिफारस करत मुख्यमंत्र्यांच्या मान्यतेने सदरचा प्रस्ताव सार्वजनिक विभागाकडे पाठवून त्याची अंमलबजावणी कऱण्याच्या अनुषंगाने प्रयत्न सुरु केल्याची माहिती पुढे आली आहे.

बर उद्योग मंत्री एवढ्यावरच थांबले नाहीत, तर त्यांनी या सदर महिलेच्या प्रतिनियुक्तीचा प्रस्ताव मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे पाठवला. त्यावर मुख्यमंत्री शिंदे यांनीही सदर शाळेच्या शिक्षिकेला एमएसआरडीसीमध्ये प्रतिनियुक्तीवर घेण्याच्या शिफारसीवर तपासून योग्य ती कारवाई करावी असा शेरा उद्योग मंत्र्यांच्या शिफारस पत्रावर लिहित सदर प्रस्ताव प्रकरण एमएसआरडीसीच्या व्हीसीएमडीना मार्क केले.

त्यानंतर सदरचे पत्र आणि प्रस्ताव मुख्यमंत्री कार्यालयातून सार्वजनिक बांधकाम विभागाकडे आला. त्यावर सार्वजनिक बांधकाम विभागाने पुढील कारवाई सुरु केली असून सदर महिलेला प्रतिनियुक्ती देण्याची कारवाहीही सुरु केली. त्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभाग आणि एमएसआरडीसीतील अधिकाऱ्यांनी कपाळावर हात मारून आता सदर महिला शिक्षिकेला कोणते शाळा शिकवायचे काम द्यायचे की अभियंत्याचे काम द्यायचे की आरेखक पदाचे काम द्यायचे असा सवालही उपस्थित करत आहेत.

दरम्यान, उद्योग मंत्र्यांकडून शिफारस आलेल्या या पत्रावर सार्वजनिक बांधकाम विभागातील अधिकारी डोके फोडून प्रतिनियुक्ती कोणत्या पदावर द्यायची याचा विचार करत असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली.

या घटनेवरून सार्वजनिक बांधकाम विभागातील एका अधिकाऱ्याने गंमतीने पंतप्रधान नरेंद्र मोदी यंच्या भाषणातील वक्तव्यांचा संदर्भ देत म्हणाले की, लोकसभा निवडणूकीच्या काळात पंतप्रधान मोदी हे शिवसेना उबाठा आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या नेत्यांवर टीका करताना म्हणाले होते की हमारे साथ आ जाओ और अपने मन का करो, तसा काहीसा प्रकार काहीसा राज्याच्या मंत्रालयात सुरु असल्याचे मतही यावेळी व्यक्त केले.

उद्योग मंत्री उदय सामंत यांचे त्यावरील मुख्यमंत्र्यांचा रिमार्क असलेले हेच ते पत्र

About Editor

Check Also

प्रियांका गांधी यांचा पंतप्रधान मोदींना सवाल, एपस्टीन फाईलला घाबरले? लोकसभा कामकाजातून मोदी यांची उपस्थिती झाली कमी

काँग्रेस खासदार प्रियांका गांधी वाड्रा यांनी गुरुवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या लोकसभा कामकाजातील अनुपस्थितीवरून सरकारवर …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *