केंद्रीय गृहमंत्री तथा भाजपाचे ज्येष्ठ नेते अमित शाह यांनी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयीचे वक्तव्य केले. तसेच डॉ आंबेडकर यांचे नाव घेण्याची फॅशनच झाल्याचे सांगत इतक्यावेळा जर ईश्वराचे नाव घेतले असते तर स्वर्ग मिळाला असता अशी टीपण्णी केली. अमित यांच्या या वक्तव्यावरून दिल्लीच्या संसदेत पडसाद उमटत काँग्रेस आणि इंडिया आघाडीने संसदेत हा मुद्दा उपस्थित करत या वक्तव्यावरून अमित शाह यांनी माफी मागावी अशी मागणी केली. त्यामुळे निर्माण झालेल्या गोंधळाच्या पार्श्वभूमीवर संसदेच्या लोकसभा आणि राज्यसभेचे कामकाज तहकूब करण्याची पाळी सरकारवर आली. महाराष्ट्राच्या विधिमंडळातही महाविकास आघाडीच्या सदस्यांनी वॉक आऊट करत आपला निषेध व्यक्त केला.
त्यामुळे डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या विषयी अमित शाह यांनी केलेल्या वक्तव्यामुळे राजकिय वातावरण चांगलेच तापले असल्याचे पाह्यला मिळाले. दरम्यान अमित शाह यांच्यावरील काँग्रेसच्या टीकेला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या एक्सवरील अकाऊंटवरून उत्तर देण्याचा प्रयत्न करत काँग्रेसवर पलटवार केला. तसेच अमित शाह यांच्या वक्तव्याची पाठराखणही केली.
एक्सवर पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, जर काँग्रेस आणि त्यांच्या भ्रष्ट व्यवस्थेला असे वाटत असेल की, या दुष्ट अपप्रचारामागे गेल्या अनेक वर्षापासून ते करत असलेले गैरप्रकार लपवू शकतात, विशेषतः डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा अवमान करण्यासारखे प्रकार, तर ही त्यांची मोठी चूक आहे. देशाच्या नागरिकांनी वेळोवेळी पाह्यलय की कसे एक कुटुंबाच्या ताब्यात असणारा पक्ष डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा वारसा पुसून टाकण्याचा आणि अनुसूचित जाती-जमातींचा अवमान करण्यासाठी शक्य त्या सर्व कुटील गोष्टी केल्याचे म्हणाले.
पुढे या पोस्टमध्ये पंतप्रधान मोदी यांनी एक यादी देत काँग्रेसने डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा अवमान केला,यासंदर्भात दावा करताना डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा निवडणूकीत कसा दोनदा पराभव केला, डॉ पंडित नेहरू यांनी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या विरोधात प्रचार करणे, त्यांच्या पराभवाचा मुद्दा मोठा करणे, डॉ आंबेडकरांना भारतरत्न नाकारणे, संसदेच्या सेंट्रल हॉलमध्ये पोट्रेट लावण्यास नकार देणे यागोष्टींचा उल्लेख डॉ आंबेडकर यांचा अवमान करण्याच्या यादीत उल्लेख केला.
तसेच पुढे बोलताना पंतप्रधान मोदी म्हणाले की, काँग्रेस त्यांना हवा तेवढा प्रयत्न करू शकते, पण ते हे नाकारू शकत नाही. की त्यांच्याच काळात अनुसूचित जाती-जमातीच्या विरोधातील भीषण हत्याकांड त्याच्याच काळात झाले. काँग्रेस अनेक वर्षे सत्तेत राहिली पण अनुसूचित जाती-जमातीच्या विकासासाठी ठोस असं काही केलं नाही असा पलटवारही काँग्रेसवर एक्सवरून केला.
शेवटी आपल्या एक्सवरील पोस्टमध्ये अमित शाह यांच्या वक्तव्याचे समर्थन करताना पंतप्रधान मोदी म्हणाले की, संसदेत गृहमंत्री अमित शाह यांनी डॉ बाबासाहेब आंबेडकर आणि अनुसूचित जाती-जमातींचा अवमान केल्याचा काळा इतिहासच संसदेत उघडकीस आणला. अमित शाह यांच्या मांडलेल्या भूमिकेमुळेच काँग्रेसला धक्का बसला असून त्यामुळेच त्यांनी हे नाटक सुरु केले आहे. पण दुर्दैवाने लोकांना सत्य काय आहे याची पूर्व कल्पना आहे असेही यावेळी सांगत काँग्रेसला लक्ष्य केले.
Our Government has worked to develop Panchteerth, the five iconic places associated with Dr. Ambedkar.
For decades, there was a pending issue on land for Chaitya Bhoomi. Not only did our Government resolve the issue, I have gone to pray there as well.
We have also developed 26,…
— Narendra Modi (@narendramodi) December 18, 2024
Marathi e-Batmya