Tag Archives: एकनाथ शिंदे

मुख्यमंत्री शिंदे यांचे आवाहन, केवळ फोटोपुरते योग न करता… रोज करा योग, नियमित रहा निरोग

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी योगाला जगभर प्रसिद्धी मिळवून दिली. त्यातूनच २१ जून हा आंतरराष्ट्रीय योग दिन जगभरात साजरा केला जात आहे. केवळ फोटोपुरते योग न करता योग हा आपल्या जीवनाचा अविभाज्य घटक मानून रोज योग करून निरोग राहण्याचे आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले. गेट वे ऑफ इंडिया येथे मुंबई …

Read More »

अनिल परब यांचा आरोप, मिंधे आणि भाजपाने १२ हजार मतदारांची नावे बाद केली पदवीधर मतदारसंघातील विरोधी उमेदवारांचा पराभव करण्यासाठी निवडणूक आयोगाची मदत

मुंबई, कोकणातील विधान परिषदेवर निवडूण जाणाऱ्या निवडणूकीत आता चांगलीच रंगत निर्माण होत आहे. या पार्श्वभूमीवर पदवीधर मतदारसंघातील शिवसेना उबाठा गटाने नोंदविलेली १२ हजार मते मिधे अर्थात शिंदे गटाने आणि भाजपाने बाद ठरविल्याचा खळबळजनक आरोप मुंबई पदवीधर मतदारसंघातील शिवसेना उबाठा गटाचे उमेदवार अनिल परब यांनी आज शिवालयात आयोजित पत्रकार परिषदेत केला. …

Read More »

राज्यातील महायुती सरकार ८ टक्के दराने २७ हजार कोटींचे कर्ज काढणार आगामी निवडणूका नजरेसमोर ठेवत अर्धवट प्रकल्पासाठी कर्ज पण विभागाचा विरोध

लोकसभा निवडणूकानंतर आता जवळपास विविध निवडणूकांचा सपाटाच राज्यात सुरु झाला आहे. त्यातच आगामी दोन-तीन महिन्यानंतर विधानसभेच्या निवडणूका होऊ घातल्या आहेत. त्यातच राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्याकडून मात्र विकासाचा बोलबाला करत केंद्रातील महाशक्ती सोबत गेले. मात्र नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणूकीत या तिन्ही नेत्यांच्या पक्षाला …

Read More »

रिक्षा-टॅक्सी चालकांसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून महामंडळाची भेट विम्याचे संरक्षण, कुटूंबियांना मोफत उपचार, ग्रॅज्युईटी आणि मुलांना शिक्षणासाठी शिष्यवृत्ती मिळणार

शहरातील रिक्षा आणि टॅक्सी चालवून प्रतिदिनी हातावर पोट असलेल्या लोकांसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वतंत्र महामंडळ स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे. आज शिवसेना प्रवक्ते संजय निरुपम यांच्या पुढाकाराने भेटीसाठी आलेल्या रिक्षा टॅक्सी चालकांच्या शिष्टमंडळाच्या प्रतिनिधींशी बोलताना त्यांनी या महामंडळाच्या अंतर्गत मिळणाऱ्या सोयी सुविधांची माहिती दिली. यावेळी राज्याचे एमएसआरडीसी मंत्री दादाजी …

Read More »

तुकाराम मुंढे यांच्याकडे आता असंघटीत कामगारः वर्षभरात पुन्हा बदली राज्यातील सात सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या

मागील काही वर्षापासून सततच्या बदल्यांमुळे चर्चेत असलेले सनदी अधिकारी तुकाराम मुंढे यांची मंगळवारी पशुसंवर्धन आणि दुग्धविकास विभागाच्या सचिव पदावरून बदली करण्यात आली. वर्षभरात बदली झालेले तुकाराम मुंढे यांना असंघटित कामगार विभागाच्या आयुक्तपदी नियुक्त करण्यात आले आहे. राज्याच्या कुटुंब कल्याण आणि सार्वजनिक आरोग्य विभागाचे आयुक्त म्हणून अमगोथु श्री रंगा नायक यांची …

Read More »

उद्योग मंत्र्यांची शिफारस महिला शिक्षिकेला एमएसआरडीसीत प्रतिनियुक्ती द्या मंत्रालयातील सार्वजनिक बांधकाम विभाग लागला कामाला

