मुख्यमंत्री शिंदे यांची माहिती, मराठा समाजाला आंदोलन करण्याची वेळ येणार नाही

सर्वोच्च न्यायालयात राज्य सरकारने दाखल केलेली क्युरेटीव्ह पिटीशन स्विकारली असून या याचिकेवर २४ जानेवारी न्यायालयाने सुनावणी ठेवली आहे. त्यावेळी राज्य सरकारच्यावतीने भक्कमपणे बाजू मांडू आणि न्यायालयात सांगू की मराठा समाज हा कसा आर्थिक, सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या कसा मागास आहे ते अशी माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सर्वोच्च न्यायालयाने मराठा आऱक्षणासंदर्भात क्युरेटीव्ह पिटीशन स्विकारल्यानंतर एका व्हिडिओच्या माध्यमातून दिली.

तसेच पुढे मुख्यंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, राज्यातील मराठा समाजाच्या मागे राज्य सरकार ठामपणे उभा आहे. त्यामुळे मराठा समाजाने चिंता करण्याचे कारण नाही. तसेच न्यायालयात मराठा समाजाचे आरक्षण टीकावे म्हणून व्यापक असा राज्य मागासवर्ग आयोग आपण स्थापन केला आहे. या आयोगाच्या माध्यमातून आपण सर्व मराठा समाज हा सामाजिक आणि आर्थिक मागास कसा आहे हे दाखवून देऊ अशी ग्वाहीही दिली.

पुढे बोलताना मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, राज्य सरकारने दाखल केलेली क्युरेटीव्ह पिटीशन सर्वोच्च न्यायालयाने दाखल करून घेतल्याने मराठा आरक्षण आंदोलनाचे मनोज जरांगे पाटील आणि मराठा कार्यकर्त्यांना आंदोलन करण्याची वेळ येणार नाही. तसेच मराठा समाजाने आता संयम बाळगावा, राज्यातील कायदा व सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी सर्वांची आहे. राज्य सरकारने दाखल केलेली याचिका सर्वोच्च न्यायालयाने स्विकारल्याने मराठा समाजाच्यासाठी निश्चितच दिलासादायक गोष्ट असल्याचेही सांगितले.

About Editor

Check Also

शिवेंद्रसिंह राजे भोसले यांचा निर्णय, शासकीय निवासस्थानांच्या चटई क्षेत्रफळात वाढ सरकारी कर्मचारी-अधिकाऱ्यांना मोठ्य़ा आकाराची घरे मिळणार

राज्यातील शासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी बांधण्यात येणाऱ्या शासकीय निवासस्थानांच्या चटई क्षेत्रफळात सुधारणा करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *