Tag Archives: पंतप्रधान

नाना पटोले यांचा टोला, भाजपाला इतिहासच नाही त्यावर ते काय बोलणार?

देशातील आणिबाणीवरून नुकतेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वक्तव्य केले. त्याचबरोबर भाजपाकडूनही आणिबाणीच्या मुद्यावरून काँग्रेसवर टीका करण्यास सुरुवात केली. भाजपाच्या टीकेला प्रत्त्युतर देताना काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी भाजपाला इतिहासच नाही त्यावर ते काय बोलणार? असा टोला लगावत भाजपाने आधी नीट अभ्यास करायला पाहिजे असा खोचक सल्लाही दिला. टिळक भवन येथे …

Read More »

नरेंद्र मोदी दिवसातून पाचवेळा ड्रेस बदलतातः काँग्रेसने केला तो व्हिडीओ शेअर ओडिशातील अपघाताच्या दिवशी पाच वेळा ड्रेस बदलल्याचा केला आरोप

देशात संयुक्त पुरोगामी आघाडीचे पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या नेतृत्वाखालील सरकार असताना केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील चाकूरकर यांनीही तीन ते चार वेळा कपडे बदलल्याचे फोटो व्हायरल झाल्यानंतर त्यांच्यावर टीकेची झोड उठविली गेली. तसेच कपडे बदलामुळे त्यांना घरीही जावे लागले. मात्र या घटनेशी काहीस साधर्म्य घडणारी गोष्ट नुकतीच काँग्रेसकडून भाजपाचे सर्वेसर्वा तथा …

Read More »

ओडिशातील रेल्वे अपघाताच्या ठिकाणी पंतप्रधान नरेंद्र मोदी पोहोचले जखमींची रूग्णालयात जाऊन केली विचारपूस

ओडिशातील बालासोरा येथे शुक्रवारी सायंकाळी सातच्या सुमारास भीषण अपघात झाला. या अपघातात आतापर्यंत २६१ जणांचे प्राण गेले असून ९०० हून अधिक जण जखमी आहेत. गेल्या दोन दशकातील ही सर्वांत भीषण घटना असल्याचंही म्हटलं जातंय. दरम्यान, याप्रकरणाची पाहणी करण्याकरता पंतप्रधान नरेंद्र मोदी घटनास्थळी भेट देवून परिस्थितीची माहिती घेतली. शुक्रवारी सायंकाळी ही …

Read More »

पृथ्वीराज चव्हाण यांचा सवाल, देशाची बदनामी होत असताना पंतप्रधान गप्प कसे?… बॉलिवूडसह सर्व नामांकित लोकांनी महिला कुस्तीपटूंच्या पाठीशी खंबीरपणे उभे रहावे

रेसलिंग फेडरेशन ऑफ इंडियाचे प्रमुख आणि भाजपा खासदार बृजभूषण शरण सिंह यांच्यावर महिला कुस्तीपटूंनी केलेले आरोप अत्यंत गंभीर आहेत. बृजभूषण यांच्यावर लैंगिक छळ केल्याचा आरोप असून याप्रकरणी कोर्टाच्या आदेशानंतर दोन गुन्हे दाखल केले आहेत. यातील एक एफआयआर पॉक्सो कायद्यांतर्गत नोंदवण्यात आला आहे. असे असतानाही भाजपा खासदार बृजभूषणला अटक होत नाही. …

Read More »

निर्मला सीतारमण यांचा दावा, ९ वर्षांत देशाला मोदींनी दहशतवादापासून मुक्त… मोदी सरकारने गोरगरिबांना विकासाच्या प्रवाहात आणले

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारने गेल्या ९ वर्षांत देशाची सर्वांगीण प्रगती करत असताना, देशातील गोरगरीब, वंचित, शोषित वर्गालाही विकासाच्या मुख्य प्रवाहात आणून सर्वसमावेशक विकासाचा नवा मापदंड तयार केला, असे प्रतिपादन केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी सोमवारी केले. मोदी सरकारच्या ९ वर्षांतील कामगिरीची माहिती देण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत …

Read More »

