Breaking News

Tag Archives: एकनाथ शिंदे

जयंत पाटील यांची टीका, ब्रिटीशांच्या रौलेट ॲक्टच्या धर्तीवर महायुतीचा ‘महाराष्ट्र जनसुरक्षा कायदा’ शहरी नक्षलवादाच्या नावाखाली पुरोगामी चळवळींना लक्ष्य करण्याचा स्पष्ट उद्देश यातून दिसतोय

राज्यात येऊ घातलेल्या महाराष्ट्र जनसुरक्षा कायद्यावर जोरदार हल्ला चढवित शहरी नक्षलवादाच्या नावाखाली पुरोगामी चळवळींना लक्ष्य करण्याचा सरकारचा उद्देश आहे. त्यामुळेच ब्रिटीशांच्या रौलेट अॅक्टच्या धर्तीवर महायुती सरकारकडून महाराष्ट्र जनसुरक्षा कायदा आणण्यात येत असल्याची टीका राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केला राज्यातील महायुती सरकारवर केली. या कायद्यावर बोलताना …

Read More »

महाराष्ट्र राज्यातील कीर्तनकार व वारकऱ्यांसाठी “मुख्यमंत्री वारकरी महामंडळ सामाजिक न्याय विभागाचा शासन निर्णय प्रसिद्ध

पंढरपूरच्या विठुरायाची यात्रा व आषाढी एकादशी दोन दिवसांनी येऊ घातली असताना राज्यातील तमाम वारकऱ्यांसाठी शासनाने मोठी आनंदाची बातमी दिली आहे. महाराष्ट्र राज्यातील कीर्तनकार व वारकऱ्यांना सोयी सुविधा पुरवण्या करिता “मुख्यमंत्री वारकरी महामंडळ” स्थापन करण्याचा मोठा निर्णय शासनाने घेतला असून त्या संदर्भातील सामाजिक न्याय विभागाचा शासन निर्णय आज प्रसिद्ध करण्यात आला …

Read More »

पंतप्रधान मोदी यांचा दावा, देशात ३ ते ४ वर्षात आठ कोटी नोकऱ्या निर्माण झाल्या नेस्कोच्या मैदानावर आयोजित पंतप्रधान मोदीचे वक्तव्य

रोजगार निर्मिती आणि कौशल्य विकासाविषयी बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, गेल्या ३ ते ४ वर्षात भारतात आठ कोटी नवीन नोकऱ्या निर्माण झाल्या आहेत आणि या आकडेवारीने नोकऱ्यांबद्दल खोटे कथा पसरवणाऱ्यांचे दावे उघडे पडले असल्याचा आरोप पंतप्रधान मोदी यांनी करत कौशल्य विकास आणि रोजगाराची गरज आहे आणि आमचे सरकार या दिशेने …

Read More »

नाना पटोले यांची टीका, कॅगने सरकारच्या मोठमोठ्या दाव्यांचा फुगा फोडला विरोधकांच्या आक्षेपावर कॅगकडूनही शिक्कामोर्तब

महाभ्रष्ठ महायुती सरकारच्या अनागोंदी कारभारावर कॅगने गंभीर ताशेरे ओढल्याने सरकारच्या मोठमोठ्या दाव्यातील हवा निघाली आहे. राज्यावरचा ८ लाख कोटी रुपयांचा कर्जाचा डोंगर चिंताजनक आहे असून पुरवणी मागण्या व कर्जाचे सरकार समर्थन करत असले तरी कॅगने सरकारला इशारा दिला आहे तसाच इशारा विरोधी पक्षांनी महाभ्रष्टयुती सरकारला दिला होता परंतु विरोधकांच्या इशाऱ्याकडे …

Read More »

कॅगचे सरकारला खडेबोल, वास्तववादी अर्थसंकल्प तयार करा राज्याच्या अर्थव्यवस्थेबाबत कॅगने व्यक्त केली चिंता

नुकतेच राज्यातील महायुतीचे शेवटचे पावसाळी अधिवेशन पार पडले. त्याचा अखेरचा दिवस काल शुक्रवारी झाला. मागील १० वर्षात राज्याचे अर्थमंत्री अजित पवार यांनी सातत्याने राज्याचा अर्थसंकल्प सादर करण्याचा एकप्रकारे नवा विक्रम स्वतःच्या नावावर नोंदविला. तसेच प्रथेप्रमाणे अधिवेशनाच्या शेवटी दिवशी सरकारच्या जमा खर्चाबाबत राज्य सरकारचा ऑडिट रिपोर्ट अर्थात कॅग अहवालही सादर करण्यात …

