Breaking News

Tag Archives: मुंबई

वर्षा गायकवाड यांचा आरोप, मिठागरांची १५०० एकर जमीन अदानीला देण्याचा डाव मुंबईकरांच्या हक्काच्या जागा मोदानीच्या घशात घालाल तर याद राखा, गाठ धारावीकरांशी आहे !

पात्र-अपात्र मान्य नाही, धारावीकरांना धारावीतच घरे मिळाली पाहिजेत, धारावी पुनर्विकास प्रकल्पाच्या आडून मोदानी सरकार पर्यावरणदृष्ट्या संवेदनशील मिठागरांच्या जमिनी फक्त मोदानी आणि कंपनीच्या फायद्यासाठी देत आहे. कांजूरमार्ग येथील २५६ एकर जमीनच नाही तर मुंबईतील मिठागराच्या सर्व जमिनी सरकार लाडक्या बिल्डर मित्राच्या घशात घालत आहे. मुंबई महानगर क्षेत्रातील जवळपास १५०० एकर मिठागरांची …

Read More »

मध्य रेल्वेने ४ महाकाय होर्डिंग काढले तर १४ होर्डिंगचा आकार केला कमी आरटीआय कार्यकर्त्ये अनिल गलगली यांची माहिती

घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेनंतर सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार मध्य रेल्वेने ४ महाकाय होर्डिंग काढले तर १४ होर्डिंगचा आकार कमी केली असल्याची माहिती आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांस मध्य रेल्वेने दिली आहे. तर पश्चिम रेल्वेने मागितलेली माहिती स्पष्ट नसल्याचे सांगत कारवाईची माहिती दिली नाही. आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांस मध्य रेल्वेकडे सर्वोच्च न्यायालयाच्या …

Read More »

२७ वी ई-गव्हर्नन्सविषयक राष्ट्रीय परिषद मुंबईत दोन दिवस चालणार राष्ट्रीय परिषद

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि केंद्रीय मंत्री डॉ. जितेंद्र सिंह यांच्या हस्ते ‘विकसित भारत : सुरक्षित आणि शाश्वत ई-सेवा वितरण’ या विषयावरील दोन दिवसीय ई-गव्हर्नन्स परिषदेचा मुंबई येथे प्रारंभ होत आहे. प्रशासकीय सुधारणा आणि सार्वजनिक तक्रार निवारण विभाग (डीएआरपीजी) आणि इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय (एमईआयटीवाय) महाराष्ट्र राज्य सरकारच्या सहकार्याने ३ …

Read More »

मुंबई ते गोवा राष्ट्रीय महामार्गावर जड वाहनांना वाहतूक बंदी ५ सप्टेंबर ते ११ सप्टेंबर रोजी गणेशोत्वाच्या काळात जड वाहनांना प्रवेश बंद

गणेशोत्सवासाठी गणेश मुर्तीचे आगमन, गणेशमुर्तीचे विसर्जन, गौरी गणपती विसर्जन, परतीचा प्रवास आदींसाठी सार्वजनिक हितास्तव मुंबई ते गोवा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६६ वर वजनक्षमता १६ टन किंवा १६ टनांपेक्षा जास्त वाहनांना मोटार वाहन अधिनियम १९८८ च्या कलम १५५ मधील तरतुदीनुसार वाहतूक बंदी करण्यात आली आहे. राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६६ वरील मुंबई …

Read More »

निती आयोगाकडून मुंबई महानगराचा २६ लाख कोटींचा अहवाल मुख्यमंत्र्यांना सादर पाच वर्षांत एमएमआरचा जीडीपी दुप्पट करण्याचे उद्दिष्ट: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुंबई महानगर आणि परिसर जागतिक आर्थिक केंद्र बनविण्यासाठी निती आयोगाने केलेल्या अभ्यासाचा अहवाल आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना सुपूर्द करण्यात आला. मुंबईचे सकल देशांतर्गत उत्पादन (जीडीपी) पाच वर्षांत दुप्पट करण्यासाठी सात विविध क्षेत्रांवर निती आयोगाने लक्ष केंद्रीत केले आहे. राज्याचा विकास हा दळणवळण आणि संपर्कांच्या पायाभूत सुविधांवर अवलंबून असतो त्याच …

Read More »