शरद पवार यांची पंतप्रधान मोदींवर टीका, …चिंता वाटायला लागली नेहरूंची विज्ञानावर आधारीत समाज तयार करण्याची संकल्पना

राजधानी दिल्लीत तत्कालीन पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या सरकारने मंजुरी दिलेल्या नव्या संसद भवनाच्या इमारतीचे आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उद्घाटन केले. या उद्घाटनादरम्यान वैदिक पध्दतीन संसदेच्या परिसरात हवन करण्याबरोबरच अनेक साधू-संताचा वावर संसदेत पाह्यला मिळाला. तसेच ‘सेंगोल’ची लोकसभेत स्थापना करण्यात आली. या पार्श्वभूमीवर देशातील विरोधी पक्षांनी या सोहळ्यावर टाकलेल्या बहिष्काराची …

Read More »

नव्या संसद भवनाच्या उद्घाटनंतर राहुल गांधी ट्विट करत म्हणाले, उद्घाटनाला…. एक फोटो ट्विट करतही मोदींवर काँग्रेसने सोडले टीकास्त्र

दिल्लीतील नव्या संसद भवनाचे आज उद्घाटन झाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या वास्तुचे उद्घाटन झाले असून या कार्यक्रमाचा भव्य सोहळाही अवघ्या देशातील जनतेने पाहिला. नव्या संसद भवनाचे उद्घाटन होताच बहिष्कार नोंदवलेल्या विरोधकांनी पुन्हा एकदा सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधायला सुरुवात केली आहे. काँग्रेसचे राष्ट्रीय नेते राहुल गांधी यांनीही पंतप्रधान नरेंद्र मोदी …

Read More »

नव्या संसदेच्या उद्घाटनानंतर पंतप्रधान मोदी म्हणाले, लोकशाही व्यवस्था नाही तर…परंपरा ६० हजार कामगारांना रोजगार दिला

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते संसदेच्या नव्या इमारतीचं लोकार्पण नुकतंच पार पडलं. पूर्वीपेक्षा मोठी आणि आकर्षक अशी नवी संसद भारताला मिळाली आहे. संसदेच्या उद्घाटनानंतर नव्या संसदेत खासदारांसमोर उभे राहून नरेंद्र मोदी यांनी देशाला संबोधित केलं. यावेळी नरेंद्र मोदी म्हणाले, प्रत्येक देशाच्या विकासात काही क्षण असे येतात, जे अनादी काळासाठी अमर …

Read More »

भारतीयांसाठी हा सूचक संदेश तर नाही नाः सेंगोलची विधिवत नव्या संसदेत प्रतिष्ठापना पहिल्यांदाच मोठ्या प्रमाणावर साधु संत नव्या संसदेत

संयुक्त पुरोगामी आघाडी तत्कालीन पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या काळात नव्या संसद उभारणीचा प्रस्तावाला मंजूरी देण्यात आली होती. मात्र २०१४ साली संयुक्त पुरोगामी आघाडीचे सरकार जाऊन केंद्रात राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे मोदी सरकार सत्तेत आले. त्यानंतर त्या प्रस्तावा पूर्ण करण्याच्यादृष्टीने विचार सुरु झाला. ऐन कोरोना काळ सुरु असतानाही या नव्या संसद उभारणीचे …

Read More »

संसदेच्या उद्घाटनाला हजर राहणार की नाही शरद पवार यांनी केलं स्पष्ट… विश्वासात घेऊन निर्णयच घ्यायचा नसेल तर उद्धाटनाला जाऊ नये

नव्या संसद भवनाच्या उद्घाटन सोहळ्यावरून वाद रंगला आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंना संसदेच्या उद्घाटन सोहळ्याला निमंत्रण नसल्याने विरोधी पक्ष मोदी सरकारविरोधात आक्रमक झाला आहे. विरोधी पक्षाने उद्घाटन सोहळ्याला न जाण्याचा निर्णय घेतला आहे. अशात शनिवारी २७ मे रोजी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी संसद भवन बांधताना विश्वास न घेतल्याचा आरोप …

Read More »