Breaking News

Tag Archives: एकनाथ शिंदे

विजय वडेट्टीवार यांची टीका, लाडका कंत्राटदारनंतर आता मुख्यमंत्र्यांची लाडका बिल्डर योजना अनुभव नसलेल्या चड्डा या बिल्डरच्या घशात ४००

गृहप्रकल्प न राबविलेल्या चढ्ढा नावाच्या खासगी विकासकाला पंतप्रधान आवास योजनेच्या नावाखाली शासनाने बिनव्याजी ४०० कोटी रुपये मंजूर केले आहेत. त्यामुळे आता मुख्यमंत्री लाडका कंत्राटदार नंतर मुख्यमंत्री लाडका बिल्डर योजना महाराष्ट्रात येणार आहे का? असा संतप्त सवाल करत विधानसभा विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केला. विधानसभा विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांच्या …

Read More »

मुख्यमंत्री शिंदे यांच्या सूचना, सर्व प्रशासकीय यंत्रणांनी सतर्क रहावे हवामान खात्याच्या इशाऱ्यांबाबत लोकांना अवगत करावे

भारतीय हवामान खात्याने मुंबईसह कोकणातील काही जिल्ह्यांमध्ये आज मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. त्याचबरोबर इतरही काही जिल्ह्यांमध्ये पावसाचा इशारा दिला आहे. त्यापार्श्वभूमीवर एसडीआरएफ, जिल्हा प्रशासन, पोलीस, महापालिका, नगरपालिका सतर्क रहावे आणि नागरिकांना सर्वतोपरी मदत करावी, अशा सूचना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्या आहेत. सर्व प्रशासनाने सतर्क राहावे, हवामान खात्याकडून तसेच …

Read More »

“धर्मवीर – २” चित्रपटाचा ट्रेलर लॉन्च “धर्मवीर – २” हा चित्रपट येत्या ९ ऑगस्टला मराठी आणि हिंदी या दोन भाषांमध्ये जगभरात प्रदर्शित केला जाणार

चित्रपटाच्या घोषणेपासूनच उत्सुकता निर्माण केलेल्या “धर्मवीर – २” चित्रपटाचा दमदार ट्रेलर नुकताच लाँच करण्यात आला. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री मा. एकननाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह सुप्रसिद्ध बॉलीवुडस्टार सलमान खान, महाराष्ट्र भूषण अशोक सराफ, सचिन पिळगांवकर हिंदी आणि मराठी चित्रपटसृष्टीतील अनेक मातब्बर कलाकारांची मांदियाळी या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित होती. साहील मोशन आर्ट्सचे …

Read More »

बाळासाहेब थोरात यांचा आरोप, भ्रष्ट मार्गाने बनलेल्या सरकारचा कारभारही भ्रष्टच शिंदे सरकारने ‘लाडका मित्र’ योजनेतून अदानीला मुंबईतील किती कंत्राटे दिली – खासदार वर्षा गायकवाड

मुंबईसह राज्यातील गुन्हेगारीमध्ये मागील दोन वर्षात प्रचंड वाढली असून अमली पदार्थांचा काळाधंदाही फोफावला आहे. ड्रग्जच्या धंद्यामागे कोण आहेत त्याच्या मुळाशी जाऊन रॅकेट उद्ध्वस्थ केले पाहिजे. महायुती सरकारच्या काळात सर्वच क्षेत्रात भ्रष्टाचार बोकाळला आहे. पहिल्यात पावसात मुंबईतील रस्त्यांची अवस्था वाईट झाली, नालेसफाईच्या कामातही प्रचंड भ्रष्टाचार झाला. आमदारांच्या किमती ठरवून घोडेबाजार बनवला …

Read More »

जितेंद्र आव्हाड यांनी तो संदर्भ देत म्हणाले, लाडका भाऊ अशी योजनाच नाही मुख्यमंत्री शिंदे यांची जितेंद्र आव्हाड यांच्याकडून पोलखोल

लोकसभा निवडणूकीच्या दरम्यान काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पाच गॅरंटी जाहिर केली होती. या पाच गॅरंटी मध्ये देशात काँग्रेसचे सरकार आल्यानंतर बेरोजगार तरूणांसाठी बेरोजगार भत्ता तर महिलांसाठी दरमहा ८५०० रूपये देणार असल्याची घोषणा केली होती. नेमक्या याच घोषणांच्या धर्तीवर राज्यातील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अर्थसंकल्प सादर करण्याच्या काही दिवस आधी …