राज्य सरकारच्या अखत्यारित असलेल्या विविध असे मिळून जवळपास ३६ खाती आहेत. तर जवळपास विविध स्थानिक स्वराज्य संस्था आणि अंगीकृत महामंडळे आहेत. या सर्व विभागातील कर्मचारी आणि अधिकाऱ्यांसाठी त्या त्या विभागाची एक नियमावली आहे. त्या नियमाच्या आधारेच संबधिक कार्यालयांची कामे, कर्मचारी-अधिकाऱी यांच्या बदल्या, प्रतिनियुक्त्या केल्या जातात. मात्र एका महिला शिक्षिकेने वैद्यकीय …

Read More »

संजय निरूपम यांची मागणी,…राहुल गांधी आणि उद्धव ठाकरे यांनी माफी मागावी वृत्तपत्राने खोट्या बातमीची कबुली दिल्याने उत्तर-पश्चिम मतदार संघातील सत्य अखेर समोर

लोकसभा निवडणुकीत मुंबई उत्तर-पश्चिम मतदार संघातील मतमोजणीबाबत प्रसिद्ध केलेली बातमी खोटी असल्याचे मिड डे या इंग्रजी वृतपत्राने कबुली देत माफी मागितली आहे. याबाबत आक्रमक होत शिवसेना उपनेते आणि प्रवक्ते संजय निरुपम यांनी या वृत्तपत्राचा आधार घेत सोशल मिडियावर फेक न्यूज व्हायरल करणाऱ्या राहुल गांधी आणि उद्धव ठाकरे यांनी जाहीर माफी …

Read More »

मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, उबाठा पेक्षा आपला स्ट्राईक रेट चांगला शिवसेनेच्या वर्धापन दिनाच्या पूर्वतयारीसाठी पक्ष पदाधिकाऱ्यांची बैठक संपन्न

१९ जून रोजी पार पडणाऱ्या शिवसेनेच्या ५८ व्या वर्धापनदिनाच्या तयारीच्या अनुषंगाने आज पक्षाचे सर्व नेते, मंत्री, आमदार आणि पदाधिकाऱ्यांची संयुक्त बैठक आज मुंबईत पार पडली. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पक्ष पदाधिकाऱ्यांशी संवाद साधताना लोकसभा निवडणुकीचा सविस्तर लेखाजोखा मांडला. या निवडणुकीत आपण संभाजीनगर, कोकण, ठाणे पालघर हे सेनेचे सर्व बालेकिल्ले …

Read More »

मुख्यमंत्री शिंदे यांनी दिला अपघातग्रस्तांना मदतीचा हात विक्रोळीजवळील अपघातग्रस्तांना ताफ्यातील गाडी देऊन गोदरेज रुग्णालयात केले दाखल

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संवेदनशील स्वभावाचा पुन्हा एकदा प्रत्यय आला असून रस्त्यावर अपघातग्रस्तासाठी ते देवदूत ठरले. काल रात्री दीड वाजता पूर्व द्रुतगती महामार्गावरून ठाण्यातील आपल्या घराकडे परतत असताना विक्रोळीनजीक दोन दुचाकीस्वारांचा अपघात झाल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. यावेळी त्यांनी तत्काळ गाडी थांबवून या अपघातग्रस्त नागरिकांची चौकशी करून त्यांना मदतीचा हात दिला. …

Read More »

विधानसभेच्या तोंडावर मुख्यमंत्री शिंदे यांचे वारकरी दिंड्याना वीस हजार रुपयांचे अनुदान वारकऱ्यांच्या मागणीनुसार दौंडचा प्रस्तावित कत्तलखाना रद्द, वारकऱ्यांना अपघात गटविमा, वाहनांना टोल माफी

नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणूकांमध्ये महाराष्ट्रातील महाविकास आघाडीच्या तुलनेत महायुतीतील भाजपा, एकनाथ शिंदे यांच्या शिवसेना आणि अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला एक ते दिड टक्का मतदान कमी झाल्याची माहिती भाजपा नेते देवेंद्र फडणवीस यांनी दिली. त्यानंतर आगामी विधानसभा निवडणूकीला अद्याप तीन ते चार महिन्यांचा अवकाश असला तरी कमी झालेल्या मतांची टक्केवारी …

Read More »