नुकतेच राज्यातील महायुतीचे शेवटचे पावसाळी अधिवेशन पार पडले. त्याचा अखेरचा दिवस काल शुक्रवारी झाला. मागील १० वर्षात राज्याचे अर्थमंत्री अजित पवार यांनी सातत्याने राज्याचा अर्थसंकल्प सादर करण्याचा एकप्रकारे नवा विक्रम स्वतःच्या नावावर नोंदविला. तसेच प्रथेप्रमाणे अधिवेशनाच्या शेवटी दिवशी सरकारच्या जमा खर्चाबाबत राज्य सरकारचा ऑडिट रिपोर्ट अर्थात कॅग अहवालही सादर करण्यात …
Read More »मुख्यमंत्री शिंदे यांचा गौप्यस्फोट, तुमच्याकडचीही मतं आणली, पुढे आम्हीच सत्तेत महाराष्ट्र हेच माझे कुटुंब: प्रत्येक तालुक्यात 'संविधान भवन' उभारणार
विधान परिषदेच्या निवडणूकीनिमित्ताने १२ उमेदवार उभा करत महाविकास आघाडीचे मोठे मोठे नेते म्हणत होते की, आमचा १२ उमेदवार निवडूण येणार म्हणून, पण या निवडणूकीत आम्हाला मिळणारी मते आम्ही मिळवलीच पण महाविकास आघाडीची मतंही आम्ही खेचून घेत ती आमच्याकडे आणली. त्यामुळे आता जी परिस्थिती आज दिसून आली. तीच परिस्थिती येणाऱ्या आगामी …
Read More »विजय वडेट्टीवार यांची मागणी, शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमुक्ती द्या, थकित वीज बील माफ करा शेतकऱ्यांसाठी मदतीचा आव हे महायुतीचे फेक नॅरेटीव्ह
केंद्र आणि राज्य सरकारच्या नो गॅरंटी कारभारामुळे राज्यातील शेतकरी उद्ध्वस्त झाला आहे. निसर्गाची अवकृपा आणि सरकारकडून होणारी फसवणूक यामुळे शेतकरी पिळवटून निघाला आहे. त्यामुळे शेतकरी आत्महत्येत वाढ होत आहे. देशातील एकूण आत्महत्येपैकी ३० टक्के आत्महत्या महाराष्ट्रात होत आहेत. हे भूषणावह नाही. शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबवायच्या असतील तर सरकारने शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमुक्ती …
Read More »नाना पटोले यांचा आरोप, समृद्धी महामार्गाला भेगा, महामार्गातून फक्त सत्ताधाऱ्यांचीच समृद्धी अनिल अंबानींच्या कर्जमाफीसाठी १७०० कोटी आणि ‘लाडकी बहिण’ला मात्र फक्त १५०० रुपये!
राज्यातील महायुती सरकारमध्ये प्रचंड भ्रष्टाचार बोकाळलेला आहे, प्रत्येक विभागात कमीशनखोरी सुरु आहे. ५५ हजार कोटी रुपये खर्च करुन बांधलेल्या मुंबई नागपूर समृध्दी महामार्गाच्या बांधकामातही मोठा भ्रष्टाचार झाला आहे. भ्रष्टाचारामुळेच या महामार्गाला वर्षभरातच भेगा पडल्या आहेत. एकीकडे मृत्यूचा महामार्ग अशी प्रतिमा निर्माण झालेल्या समृद्धी महामार्गातून फक्त सत्ताधाऱ्यांचीच समृद्धी झाली आहे, असा …
Read More »अंबादास दानवे यांचा हल्लाबोल, मदत केली मग शेतकरी आत्महत्या का करतोय सरकारचं कृषीधोरण शेतकरी विरोधी
दुष्काळ, अवकाळी पाऊस, नापिकी, कर्जबाजारीपणा, शेतकरी आत्महत्या , शेतमालाला बाजारभाव पीक विमा आदी समस्येमुळे शेतकरी त्रस्त आहे. सरकार मोठं मोठ्या घोषणा करत, मात्र प्रत्यक्षात शेतकऱ्यांच्या पदरी काही पडत नाही. केंद्र व राज्य सरकारचं धोरण हे बळीराजाचा बोट मोडणार आहे. सरकारचे शेतकऱ्यांप्रती पुतना मावशी प्रेम असून सरकारच कृषीविषयक धोरण शेतकरी विरोधी …
Read More »मुख्यमंत्री शिंदे यांची ग्वाही, …सर्व यंत्रणा २४ तास अलर्ट मोडवर होल्डिंग पाँडस्, मायक्रो टनेलमुळे पाणी निचरा होण्यास मदत