Read More »

मुख्यमंत्री शिंदे यांची घोषणा, शासकिय केंद्रावर भरले जाणारे अर्जच ग्राह्य पैसे मागणाऱ्याला तुरुंगात पाठवा

नुकतेच आषाढी एकादशीच्या निमित्ताने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लाडकी बहिण योजना जाहिर केल्यानंतर राज्यातील बेरोजगार तरूणांसाठी लाडका भाऊ योजना जाहिर केली. तसेच महिलांप्रमाणे राज्यातील बेरोजगार तरूणांसाठी महिना ६ हजार, ८ हजार आणि १० हजार रूपयांचे मासिक भत्ता देण्याची घोषणा केली. मात्र लाडकी बहिण योजनेसाठी भरण्यात येणाऱ्या अर्जासाठी काही राज्य सरकारी …

Read More »

अण्णा भाऊ साठे संशोधन व प्रशिक्षण संस्था (आर्टी) ची स्थापना राज्य सरकारच्या सामाजिक न्याय विभागाकडून शासन निर्णय जारी

राज्यातील मातंग समाजाच्या सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक, सांस्कृतिक व राजकीय असा सर्वांगीण विकास करण्यासाठी शासनाने महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. डॉ.बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी) पुणे या संस्थेच्या धर्तीवर मातंग समाजासाठी अण्णा भाऊ साठे संशोधन व प्रशिक्षण संस्था(आर्टी) संस्था कंपनी नोंदणी कायदा, २०१३ अंतर्गत नियम ८ नुसार स्थापन करण्यास मान्यता …

Read More »

नाना पटोले यांचे मुख्यमंत्र्यांना पत्र, विशाळगडावर दंगली घडवण्याचे षडयंत्र… गजापूर दंगलीला वेगळा रंग देण्याचा गृहमंत्र्यांचा प्रयत्न; गृहमंत्र्यांचे विधान दंगेखोरांना पाठबळ देणारे

राजर्षी शाहू महाराज यांनी सर्व जाती धर्मांना सोबत घेऊन राज्य केले म्हणूनच त्यांना लोकराजे म्हणतात पण त्यांच्याच करवीर नगरीत सामाजिक सलोखा बिघडवण्याचे पाप केले जात आहे आणि तेही केवळ राजकीय फायद्यासाठी, हे अत्यंत दुर्देवी आणि चिंताजनक आहे. विशाळगड हिंसाचाराचे प्रकरण हे महाराष्ट्राला काळीमा फासणारे आहे. विशाळगडावरील अतिक्रमणाच्या नावाखाली गजापूर गावात …

Read More »

मुख्यमंत्री शिंदे यांची घोषणा, बहिणीबरोबर लाडक्या भावासाठीही योजना तीर्थक्षेत्र पंढरपूरच्या सर्वांगीण विकासासाठी शासन कटिबद्ध

आषाढी एकादशी निमित्त राज्यातील लाखो भाविक विठुरायाच्या दर्शनासाठी पंढरपुरात दाखल झाले असून पंढरपूर नगरी भक्ती रसात न्हाऊन निघाली आहे. वारकऱ्यांना सर्व सोयी सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी आणि पंढरपूर तीर्थ क्षेत्र सर्वांगीण विकासासाठी शासन कटिबद्ध आहे, अशी ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देत राज्यातील बहिणीसाठी जाहिर करण्यात आलेल्या योजनेसोबतच राज्यातील लाडक्या …

Read More »

दिमाखदार सोहळ्यात “धर्मवीर – २” चित्रपटाचं म्युझिक लाँच चित्रपटाला सुप्रसिद्ध गायकांचा स्वरसाज

स्वर्गीय आनंद दिघेच्या हिंदुत्त्वाची गोष्ट उलगडण्यासाठी सज्ज असलेल्या “धर्मवीर – २” या चित्रपटाविषयी प्रचंड उत्सुकता निर्माण झाली आहे. नुकतेच या चित्रपटाचे म्युझिक लाँच सुप्रसिध्द ज्येष्ठ गायक सुरेश वाडकर यांच्या हस्ते गडकरी रंगायतन,ठाणे येथे मोठ्या दिमाखात संपन्न झाले. याप्रसंगी चित्रपटाचे निर्माते, दिग्दर्शक, कलाकार, म्युझिक टीम आणि इतर मान्यवर मंडळी आवर्जून उपस्थित …

Read More »