ठाणे-नाशिक, मुंबई-अहमदाबाद महामार्गावरील खड्ड्यांची तातडीने दुरुस्ती करण्यासाठी रॅपिड क्विक हार्डनर, एम सिक्टी तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येत असून त्याचे काम प्रगतीपथावर आहे. हे काम तातडीने पूर्ण करुन नागरिकांना वाहतूक कोंडीतून दिलासा देण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राष्ट्रीय महामार्ग, एमएसआरडी, सार्वजनिक बांधकाम, वाहतूक पोलिस विभागाच्या अधिकाऱ्यांना दिले. नाशिक – भिवंडी रस्त्याच्या …
Read More »विद्यार्थ्यांची सुरक्षितता आणि परतीसाठी मुख्यमंत्री शिंदे यांची परराष्ट्र मंत्रालयाशी चर्चा बांग्लादेशात अडकलेल्या विद्यार्थ्यांच्या सुरक्षितता आणि परतीसाठी उपाययोजना
बांग्लादेशातील नागरी अशांततेच्या पार्श्वभूमीवर तेथे अडकलेल्या राज्यातील विद्यार्थ्यांची सुरक्षितता आणि मायदेशात त्यांच्या परतीसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महत्वाची पाऊले उचलली आहेत. या विद्यार्थ्यांना तातडीची मदत उपलब्ध होणे आणि त्यांची भारतात परतण्यासंदर्भातील आवश्यक कार्यवाहीसाठी मुख्यमंत्री शिंदे यांनी परराष्ट्र मंत्रालयाशी संपर्क साधला. बांग्लादेशातील अशांततेमुळे परदेशी नागरिकांच्या, विशेषतः अशांत भागात अडकलेल्या विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेबाबत …
Read More »अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री शिंदे यांच्या पुणे प्रशासनाला सतर्क राहण्याच्या आदेश धोकादायक क्षेत्रातील लोकांना सुरक्षितस्थळी हलविण्यात यावे
भारतीय हवामान खात्याने पुणे आणि जिल्हा परिसरात अतिवृष्टीचा इशारा दिला असून आज जोराचा पाऊस होत आहे. या पार्श्वभूमीवर संपूर्ण प्रशासनाने सज्ज राहावे. नदी आणि धरण परिसरातील संभाव्य धोकादायक क्षेत्रातील नागरिकांना सुरक्षितस्थळी हलविण्यात यावे. आवश्यकता वाटल्यास एनडीआरएफ, एसडीआरएफ आणि सेनादलाची मदत घेण्यात यावी. लोकांचे स्थलांतर केल्यास त्यांच्यासाठी निवारा, कपडे, जेवण, औषधे, …
Read More »पुण्यातील निळ्या पूररेषेतील रहिवाशांच्या पुनर्वसनाचा आराखडा तातडीने तयार करा विमा कंपन्यांशी बोलून नुकसानग्रस्तांना लगेच मदत द्या- मुख्यमंत्री शिंदे
पुण्यात नुकतीच आलेली पूर परिस्थिती वारंवार होऊ नये म्हणून तात्पुरता उपाय म्हणून खडकवासला, एकतानगर, सिंहगड येथे पूर संरक्षक मजबूत भिंत बांधणे सुरु करा असे निर्देश देतांना निळ्या पूर रेषेतील (ब्ल्यू लाईन) नागरिकांचे कायमस्वरूपी पूनर्वसन करण्यासाठी जिल्हाधिकारी, पुणे महानगरपालिका, जलसंपदा विभाग यांनी समन्वयाने तज्ज्ञांच्या सल्ल्याने एक आराखडा तयार करावा, असे निर्देश …
Read More »मुख्यमंत्री शिंदे यांनी राज ठाकरे यांच्या उपस्थितीत दिले आदेश, पोलिसांच्या घरांसाठीचा प्रस्ताव… नियम झुगारणाऱ्या एसआरए विकासकांवर कडक कारवाई करा
विधानसभा निवडणूका जसजशा जवळ येत आहेत, तसेच सत्ताधारी पक्षाबरोबरच त्यांच्या सहयोगी पक्षांकडून मतदारांना आकर्षित करण्याचे प्रयत्न सुरु आहे. या पार्श्वभूमीवर मुंबई पोलिस दलातील कर्मचाऱ्यांचा प्रश्नी आणि वरळीतील बीडीडी चाळीच्या प्रश्नासह झोपु योजनेप्रश्नी मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेत मुंबई महानगरातील पोलिसांच्या घरांसह बीडीडी चाळी, एसआरए …