हवामान खात्याने मुंबईला ऑरेंज अलर्ट दिला असून राज्य आपत्ती नियंत्रण विभाग, मुंबई महापालिका, रेल्वे प्रशासन एकत्रितपणे काम करून मुंबईकरांना दिलासा देण्याचं काम करीत आहेत. मुंबईत काल रात्रीपासून २६७ ते ३०० मिलीमीटर एवढ्या मोठ्या प्रमाणावर पाऊस झाला आहे. नागरिकांना मदतीसाठी सर्वोच्च प्राधान्य दिले जात असून सर्व यंत्रणा २४ तास अलर्ट मोडवर …
Read More »मुख्यमंत्री शिंदे यांचे निर्देश, नियमांचे उल्लंघन करणाऱ्या पब्ज, बार, रेस्टॉरंटवरही कारवाई 'ड्रंक अँड ड्राईव्ह' रोखण्यासाठी कडक कारवाया करा
मुंबईतील ड्रंक अँड ड्राईव्हची प्रकरणे रोखण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबई पोलीस आयुक्तांना सूचना दिली असून यासाठी रस्ते, चौक, वर्दळीची प्रमुख ठिकाणे यासह नाक्या-नाक्यांवर वाहनचालकांची तपासणी करून ड्रंक अँड ड्राईव्ह प्रकरणी कडक कारवाया करण्यात याव्यात, अशी सूचना त्यांनी दिली आहे. त्याचबरोबर नियमांचे उल्लंघन करणाऱ्या पब्ज आणि बारवरही कारवाया करण्यात याव्यात, …
Read More »मुख्यमंत्री शिंदे यांचे निर्देश, पावसाच्या पार्श्वभूमीवर यंत्रणांनी सतर्क, सज्ज रहावे मुख्यमंत्र्यांची मंत्रालयातील नियंत्रण कक्षाला भेट
राज्यात सर्वदूर सुरु असलेल्या जोरदार पावसाच्या पार्श्वभूमीवर जिल्हास्तरावरील सर्व यंत्रणांनी सतर्क व सज्ज राहण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत. राज्यात काही दिवसापासून जोरदार पाऊस सुरु आहे. या परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी मुख्यमंत्र्यानी मंत्रालयातील नियंत्रण कक्षास भेट दिली. यावेळी शालेय शिक्षण मंत्री तथा मुंबई शहरचे पालकमंत्री दीपक केसरकर, कौशल्य विकास …
Read More »हिट अॅड रन प्रकरणी मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, कायद्यासमोर सर्व समान शिंदे गटाच्या नेत्याच्या पोरगा अपघात करून झाला फरार
पुणे येथील पोर्शे प्रकरण ताजे असतानाच शिंदे गटाच्या नेत्याच्या पोराने वरळी येथे मच्छिमारी विक्रीसाठी निघालेल्या नवरा बायकोच्या स्कूटरला धडक दिली. विशेष म्हणजे धडक दिल्यानंतरही अपघाती महिलेच्या अंगावरून गाडी घालून फरफटत नेले. त्यानंतर शिंदे गटाच्या नेत्याचा पोरगा फरार झाला. त्यामुळे सत्ताधारी पक्षाच्या नेत्याकडूनच हिट-अॅड-रनचा आणखी एक प्रकार घडला. या प्रकरणी बोलताना …
Read More »उद्धव ठाकरे यांचे आवाहन, येणारी निवडणूक महाराष्ट्राच्या अस्मितेची गद्दार, लाचारांचा महाराष्ट्र अशी ओळख होऊ द्यायची नाही
राज्यातील विधानसभा निवडणूकांचा कालावधी जसजसा जवळ येत आहे. तसतसे राज्यातील सर्वच राजकिय पक्षांनी पक्ष बांधणी आणि मतदारांना बांधून ठेवण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत. सत्ताधारी पक्षाकडून आगामी निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर जनतेला आकर्षित करण्यासाठी माझी बहिण लाडकी योजना सुरु केली. तर दुसऱ्याबाजूला शिवसेना उबाठा गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनीही महाराष्ट्र दौरा सुरु केला आहे. …
Read More »
Marathi e-Batmya