आज आठवड्याचा पहिला दिवस मात्र सोमवारी पहाटेपासून सकाळी सात वाजेपर्यंत मुंबईत अतिवृष्टी झाली. जवळपास ३०० मिलीमीटर पाऊस झाल्याची नोंद झाली. त्याचा परिणाम मुंबईतील रस्ते वाहतूकीबरोबरच लांब पल्ल्याच्या गाड्या आणि लोकल सेवेवरही परिणाम झाला. त्यामुळे शनिवार-रविवार सुट्टीसाठी आपापल्या मतदारसंघात गेलेले अनेक आमदार मुंबईला जाणाऱ्या रेल्वेत बसले खरे पर्यंत मुंबईच्या उपनगरातच अडकून …
Read More »देवेंद्र फडणवीस यांची घोषणा, वीज कंपनीच्या अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या वेतनात वाढ मूळ वेतनात १९ टक्के व सर्व भत्त्यांमध्ये २५ टक्के वाढ
ऊर्जा विभागाच्या अधिपत्याखाली महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनी मर्यादित, महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी मर्यादित, महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनी मर्यादित या वीज कंपन्यांतील अधिकारी आणि कर्मचारी यांच्या मूळ वेतनात १९ टक्के व सर्व भत्त्यांमध्ये२५ टक्के वाढ देण्यात येत असल्याचे, उमुख्यमंत्री तथा ऊर्जामंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. आज सह्याद्री अतिथी …
Read More »सुप्रिया सुळे यांचा आरोप, राज्यात गुन्हेगारीत वाढ, हे गृहमंत्र्यांचे अपयश महाराष्ट्रातला क्राईम वाढला, अगोदर नागपूर केंद्र असायचं आता पुणे
गेल्या काही महिन्यांपासून पुणे शहरात आणि जिल्ह्यात तसेच महाराष्ट्रामध्ये देखील गुन्हेगारीच्या घटनांत वाढ झाली आहे. पोर्शे कार अपघात, ड्रग्ज, आणि महिलांवरील अत्याचार मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे हे मी नव्हे तर केंद्र सरकारचे आकडेवारीवरून स्पष्ट होत आहे हे पूर्णपणे महाराष्ट्राचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे अपयश आहे असा हल्लाबोल राष्ट्रवादी काँग्रेस …
Read More »नाना पटोले यांचा टोला, ७० दिवसानंतर खरी मॅच सुरु होईल तेंव्हा… कॅच घेईल राज्यातील पोलीसही असुरक्षित, गृहमंत्र्यांच्या फक्त घोषणा, कृती मात्र शून्य
शिवसेना खासदार रविंद्र वायकर यांच्यावर भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप असताना मुंबई पोलिसांनी त्यांना क्लिन चीट देणे म्हणजे भाजपाच्या वॉशिंगमशीन मधून वायकरांना स्वच्छ केल्याचे आणखी एक प्रकरण आहे. मोदी सरकार हे ईडी व सीबीआय या दोन कार्यकर्त्यांच्या मार्फत राजकारण कसे करते हे देशाने पाहिले आहे. अशी एखादी घटना समजू शकतो पण अनेक …
Read More »मुख्यमंत्री शिंदे यांची घोषणा, विश्वचषक विजेत्या भारतीय संघाला अकरा कोटींचे पारितोषिक विधानभवनात कर्णधार रोहित शर्मांसह सहकाऱ्यांचा विशेष सन्मान
भारत हा क्रिकेटमध्ये विश्वगुरू आहे. हे आपल्या टी-20 विश्वचषक विजेत्या संघाने सिद्ध केले आहे. पराभवाच्या छायेतून विजय खेचून आणून, कर्णधार रोहित शर्मा आणि त्याच्या संघाने भारतीयांची छाती अभिमानाने फुलून यावी अशी कामगिरी केली आहे, अशा शब्दांत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विश्वविजेत्या भारतीय संघावर कौतुकाची उधळण केली. तसेच भारतीय संघासाठी महाराष्ट्र …