Read More »राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचे मुख्यमंत्र्यांना लिहिले पत्र तात्काळ पंचनामे करून शेतकऱ्यांना व नागरिकांना सरसकट आर्थिक मदत करा
संपूर्ण महाराष्ट्र ओला आणि कोरड्या दुष्काळाचा सामना एकाचवेळी करत असल्याचे दिसून येत आहे. ही परिस्थिती अत्यंत गंभीर असून तात्काळ पंचनामे करुन नागरिकांना व शेतकऱ्यांना सरसकट आर्थिक मदत करा अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केली. जयंत पाटील यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना याबाबत पत्र …
Read More »वर्ल्ड ॲग्रीकल्चर फोरमतर्फे कृषी पारितोषक २०२४ महाराष्ट्राला जाहीर एक लाख डॉलरचा वैश्विक पुरस्कार
युनोचे सरचिटणीस अँण्टिवो गुट्रेस यांनी शाश्वत विकास, हवामान बदलाशी लढा आणि अन्न सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी तातडीने पाऊले उचलण्याचे आवाहन केले होते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील महाराष्ट्र शासनाने या आवाहनाला सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. राज्यात पर्यावरण रक्षण, अन्न सुरक्षा यांच्या माध्यमातून शाश्वत विकास धोरण राबविली जात आहेत. या सर्व प्रयत्नांची …
Read More »एकतर तुम्ही किंवा मी अशा ईर्षेनेच मैदानात, उद्धव ठाकरे यांचा खणखणीत इशारा कुणाला? देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांना दिला इशारा
खोट्या केसेसमध्ये फसवू पाहणाऱ्याला इशारा देत आता एक तर तू राहशील किंवा मी असा निर्वाणीचा इशारा शिवसेना उबाठाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांना देत आता आदेशाची वाट बघू नका आगामी विधानसभा निवडणूकीच्या तयारीला लागा असे आदेशही यावेळी दिले. शिवसेनेच्या शाखाप्रमुखांचा मेळावा रंगशारदा सभागृहात झाला. यावेळी उद्धव ठाकरे यांनी …
Read More »विजय वडेट्टीवार यांचा सवाल, …त्या अधिकाऱ्याचे निर्णय सरकार रद्द करणार का? सुधाकर शिंदे यांनी आठ महिन्यात घेतलेल्या निर्णयाची चौकशी करा
नियमबाह्य पद्धतीने मुंबई महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त म्हणून कारभार हाती घेणाऱ्या सुधाकर शिंदे यांची अखेरीस बदली झाली. मात्र नियमबाह्य पदावर बसलेल्या अधिकाऱ्याने आठ महिन्यात घेतलेले निर्णय सरकार रद्द करणार का? असा सवाल करत हे देखील सरकारने स्पष्ट करावे अशी मागणी विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केली. पुढे बोलताना विजय वडेट्टीवार …
Read More »राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय, जेंडर ट्रान्सफॉरमेटीव्ह मेकॅनिझम कार्यक्रम राबविणार आतंरराष्ट्रीय कृषी विकास निधीतून मिळणाऱ्या कर्जातून अनुदान देणार
नव तेजस्विनी – महाराष्ट्र ग्रामीण महिला उद्यम विकास प्रकल्पाच्या मुदतीत एक वर्षाची वाढ करण्यात आली आहे. हा कार्यक्रम आता सहा ऐवजी सात वर्षांच्या कालावधीमध्ये राबविण्यात येणार आहे. याशिवाय या कार्यक्रमात जेंडर ट्रान्सफॉरमेटीव्ह मॅकॅनिझम (Gender Transformative Mechanism- GTM) लिंग परिवर्तनीय यंत्रणा राबविण्यास आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी …
Read More »
Marathi e-Batmya