मतचोरीच्या विरोधात इंडिया आघाडीची निवडणूक आयोगाच्या कार्यालयासमोर निदर्शने काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखालील मोर्चा पोलिसांनी रोखला, राहुल गांधी यांना अटक मोर्चेकरी स्थानबद्ध

सोमवारी राष्ट्रीय राजधानीत प्रचंड नाट्यमय घडामोडी घडल्या इंडिया आघाडीच्या सुमारे ३०० विरोधी खासदारांनी ‘मत चोरी’च्या आरोपावरून निवडणूक आयोगाच्या कार्यालयाकडे कूच केली आणि निवडणूक आयोगावर भाजपाशी संगनमत करून त्यांच्या निवडणूक उद्दिष्टांना साध्य करण्याचा आरोप केला. काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली मोर्चा पोलिसांनी मध्यभागी रोखला, ज्यामुळे समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव यांच्यासह अनेक खासदार बॅरिकेड्सवरून उड्या मारत पोलिसांनी रोखलेला मोर्चा यशस्वीरित्या पार पाडण्याचा प्रयत्न केला.

दरम्यान, गोंधळ, घोषणाबाजी, अटक आणि धरणे आंदोलनादरम्यान, तृणमूल काँग्रेसच्या दोन खासदार – महुआ मोइत्रा आणि मिताली वाघ – बेशुद्ध पडले. सहकारी राजकारणी त्यांना पाणी आणि प्राथमिक उपचार देऊन बरे करण्याचा प्रयत्न करताना दिसले. वाघ यांना रुग्णालयात हलविण्यात आले.

लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्यासह अनेक विरोधी खासदारांचा मोर्चा पोलिसांनी अर्ध्यावर रोखण्यात आल्यानंतर पोलिसांनी या खासदारांना ताब्यात घेतले. काँग्रेसचे प्रमुख मल्लिकार्जुन खर्गे आणि त्यांचे पक्षाचे सहकारी जयराम रमेश हे इतर ताब्यात घेतलेल्या नेत्यांमध्ये होते.

संसदेजवळून मोर्चा सुरू झाला आणि निवडणूक आयोगाच्या मुख्यालय असलेल्या निर्वाचन सदनकडे निघाला. “लोकशाही हक्कांची चोरी” आणि “मत चोरी” (मत चोरी) अशा घोषणा लिहिलेले फलक हातात घेऊन खासदारांनी सरकार आणि निवडणूक आयोगाविरुद्ध घोषणाबाजी करण्यास सुरुवात केली. त्यावेळी पोलिसांनी विरोधी पक्षाच्या मोर्चेकरी खासदारांना मध्येच रोखले. त्यावेळी विरोधी पक्षाच्या खासदारांनी  रस्त्यावरच ठिय्या आंदोलन सुरु केला आणि त्यांनी आपला निषेध सुरू ठेवला.

यावेळी अनेक खासदारांची पोलिसांशी झटापट झाली, तर सपा प्रमुख अखिलेश यादव, तृणमूल काँग्रेसच्या खासदार महुआ मोईत्रा आणि सुष्मिता देव आणि काँग्रेसच्या सदस्या संजना जाटव आणि जोतिमणी यांच्यासह नेते बॅरिकेडवर चढले आणि घोषणाबाजी केली.

ताब्यात घेतल्यानंतर प्र, राहुल गांधी यांनी म्हणाले की, ही लढाई राजकीय नाही तर संविधान वाचवण्यासाठी आहे,…सत्य संपूर्ण देशासमोर आहे. तर यावेळी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे म्हणाले की, एसआयआरविरुद्धची लढाई लोकांच्या मतदानाच्या अधिकाराचे रक्षण करण्यासाठी आहे आणि भाजपाची भ्याड हुकूमशाही चालणार नाही!.

मोर्चात सहभागी झालेल्या प्रमुख नेत्यांमध्ये टी आर बालू (द्रमुक), संजय राऊत (एसएस-यूबीटी), डेरेक ओ’ब्रायन (तृणमूल काँग्रेस), काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधी वढेरा, समाजवादी पक्षाचे अखिलेश यादव, तसेच द्रमुक, राजद, डाव्या पक्षांसारख्या विरोधी पक्षांचे इतर खासदार सहभागी होते.

About Editor

Check Also

ईडीची मुख्यमंत्री ममता बॅनर्जीच्या विरोधात सर्वोच्च न्यायालयात धाव तपासात अडथळा आणल्याचा आरोप करत दाखल केली याचिका

सक्तवसुली अंमलबजावणी संचालनालयाने अर्थाने ईडी सर्वोच्च न्यायालयात कलम ३२ नुसार याचिका दाखल केली आहे, ज्यामध्ये …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *