Tag Archives: एकनाथ शिंदे

महायुती सरकारचे शेवटचे पावसाळी अधिवेशन, अर्थसंकल्प सादर होणार राज्य विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन २७ जूनपासून मुंबईत

देशातील लोकसभा निवडणूका नुकत्याच पार पडल्या. त्याचा निकालही जाहिर झाला. मात्र ऐन मार्च महिन्यात लोकसभा निवडणूकीची आचारसंहिता लागू असल्याने त्या महिन्यात राज्याचा अर्थसंकल्प सादर करता आला नाही. त्यामुळे विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशात अर्थसंकल्प सादर करणार असल्याची माहिती यापूर्वीच अजित पवार यांनी दिली होती. त्यातच राज्यातील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, …

Read More »

शिंदे गटाच्या प्रतापराव जाधव यांची राज्यमंत्री पदावर बोळवण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळात पुन्हा कमी दर्जाचे मंत्रीपद

लोकसभा निवडणूकीनंतर भाजपाने एनडीएचे सरकार स्थापन करण्यासाठी पुढाकार घेतला. तसेच उद्धव ठाकरे यांच्यापासून वेगळी भूमिका घेतलेल्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनाही भाजपाच्या मदतीने हिसकावून घेतली. या निवडणूकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाने ७ खासदार निवडूण आणले. तसेच शिंदे गटाने केंद्रीय मंत्रिमंडळात दोन मंत्री पदेही मागितली होती. मात्र भाजपाने एकनाथ शिंदे …

Read More »

शरद पवार यांचा मुख्यमंत्री शिंदे यांना इशारा, …अन्यथा मला संघर्षाची भूमिका घ्यावी लागेल दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर शरद पवार यांनी पत्र लिहित दिला इशारा

मागील काही दिवसांपासून मुंबईसह राज्यात दुष्काळाची परिस्थिती वाढत आहे. त्यामुळे पिण्याच्या पाण्याच्या प्रश्नासह जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. याकडे राज्य सरकारचे लक्ष वेधले आहे. मात्र राज्य सरकार अजून अंग झटकून कामाला लागल्याचे दिसून येत नाही. या दुष्काळी परिस्थितीत जनतेचे हाल पहात राहणे कठीण झाले आहे. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने …

Read More »

एकनाथ खडसे यांची भाजपाला टोचणी, राज्यात महाविकास आघाडीच एक्झिट पोलवरून दिली टोचणी

लोकसभा निवडणूकीसाठी काल सातव्या टप्प्यासाठी मतदान पार पडल्यानंतर अनेक प्रसारमाध्यमांनी एक्झिट पोलच्या माध्यमातून कोणत्या राजकिय पक्षाला आणि आघाडीला किती जागा मिळणार याविषयीचा अंदाज व्यक्त केला. मात्र देशातील प्राप्त परिस्थितीचा नेमका विरोधभास दाखविणारे अंदाज सर्वच एक्झिट पोलमधून व्यक्त करण्यात आल्याने अनेकांनी आश्चर्य व्यक्त केले. या एक्झिट पोलवरून भाजपामधील प्रवेशासाठी इच्छुक असलेले …

Read More »

वर्षा गायकवाड यांची टीका, निकृष्ट दर्जाच्या कामामुळे महाभ्रष्ट युती सरकारची पोलखोल… कोस्टल रोडच्या बोगद्यातील गळतीची जबाबदारी निश्चित करून कारवाई करा

मुंबईच्या विकासात महत्वाचा असलेल्या कोस्टल रोडच्या कामाचा दर्जा निकृष्ट असल्याचे पहिल्याच पावसाळ्यात उघड झाले आहे. करोडो रुपयांच्या कोस्टल रोडचे दोन महिन्यांपूर्वी उद्घाटन झाले असून इतक्या लवकर दुरावस्था कशी काय झाली? हे कसले दर्जेदार काम याचे स्पष्टीकरण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सरकारला द्यावेच लागेल, असा प्रश्न विचारून बोगद्यात लागलेल्या गळतीची जबाबदारी निश्चित …

Read More »

शरद पवार आणि संजय राऊत यांच्याकडून मुख्यमंत्री पदावरून परस्परविरोधी दावे

महाराष्ट्रातील लोकसभा मतदानाची प्रक्रिया संपत येत असताना, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते संजय राऊत यांसारख्या विरोधी महाविकास आघाडी (एमव्हीए) नेत्यांकडून जाहिरपणे अलीकडच्या राजकीय भूतकाळात मुख्यमंत्री पदावरून परस्पर दावे करण्यात येत आहेत. संजय राऊत यांनी रविवारी दावा केला की, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे …

Read More »

गजबजलेल्या मुंबईत पंतप्रधान मोदी यांचा महायुतीच्या उमेदवारांसाठी रोड शो

नुकतेच मुंबईतील घाटकोपर येथील ईस्टर्न फ्रि वे मार्गावरील एक अवास्तव होर्डींग कोसळून झालेल्या अपघातात १४ निष्पापांचा प्राण गेला. तसेच अनेक वाहनांचे नुकसान आणि वाहतूक कोंडीच्या समस्येला सामोरे जाण्याची पाळी तीन दिवसांपासून या भागात आहे. मात्र आज संध्याकाळच्या पीक आव्हरला मुंबईकरांसाठी महत्वाची असलेल्या मेट्रोला बंद ठेवत आणि महामार्गावरील वाहतूक तिसरीकडे वळवित …

Read More »

मुख्यमंत्री शिंदे यांचा आरोप नामांतराविरोधात न्यायालयात गेलेले लोक महाविकास आघाडीचे

छत्रपती संभाजी नगर आणि धाराशीव शहरांच्या नामांतरावर उच्च न्यायालयाने शिक्कामोर्तब केल्याने हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे स्वप्न खऱ्या अर्थाने पूर्ण झाले आहे. नामकरणाविरोधात न्यायालयात गेलेले लोक महाविकास आघाडीचे आहेत. या निर्णयामुळे दोन्ही शहरांच्या नावाला विरोध करणाऱ्यांना चपराक बसली असल्याची टीका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे संभाजी नगर दौऱ्यावर …

Read More »

अखेर नाशिकची उत्सुकता संपुष्टातः शिंदे गटाचे हेमंत गोडसेच लोकसभेचे उमेदवार

मागील अनेक दिवसांपासून नाशिक लोकसभा मतदारसंघावरून राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडून आणि शिवसेना शिंदे गटाकडून तर कधी भाजपाकडून दावे-प्रतिदावे करण्यात येत होते. त्यातच लोकसभा निवडणूकीची आचारसंहिता जाहिर झाल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे सुपुत्र तथा खासदार डॉ श्रीकांत शिंदे यांनी नाशिकचे विद्यमान खासदार हेमंत गोडसे यांचे नाव जाहिर केले होते. मात्र …

Read More »

शिंदे गटाकडून अखेर डॉ श्रीकांत शिंदे आणि नरेश मस्के यांना लोकसभेची उमेदवारी जाहिर

कल्याणचे भाजपा आमदार गणपत गायकवाड आणि तेथील स्थानिक शिवसेना शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख यांच्यात एका जमिनीवरून वाद निर्माण झाला आणि त्या वादाचे पर्यावसन थेट पोलिस ठाण्यात गोळीबार झाल्याच्या घटनेत झाले. त्यानंतर हा मतदारसंघ भाजपाकडून पुन्हा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पुत्राला सोडणार का अशी चर्चा सुरु असतानाच काही दिवसांपूर्वी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस …

Read More »