‘मतदार अधिकार यात्रे’च्या तिसऱ्या दिवशी लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी भारतीय निवडणूक आयोगावर (ईसीआय) हल्ला सुरूच ठेवला आणि निवडणूक आयोगावर भारतीय जनता पक्ष (भाजपा) सोबत संबध- भागीदारी असल्याचा आरोप केला.
नवादा येथील भगतसिंग चौकात एका जाहीर सभेला संबोधित करताना काँग्रेस नेते राहुल गांधी म्हणाले, भाजपा आणि निवडणूक आयोग यांच्यात भागीदारी सुरू आहे. ते एकत्र मते चोरत आहेत. संविधानाने मतदानाचा अधिकार दिला आहे, जो नरेंद्र मोदी, अमित शाह आणि निवडणूक आयुक्त हिसकावून घेत असल्याचा आरोप केला.
राहुल गांधी पुढे म्हणाले की, भाजपाने निवडणूक आयोगासोबत महाराष्ट्र, हरियाणा आणि मध्य प्रदेशात मते चोरली आहेत. महाराष्ट्रात लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीदरम्यान निवडणूक आयोगाने सुमारे १ कोटी नवीन मतदार निर्माण केले.
राहुल गांधी पुढे म्हणाले की, जेव्हा आम्ही विचारले की हे १ कोटी नवीन मतदार कोण आहेत, तेव्हा निवडणूक आयोगाकडे कोणतेही उत्तर नव्हते. जेव्हा आम्ही व्हिडिओग्राफीची मागणी केली तेव्हा त्यांनी कायदा बदलला. आता बिहारमध्ये, एसआयआर (विशेष सघन सुधारणा) च्या नावाखाली, भाजपा आणि निवडणूक आयोग मते चोरत आहेत. आम्ही त्यांना मत चोरीतून सुटू देणार नाही असा इशाराही यावेळी दिला.
कथित मतदान चोरीच्या परिणामाचे स्पष्टीकरण देताना, राहुल गांधी यांनी निदर्शनास आणून दिले की, प्रथम मतदार कार्ड काढून घेतले जातील, नंतर अदानी आणि अंबानींना रेशन कार्ड आणि जमिनी दिल्या जातील असा आरोप करत पुढे म्हणाले की, निवडणूक आयोगावर ‘एक माणूस, एक मत’ या तत्वाची अंमलबजावणी करत नसल्याचा आरोपही यावेळी केला.
LIVE: #VoterAdhikarYatra | Nawada | Bihar https://t.co/PdFkGtvz60
— Rahul Gandhi (@RahulGandhi) August 19, 2025
राहुल गांधी पुढे म्हणाले की, हा देश काही उद्योगपतींचा नाही. हा देश तरुणांचा, शेतकऱ्यांचा आणि लहान व्यापाऱ्यांचा आहे, पण येथे सर्व काही त्यांच्यासाठी केले जाते. म्हणून, या परिस्थिती बदलण्यासाठी आपण एकत्र आले पाहिजे, असे आवाहन केले.
सभेला संबोधित करण्यापूर्वी, राहुल गांधी यांनी स्थानिक शेतकरी सुबोध कुमार यांना त्यांची कहाणी सांगण्यास सांगितले. त्यांनी राहुल गांधी यांना सांगितले की, त्यांचे नाव २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत मतदान केले असले तरी मसुदा यादीतून काढून टाकण्यात आले आहे.
लोकसभा निवडणुकीत ते स्वतः मतदान एजंट होते. त्यांच्या कहाणीवर, राहुल गांधी यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली की, असे अनेक मतदार आहेत ज्यांचे नाव मतदार यादीत होते आणि आता ते काढून टाकण्यात आले आहे.
राष्ट्रीय जनता दल (राजद) नेते आणि माजी उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांनीही आरोप केला की, निवडणूक आयोग भाजपासोबत मतदानाचा अधिकार हिसकावून घेण्यात गुंतले आहे. ते मतदानाचा अधिकार काढून घेत आहेत, अनेक नावे काढून टाकण्यात आली आहेत आणि जे जिवंत आहेत त्यांना मृत घोषित करण्यात आले आहे. बिहारचे लोक २० वर्षांपासून राज्यात राज्य करणाऱ्या या खतरा सरकारला धडा शिकवतील. माझे काका नितीश कुमारजी बेशुद्ध अवस्थेत आहेत आणि ते बिहारवर नियंत्रण ठेवू शकत नाहीत, अशी टीकाही यावेळी केली.
बिहार विधानसभेतील विरोधी पक्षनेते तेजस्वी यादव म्हणाले की, बिहारच्या विकासात गती निर्माण करण्याची आणि महाआघाडीला पाठिंबा देऊन सध्याचे सरकार उखडून टाकण्याची वेळ आली आहे. आम्ही नवीन दृष्टिकोन असलेले तरुण आहोत आणि तेजस्वी यादव नवीन बिहार बनवण्यासाठी सर्व घटकांना सोबत घेऊन जातील. पंतप्रधान मोदींनी बिहारच्या तरुणांना फसवले आहे आणि हे कॉपीकॅट सरकार असल्याची टीकाही यावेळी केली.
यावेळी तेजस्वी यादव म्हणाले की, पुढील लोकसभा निवडणुकीत राहुल गांधी यांना पंतप्रधान करण्यासाठी मतदान करण्याचे आवाहन उपस्थितांना केले.
विकासशील इंसान पक्षाचे (व्हीआयपी) प्रमुख मुकेश सहानी आणि भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे (मार्क्सवादी-लेनिनवादी) सरचिटणीस दीपांकर भट्टाचार्य यांनी सभेला संबोधित करताना सांगितले की, बिहारमध्ये मतदान होणाऱ्या मतदार यादीतून खऱ्या मतदारांची नावे वगळण्याचे षड्यंत्र सुरू आहे.
आदल्या दिवशी, राहुल गांधींनी पुनामा येथून यात्रा पुन्हा सुरू केली आणि वाटेत, राहुल गांधी वजीरगंज येथे गाडीतून उतरले आणि शाळेतील मुलांना भेटले.
Marathi e-Batmya