बलात्कार आणि छळाला सामोरे गेल्यानंतर महाराष्ट्रातील सातारा येथील डॉ. संपदा मुंडे यांची आत्महत्या ही कोणत्याही सुसंस्कृत समाजाच्या विवेकाला हादरवून टाकणारी शोकांतिका असल्याची भावना काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी व्यक्त केली.
डॉ संपदा मुंडे यांच्यावर यंत्रणेने अत्याचार आणि छळ करून आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी राहुल गांधी यांनी एक्सवरील पोस्ट वरून व्यक्त केली भावना.
राहुल गांधी पुढे म्हणाले की, इतरांचे दुःख कमी करण्याची आकांक्षा बाळगणाऱ्या एका आशादायक डॉक्टरला भ्रष्ट सत्ता आणि व्यवस्थेतील गुन्हेगारांच्या छळाला बळी पडावे लागले.
पुढे बोलताना राहुल गांधी म्हणाले की, गुन्हेगारांपासून जनतेचे रक्षण करण्याची जबाबदारी ज्यांच्यावर सोपवण्यात आली होती त्यांनी या निष्पाप महिलेविरुद्ध सर्वात घृणास्पद गुन्हा केला: बलात्कार आणि शोषण. वृत्तांनुसार, भाजपाशी संबंधित काही प्रभावशाली लोकांनीही तिच्यावर भ्रष्टाचार करण्यासाठी दबाव आणण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप केला.
महाराष्ट्र के सतारा में बलात्कार और उत्पीड़न से तंग आकर डॉ. संपदा मुंडे की आत्महत्या किसी भी सभ्य समाज की अंतरात्मा को झकझोर देने वाली त्रासदी है।
एक होनहार डॉक्टर बेटी, जो दूसरों का दर्द मिटाने की आकांक्षा रखती थी, भ्रष्ट सत्ता और तंत्र में बैठे अपराधियों की प्रताड़ना का शिकार…
— Rahul Gandhi (@RahulGandhi) October 26, 2025
राहुल गांधी पुढे बोलताना म्हणाले की, सत्तेने संरक्षित गुन्हेगारी विचारसरणीचे हे सर्वात घृणास्पद उदाहरण आहे. ही आत्महत्या नाही – ही संस्थात्मक हत्या असल्याचा गंभीर आरोप करत जेव्हा सत्ता गुन्हेगारांना संरक्षण देते, तेव्हा आपण कोणाकडून न्यायाची अपेक्षा करू शकतो? डॉ. संपदा यांच्या मृत्यूने या भाजपा सरकारचा अमानवी आणि निर्दयी स्वभाव उघडकीस आणला असल्याची टीका केली.
शेवटी बोलताना राहुल गांधी म्हणाले की, न्यायाच्या या लढाईत आम्ही पीडितेच्या कुटुंबासोबत खंबीरपणे उभे आहोत. भारतातील प्रत्येक मुलीसाठी – आता भीती नको, आम्हाला न्याय हवा आहे अशी मागणीही यावेळी केली.
Marathi e-Batmya