दुष्काळ, अतिवृष्टी, अवकाळी पाऊस, पूर, गारपीट अशा प्रत्येक नैसर्गिक आपत्तीत आमचं सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी भक्कमपणे उभे राहिले आहे. गेल्या दीड वर्षांत आम्ही विविध योजनांच्या माध्यमातून बळीराजाला तब्बल ४४ हजार २७८ कोटी रुपयांची आतापर्यंतची विक्रमी मदत केली असून राज्यातील शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी टास्क फोर्सचं पुनर्गठन करण्याचा, धान उत्पादक शेतकऱ्यांना यावर्षी प्रति …
Read More »अवकाळीमुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मुख्यमंत्र्यांच्या हस्ते मदत
अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीपोटी बाधित शेतकऱ्यांना मदत वाटपास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते प्रारंभ करण्यात आला. नोव्हेंबर मध्ये हा अवकाळी पाऊस झाला होता. या पावसामुळे झालेल्या पिकाच्या नुकसानातून दिलासा म्हणून बाधित शेतकऱ्यांना आज प्रतिनिधिक स्वरुपात धनादेश देण्यात आले. विधानभवनातील मंत्रिमंडळ सभागृहात झालेल्या या कार्यक्रमास उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, …
Read More »मराठा- कुणबी आरक्षणासाठीचा शिंदे समितीचा दुसरा अहवाल शासनास सादर
राज्यातील मराठा- कुणबी, कुणबी -मराठा जातीच्या नोंदीसाठी आवश्यक पुराव्यांची तपासणी करणे व प्रमाणपत्र देण्याची कार्यपद्धती निश्चित करण्यासाठी नेमलेल्या न्यायमूर्ती संदीप शिंदे ( निवृत्त) समितीने तयार केलेला अहवाल आज राज्य शासनास सादर करण्यात आला. विधानभवनाच्या मंत्रिमंडळ कक्षात हा अहवाल न्या. शिंदे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना सुपूर्द केला. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र …
Read More »मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, राजावाडी हॉस्पिटलची क्षमता वाढवणार
राजावाडी हे रुग्णालय मुंबईकरांसाठी महत्त्वाचे आहे. या रुग्णालयाची क्षमता १००० बेडपर्यंत वाढविण्याचा मानस असून अत्याधुनिक सुविधा येथे उपलब्ध करून देण्यावर भर देण्यात येईल. हॉस्पिटलमधील स्वच्छतेवर विशेष भर देण्यात येत असून बृहन्मुंबई महानगरपालिकेची सर्व रुग्णालये सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल करण्यावर भर देण्यात येत आहे. रुग्णालयात असताना नागरिकांना औषधे बाहेरुन आणावी लागू नयेत …
Read More »मुख्यमंत्री शिंदे यांच्याकडून जुन्या पेन्शनबाबत मोठी घोषणा, अर्थसंकल्पिय….
जुन्या पेन्शन योजनेसंदर्भात अंतिम निर्णय येत्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात घेण्यात येईल अशी ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज विधानसभेत दिली. यासंदर्भात निवेदनाद्वारे माहिती देताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, राज्यातील अधिकारी, कर्मचाऱ्यांना जुनी सेवा निवृत्ती वेतन योजना लागू करण्यासंदर्भात नेमलेल्या समितीचा अहवाल प्राप्त झाला आहे. त्यावर अभ्यास करण्याचे निर्देश देण्यात आले …
Read More »मुख्यमंत्री शिंदे यांची ग्वाही, … ३६ प्राण्यांच्या मृत्यूची चौकशी करणार
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या संभाजीनगर येथील निसर्गकवी बहिणाबाई चौधरी प्राणीसंग्रहालयातील ३६ प्राण्यांच्या मृत्यू प्रकरणाची चौकशी नगरविकास विभागाच्या प्रधान सचिवांमार्फत करण्याचा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज विधानसभेत जाहीर केला. हे प्राणीसंग्रहालय वन विकास महामंडळाकडे हस्तांतरीत करण्याचे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी महापालिकेला दिले. यासंदर्भात सदस्या अश्विनी जगताप यांनी प्रश्नोत्तराच्या तासात मुद्दा उपस्थित केला होता. …
Read More »मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शुभेच्छा देऊन राम भक्तांना केले मार्गस्थ
जय श्रीराम, सियावर राम चंद्र की जय..च्या जयघोषात आज मीरा भाईंदर येथील रामसेना फाउंडेशनचे ३०० राम भक्त कार्यकर्ते हे मीरा भाईंदर ते अयोध्या हा प्रवास पायी करण्यासाठी आयोध्येकडे मार्गस्थ झाले. आमदार प्रताप सरनाईक यांच्या पुढाकाराने हा पदयात्रा आयोजित करण्यात आली असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज या पदयात्रेला शुभेच्छा दिल्या. …
Read More »आदित्य ठाकरे यांचा उपरोधिक टोला, ….तो फोटो पाह्यला आणि मला हसूच आलं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा स्वच्छता मोहिमेतील ट्रॅक्टर चालवतानाच्या फोटोवरून टीका
पाच राज्यातील निवडणूकांमध्ये काँग्रेसच्या ताब्यातील तीन राज्ये भाजपाने हिसकावून घेतली आणि काँग्रेसला बऱ्याच वर्षानंतर फक्त दक्षिण भारतातील तेलंगणा राज्यातील सत्ता पुन्हा मिळविता आली. विशेष म्हणजे भाजपाच्या विरोधात निर्माण झालेल्या इंडिया आघाडीच्या बाजूने वातावरण असतानाही भाजपाला मोठ्या प्रमाणात विजय मिळाला. त्यातच राज्यात काँग्रेस, भाजपा आणि वंचित बहुजन आघाडी हे दोन पक्ष …
Read More »प्रधानमंत्री मोदी म्हणाले, …शेतकरी आणि गरजूंचा जगण्याचा स्तर उंचावण्यासाठी कटिबद्ध
भारतातील प्रत्येक नागरिकाचा, गावाचा, शहराचा आणि राज्याचा विकास करण्यासाठी केंद्र आणि राज्य शासनाने विविध योजना हाती घेतल्या आहेत. या योजना देशाच्या कानाकोपऱ्यात पोहोचाव्यात, त्यांचा नागरिकांना लाभ मिळावा यासाठी विकसित भारत संकल्प यात्रा सुरू केली आहे. या यात्रेच्या माध्यमातून भारतातील महिला, युवक, शेतकरी, खेळाडू आणि गरजूंच्या जीवनाचा स्तर उंचावण्याचा संकल्प करण्यात …
Read More »मुख्यमंत्री आणि केंद्रीय संरक्षण मंत्री यांच्या हस्ते द सीएसआर जर्नल एक्सलन्स अवॉर्ड
सामाजिक जबाबदारी कायदेशीररित्या बंधनकारक असलेल्या कोणत्याही कर भरण्यापेक्षा वेगळी आहे. जेव्हा आपण कोणताही कर भरतो तेव्हा समाज आपल्याशी जोडला जात नाही. देशाच्या, समाजाच्या कल्याणासाठी मदत करतो तेव्हा अनेक व्यक्ती, समाज आपल्याशी जोडला जातो. त्यामुळे कॉर्पोरेट क्षेत्राने स्वयंप्रेरणेने देशाच्या उन्नतीसाठी योगदान द्यावे, असे प्रतिपादन संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी केले. बॉम्बे …
Read More »
Marathi e-Batmya