उल्हास नदीच्या पूररेषेचा अभ्यास करून बदलापूरमधील पूरबाधितांविषयी निर्णय घेणार उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माहिती

उल्हास नदीच्या पूररेषेचा अभ्यास करून बदलापूरमधील नदीच्या दोन्ही बाजूच्या पूर बाधितांविषयी सकारात्मक निर्णय घ्यावा. मात्र, त्याचवेळी भविष्यात नागरिकांच्या सुरक्षिततेला बाधा येणार नाही, हे सुद्धा सुनिश्चित करण्याच्या सूचना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्या. मुरबाड विधानसभा मतदारसंघातील कुळगाव-बदलापूर उल्हास येथील नदीवरील पूर नियंत्रण रेषेबाबत निगडित विविध विषयांवर चर्चा करण्यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस …

Read More »

टिळक रूग्णालयाच्या महिला डॉक्टरला रूग्ण व नातेवाईकांकडून मारहाण हल्ल्यानंतर सर्वजण पळून गेले, पोलिसांमध्ये गुन्हा दाखल

मुंबईतील सायन येथील लोकमान्य टिळक रुग्णालयातील एका महिला डॉक्टरला रुग्ण आणि त्याच्या नातेवाईकांनी मारहाण केल्याची घटना घडली असून, ते सर्वजण मद्यधुंद अवस्थेत होते. या घटनेनंतर हल्लेखोर रुग्णालयातून पळून गेल्याने पोलीस त्यांना पकडण्याचा प्रयत्न करत आहेत. दरम्यान या प्रकरणी पोलिसांमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलिसांकडून करण्यात येत आहे. …

Read More »

पियुष गोयल यांची ग्वाही, उत्तर मुंबईतील रखडलेल्या प्रकल्पांची कामे… कांदिवली येथे क्रीडा प्रशिक्षण संकुल उभारणार

मुंबई महानगरपालिका, झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण, म्हाडा आणि एमएमआरडीए च्या अधिका-यांसोबत बुधवारी झालेल्या संयुक्त बैठकीमध्ये उत्तर मुंबई आणि मुंबईतील रखडलेले विविध प्रकल्प कामे मार्गी लावण्यासंदर्भात तसेच वाहतूक कोंडीचा प्रश्न सोडविण्यासाठी महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आल्याची माहिती केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियूष गोयल यांनी बुधवारी दिली. भारतीय जनता पार्टी प्रदेश कार्यालयात झालेल्या …

Read More »

दीपक केसरकर यांची माहिती, मुंबईसाठी ४९० कोटी रूपयांचा निधी स्वच्छ, सुंदर मुंबईसाठी सर्व यंत्रणांनी समन्वयाने काम करावे

मुंबई हे राजधानीबरोबरच जागतिक दर्जाचे शहर आहे. शहरातील नागरिकांच्या हिताची विविध विकासकामे दर्जेदार आणि वेळेत पूर्ण होणे आवश्यक आहे. या कामांसाठी जिल्हा नियोजन समितीमार्फत प्राप्त झालेला निधी वेळेत खर्च करण्यासाठी तातडीने प्रक्रिया सुरू करुन संबंधित सर्व यंत्रणांनी हातात हात घालून काम करावे, असे आवाहन शालेय शिक्षण मंत्री तथा मुंबई शहर …

Read More »

मुख्यमंत्री शिंदे यांचे निर्देश, कुर्ला रेल्वे स्थानकाबाहेरील सॅटीस प्रकल्पाला गती द्या कुर्ला विधानसभा मतदारसंघातील प्रश्नांचा मुख्यमंत्र्यांकडून आढावा

मुंबईतील कुर्ला रेल्वे स्थानकाबाहेरील वाहतूक कोंडीचा प्रश्न सोडवण्यासाठी सॅटीस महत्वपूर्ण ठरणार आहे. मुंबई महापालिकेने सॅटीस प्रकल्पाला गती द्यावी, अशा सूचना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्या. कुर्ला मतदारसंघातील विविध प्रश्नांची आढावा बैठक मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली सह्याद्री अतिथीगृह येथे पार पडली. यावेळी मुंबई शहर जिल्ह्याचे पालकमंत्री दीपक केसरकर, आमदार मंगेश कुडाळकर, माजी खासदार …

Read More »