Read More »अजित पवार यांचे अर्थसंकल्पावरील चर्चेला उत्तर, हा निर्धाराचा अर्थसंकल्प हा अजित दादाचा वादा जिल्हा विकास निधीतून प्रत्येक जिल्ह्याला ई-पिंक रिक्षा
राज्याच्या सर्वांगीण विकासासाठी यापूर्वी जाहीर करण्यात आलेल्या योजनांसह नवीन योजनांच्या अंमलबजावणीसाठी भरीव निधीची तरतूद करण्यात आली आहे. महिलांना स्वयंरोजगारासाठी ई-पिंक रिक्षा योजनेचा विस्तार, श्री ज्योतिबा मंदिर व परिसर विकास उत्कर्ष प्राधिकरणाची स्थापना, जगद्गुरु संतश्रेष्ठ श्री निवृत्तीनाथ महाराज यांचे समाधीस्थळ असलेल्या श्रीक्षेत्र त्र्यंबकेश्वर येथे विकास आराखडा तयार करुन त्यास आवश्यक निधी, …
Read More »झोपू योजनेतील घरे विकण्यासाठी ना – हरकत प्रमाणपत्र ऑनलाईन पद्धतीने देणार मंत्री अतुल सावे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणीस यांची माहिती
झोपडपट्टी पुनर्वसन अर्थात झोपू योजनेतील घरे विक्री करण्यासाठी ना – हरकत प्रमाणपत्र लवकरच ऑनलाईन पद्धतीने दिली जाणार आहेत. अर्ज केल्यानंतर ४५ दिवसांत प्रमाणपत्र मिळणार असल्याची माहिती गृहनिर्माण मंत्री अतुल सावे यांनी विधानपरिषदेत प्रश्नोत्तराच्या तासात दिली. झोपडपट्टी पुनर्वसन योजनेतील घरे विकण्यासाठी लागणारे ना – हरकत प्रमाणपत्रबाबत सदस्य भाई गिरकर यांनी प्रश्न …
Read More »देवेंद्र फडणवीस यांचे आश्वासन, … वीज पुरवठ्याची व्यवस्था तपासणार आशिष जयस्वाल, योगेश सागर, प्राजक्त तनपुरे यांच्या प्रश्नावर फडणवीस यांचे उत्तर
राज्यात बऱ्याच ठिकाणी वेळोवेळी मोठी प्रदर्शने भरविण्यात येतात. तसेच काही शहरांमध्ये ‘गेम झोन’ आहेत. या ठिकाणी स्थानिक प्रशासनाची परवानगी आवश्यक असते. त्यामध्ये वीज पुरवठ्याबाबत परवानगीचाही समावेश असतो. प्रदर्शनांची ठिकाणे, गेम झोन आदी ठिकाणी वीज पुरवठ्याबाबत असलेल्या व्यवस्थेची महावितरणमार्फत तपासणी करण्यात येईल, अशी माहिती उपमुख्यमंत्री तथा ऊर्जा मंत्री देवेंद्र फडणवीस यांनी …
Read More »देवेंद्र फडणवीस यांची घोषणा, पावसाळी अधिवेशनातच पेपर फुटीबाबत कायदा आणणार चालू अधिवेशनातच कायदा आणणार असल्याची जाहिर केले
स्पर्धा परीक्षेच्या अनुषंगाने पेपर फुटीसंदर्भात केंद्र सरकारने कायदा केला आहे. राज्यातही अशा प्रकारचा कायदा आणण्यासंदर्भात कार्यवाही सुरू आहे. पेपरफुटी व गैरव्यवहारांना आळा घालण्यासाठी राज्यात कायदा आणणार असल्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज प्रश्नोत्तराच्या तासात सांगितले. याबाबत सदस्य बाळासाहेब थोरात यांनी प्रश्न उपस्थित केला होता. यावेळी सदस्य राजेश टोपे, आशिष शेलार, …
Read More »नाना पटोले यांची टीका, …बोगस, पोकळ घोषणांचा जुमलेबाज अर्थसंकल्प महिलांना १५०० रुपये देण्याचा निर्णय काँग्रेसच्या न्यायपत्राची नक्कल, पण नक्कल करतानाही ७००० रुपयांची कमीशनखोरी
राज्यातील १२ ते १३ जिल्ह्यात अजून पाऊस पडलेला नाही, शेतकरी पावसाची वाट पहात बसला आहे पण मुंबईतील विधिमंडळात मात्र घोषणांचा पाऊस पडला आहे. अर्थसंकल्पात कोणत्या विभागाला किती निधी देणार याचा यात उल्लेख नाही. कृषी, पाटबंधारे, सामाजिक न्याय, गृहनिर्माण अशी विभागवार निधीची तरतूद नसणारा राज्याच्या इतिहासातील हा पहिला अर्थसंकल्प आहे. ज्या …
Read More »
Marathi e-Batmya