Read More »

मुख्यमंत्री शिंदे यांचा गौप्यस्फोट, तुमच्याकडचीही मतं आणली, पुढे आम्हीच सत्तेत महाराष्ट्र हेच माझे कुटुंब: प्रत्येक तालुक्यात 'संविधान भवन' उभारणार

विधान परिषदेच्या निवडणूकीनिमित्ताने १२ उमेदवार उभा करत महाविकास आघाडीचे मोठे मोठे नेते म्हणत होते की, आमचा १२ उमेदवार निवडूण येणार म्हणून, पण या निवडणूकीत आम्हाला मिळणारी मते आम्ही मिळवलीच पण महाविकास आघाडीची मतंही आम्ही खेचून घेत ती आमच्याकडे आणली. त्यामुळे आता जी परिस्थिती आज दिसून आली. तीच परिस्थिती येणाऱ्या आगामी …

Read More »

विजय वडेट्टीवार यांची मागणी, शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमुक्ती द्या, थकित वीज बील माफ करा शेतकऱ्यांसाठी मदतीचा आव हे महायुतीचे फेक नॅरेटीव्ह

केंद्र आणि राज्य सरकारच्या नो गॅरंटी कारभारामुळे राज्यातील शेतकरी उद्ध्वस्त झाला आहे. निसर्गाची अवकृपा आणि सरकारकडून होणारी फसवणूक यामुळे शेतकरी पिळवटून निघाला आहे. त्यामुळे शेतकरी आत्महत्येत वाढ होत आहे. देशातील एकूण आत्महत्येपैकी ३० टक्के आत्महत्या महाराष्ट्रात होत आहेत. हे भूषणावह नाही. शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबवायच्या असतील तर सरकारने शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमुक्ती …

Read More »

नाना पटोले यांचा आरोप, समृद्धी महामार्गाला भेगा, महामार्गातून फक्त सत्ताधाऱ्यांचीच समृद्धी अनिल अंबानींच्या कर्जमाफीसाठी १७०० कोटी आणि ‘लाडकी बहिण’ला मात्र फक्त १५०० रुपये!

राज्यातील महायुती सरकारमध्ये प्रचंड भ्रष्टाचार बोकाळलेला आहे, प्रत्येक विभागात कमीशनखोरी सुरु आहे. ५५ हजार कोटी रुपये खर्च करुन बांधलेल्या मुंबई नागपूर समृध्दी महामार्गाच्या बांधकामातही मोठा भ्रष्टाचार झाला आहे. भ्रष्टाचारामुळेच या महामार्गाला वर्षभरातच भेगा पडल्या आहेत. एकीकडे मृत्यूचा महामार्ग अशी प्रतिमा निर्माण झालेल्या समृद्धी महामार्गातून फक्त सत्ताधाऱ्यांचीच समृद्धी झाली आहे, असा …

Read More »

अंबादास दानवे यांचा हल्लाबोल, मदत केली मग शेतकरी आत्महत्या का करतोय सरकारचं कृषीधोरण शेतकरी विरोधी

दुष्काळ, अवकाळी पाऊस, नापिकी, कर्जबाजारीपणा, शेतकरी आत्महत्या , शेतमालाला बाजारभाव पीक विमा आदी समस्येमुळे शेतकरी त्रस्त आहे. सरकार मोठं मोठ्या घोषणा करत, मात्र प्रत्यक्षात शेतकऱ्यांच्या पदरी काही पडत नाही. केंद्र व राज्य सरकारचं धोरण हे बळीराजाचा बोट मोडणार आहे. सरकारचे शेतकऱ्यांप्रती पुतना मावशी प्रेम असून सरकारच कृषीविषयक धोरण शेतकरी विरोधी …

Read More »

मुख्यमंत्री शिंदे यांची ग्वाही, …सर्व यंत्रणा २४ तास अलर्ट मोडवर होल्डिंग पाँडस्, मायक्रो टनेलमुळे पाणी निचरा होण्यास मदत

हवामान खात्याने मुंबईला ऑरेंज अलर्ट दिला असून राज्य आपत्ती नियंत्रण विभाग, मुंबई महापालिका, रेल्वे प्रशासन एकत्रितपणे काम करून मुंबईकरांना दिलासा देण्याचं काम करीत आहेत. मुंबईत काल रात्रीपासून २६७ ते ३०० मिलीमीटर एवढ्या मोठ्या प्रमाणावर पाऊस झाला आहे. नागरिकांना मदतीसाठी सर्वोच्च प्राधान्य दिले जात असून सर्व यंत्रणा २४ तास अलर्ट मोडवर …

Read More »