Breaking News

Tag Archives: केंद्रीय निवडणूक आयोग

जितेंद्र आव्हाड यांचे टीकास्त्र, निवडणूक आयोगाच्या गलथानपणाचा मतदारांना फटका

महाराष्ट्रामध्ये पाचव्या टप्प्यात झालेल्या लोकसभा निवडणुकीच्या मतदार यादी मधून अनेकांचे नाव गहाळ झाली होती तर निवडणूक आयोगाच्या गलथानकारभारामुळे अनेक मतदारांना आपला मतदानाचा अधिकार बजावता आला नाही. निवडणूक विभागाकडून करण्यात आलेल्या चुकीमुळे मतदारांना मतदानापासून वंचित राहावे लागले आहे असे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी टीका केली. आज …

Read More »

उद्धव ठाकरे यांचे आवाहन, …उद्याची सकाळ उजडली तरी मतदान कराच

मुंबई आणि एमएमआर परिसरातील अनेक मतदान केंद्रांवर वेळेत मतदानाची प्रक्रिया पार पाडली जात नाही. त्यामुळे अनेक मतदार हे मतदान केंद्रावर वेळ लागत असल्याने मतदान न करताच परतत आहेत अशा तक्रारी सातत्याने येत आहेत. हा वेळ जेणेकरून मतदारांनी मतदानच करू नये यासाठी जाणीवपूर्वक करण्यात येत आहे. तर माझे मतदारांना आवाहन आहे …

Read More »

मतांच्या रिअलटाईम टक्केवारीबाबतच्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी

सर्वोच्च न्यायालयाने शुक्रवारी (१७ मे) भारतीय निवडणूक आयोगाला (ECI) फॉर्म 17-C च्या स्कॅन केलेल्या प्रती आपल्या वेबसाइटवर अपलोड करण्याचे निर्देश मागणाऱ्या अर्जावर उत्तर दाखल करण्यासाठी एका आठवड्याची मुदत दिली आहे. निवडणुकीनंतर लगेचच बूथमध्ये मिळालेल्या मतांच्या संख्येची माहिती तातडीने जाहिर केली जात नाही याबाबत सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली. असोसिएशन …

Read More »

लोकसभा निवडणूकीच्या पहिल्या चार टप्प्यात ६६.९५ टक्के मतदान

लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या चार टप्प्यात एकूण मतदान ६६.९५% इतके नोंदवले गेले आहे, निवडणूक आयोगाने गुरुवारी सांगितले की, सध्या सुरू असलेल्या निवडणूक अभ्यासात सुमारे ९७ कोटी मतदारांपैकी ४५.१० कोटी मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने जारी केलेल्या एका निवेदनात, मतदान पॅनेलने मतदारांना येत्या टप्प्यात मोठ्या संख्येने बाहेर पडून मतदान …

Read More »

मुंबईत २० मे रोजी मतदानासाठी कामगार, अधिकारी- कर्मचाऱ्यांना पगारी सुट्टी

लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-२०२४ च्या अनुषंगाने राज्यात तसेच महाराष्ट्र राज्याच्या सीमेलगतच्या निवडणूक होणाऱ्या मतदान क्षेत्रात मतदार असलेले कामगार, अधिकारी, कर्मचारी यांना जरी ते कामानिमित्त निवडणूक होणाऱ्या क्षेत्राबाहेर कार्यरत असले तरीही निवडणुकीच्या दिवशी मतदानाचा हक्क बजावण्यासाठी पगारी सुट्टी देण्यात यावी, असे निर्देश मुंबई शहराचे जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी संजय यादव यांनी …

Read More »

मतदान ओळखपत्र नसेल तरी करता येणार मतदान

मतदान करण्यासाठी भारत निवडणूक आयोगाने मतदार छायाचित्र ओळखपत्राव्यतिरिक्त इतर १२ पुरावे ओळखीचे पुरावे म्हणून ग्राह्य धरले असून त्यापैकी कोणताही एक पुरावा दाखविल्यानंतर मतदारांना मतदान करता येणार आहे, अशी माहिती मुंबई शहर जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी संजय यादव यांनी दिली आहे. मुंबई शहर जिल्ह्यात पाचव्या टप्प्यात सोमवार २० मे २०२४ …

Read More »

राजकीय पक्ष व उमेदवारांनी आदर्श आचारसंहितेचे पालन करावे

राजकीय पक्षांनी सार्वत्रिक लोकसभा निवडणूक, २०२४ च्या कालावधीमध्ये आदर्श आचारसंहितेचे पालन करणे आवश्यक आहे.निवडणूक काळामध्ये कुठल्याही प्रलोभनाच्या अवैध वस्तूची वाहतूक करण्यास आदर्श आचारसंहितेअंतर्गत निर्बंध आहे.राजकीय पक्ष व उमेदवारांनी आदर्श आचारसंहितेचे पालन करावे असे आवाहन मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयामार्फत करण्यात आले आहे. राज्यस्तरावरून मुख्य निवडणूक अधिकारी व जिल्हा स्तरावरून जिल्हा निवडणूक …

Read More »

मुंबई शिक्षक मतदार संघाची निवडणूक तारीख पुढे ढकलण्यासाठी शर्थीचे प्रयत्न

भारत निर्वाचन आयोगाने ८ मे रोजी प्रेस नोट जारी करत मुंबई शिक्षक मतदार संघासह राज्यातील शिक्षक, पदवीधर मतदार संघांच्या निवणुकांचा कार्यक्रम जाहीर केला. त्यानुसार या मतदारसंघांसाठी १० जून २०२४ रोजी मतदान होणार आहे. मात्र शाळा १५ जून नंतर सुरू होणार असल्यामुळे सुट्ट्यांवर गेलेल्या शिक्षक मतदारांमध्ये संभ्रमाचे वातावरण आहे. याच पार्श्वभूमीवर …

Read More »

विधान परिषद शिक्षक, पदवीधर मतदारसंघाची द्वैवार्षिक निवडणूक जाहीर

भारत निवडणूक आयोगाने महाराष्ट्र विधानपरिषदेच्या शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघाची निवडणूक जाहीर केली आहे. मुंबई पदवीधर, कोकण विभाग पदवीधर, नाशिक विभाग शिक्षक तसेच मुंबई शिक्षक मतदारसंघ अशा ४ जागांकरिता निवडणूक होत असून यासाठी सोमवार, १० जून २०२४ रोजी मतदान होणार आहे. विलास विनायक पोतनीस (मुंबई पदवीधर मतदारसंघ), निरंजन वसंत डावखरे (कोकण …

Read More »

भारत निवडणूक आयोगाचे खर्चविषयक निवडणूक निरीक्षक दाखल

लोकसभा सार्वत्रिक निवडणूक -२०२४ करिता मुंबई उपनगर जिल्ह्यातील चारही लोकसभा मतदारसंघांसाठी भारत निवडणूक आयोगाने खर्च विषयक बाबींसाठी निवडणूक निरीक्षकांची नियुक्ती केली आहे. हे सर्व निरीक्षक जिल्ह्यात दाखल झाले असून त्यांनी आपापल्या लोकसभा मतदारसंघात खर्चविषयक बाबींचा आणि निवडणूक विषयक बाबींचा आढावा घेण्यास सुरुवात केली आहे. खर्चविषयक बाबीसंदर्भात नागरिकांना संपर्क साधण्यासाठी या …

Read More »