Breaking News

Tag Archives: मुख्यमंत्री

ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयात मराठा-कुणबी प्रमाणपत्र तपासणीसाठी “विशेष कक्ष”

मराठवाड्यात ‘कुणबी’ नोंदी शोधण्यासाठी जी मोहीम राबविण्यात आली त्याप्रमाणे आता संपूर्ण राज्यभर ही प्रक्रिया मिशन मोडवर राबविण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विभागीय आयुक्त आणि जिल्हाधिकाऱ्यांना दिले होते. यासाठी विभागीय आयुक्त आणि जिल्हाधिकारी कार्यालयांमध्ये यासंदर्भात “स्वतंत्र कक्ष” स्थापन करण्याचे निर्देश देण्यात आले होते. या पार्श्वभूमीवर ठाणे जिल्ह्यात सर्व उपविभागीय अधिकारी, …

Read More »

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सातारा दौऱ्यावर बांबू लागवड प्रकल्पासह स्कुबा डायव्हिंग प्रकल्पाचा घेणार आढावा

राज्यात बांबू लागवडीची महत्त्वाकांक्षी योजना हाती घेण्यात येत असून सातारा जिल्ह्यात मुख्यमंत्र्यांच्या मार्गदर्शनाखाली याचा पथदर्शी प्रकल्प राबविण्यात येत आहे. या प्रकल्पासह कोयना धरणात राबविण्यात येणाऱ्या स्कुबा डायव्हिंगसारख्या जलपर्यटन प्रकल्पांचा आढावा घेण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आजपासून सातारा जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत. सातारा जिल्ह्यातील कांदाटी खोऱ्यातील दरे तांब, अकल्पे येथे ऐन पावसाळ्यात …

Read More »

विजय वडेट्टीवार यांची टीका, विद्यार्थी उपाशी असताना निर्ढावलेली यंत्रणा मात्र तुपाशी सरकारच्या गलथान कारभारामुळे ५० ओबीसी विद्यार्थी अडचणीत

परदेशी शिष्यवृत्तीचे पैसे न दिल्याने ५० ओबीसी विद्यार्थी संकटात आहेत. सरकारचा हा गलथान कारभार पुन्हा समोर आला आहे. सरकारच्या भरोशावर परदेशात गेलेल्या विद्यार्थ्यांनी जेवण, निवास खर्च भागवायचा कसा, हा प्रश्न आहे. इतर मागास बहुजन कल्याण विभाग जाहिरातीसाठी कोट्यवधी रुपयांच्या निधीची तरतूद करतो. पण विद्यार्थ्यांना पैसे देत नाही. यासारखे दुर्दैव नाही. …

Read More »

मुख्यमंत्री शिंदे यांचे आदेश, मराठा आरक्षण प्रगतीचा अहवाल आठवड्याला सादर करा

मराठवाड्यात कुणबी नोंदी शोधण्यासाठी जी मोहिम राबविण्यात आली त्याप्रमाणे आता संपूर्ण राज्यभर ही प्रक्रिया मिशन मोडवर राबविण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज विभागीय आयुक्त आणि जिल्हाधिकाऱ्यांना दिले. विभागीय आयुक्त आणि जिल्हाधिकारी कार्यालयांमध्ये यासंदर्भात स्वतंत्र कक्ष स्थापन करण्याचे निर्देश देतानाच मराठा आरक्षणासंदर्भातील कार्यवाहीच्या कामकाजाच्या प्रगतीचा अहवाल दर आठवड्याला संकेतस्थळावर अपलोड …

Read More »

उदय सामंत यांचा गंभीर आरोप,… सरकारला बदनाम करण्याचा प्रयत्न समाजकंटकांना घेऊन जरांगे-पाटील बदनाम करण्याचा प्रयत्न

मराठा आरक्षण आंदोलनातील मराठा समाजातील तरुणांवरील आंदोलनाच्या केसेस मागे घेण्याच्या सूचना देण्यात आल्या असून राज्यातील ४४१ शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यात येणार आहे . या आंदोलना दरम्यान काही लोकांनी समाजकंटकांना घेऊन हिंसाचार घडवून आंदोलन आणि सरकारला बदनाम करण्याचा प्रयत्न केला असा गंभीर आरोप उद्योगमंत्री उदय सामंत यांनी केला आहे मात्र मनोज …

Read More »

विजय वडेट्टीवार यांचा आरोप, दुष्काळ जाहीर करतानाही सरकारचे राजकारण… ४० पैकी ३५ तालुके सत्ताधारी आमदारांचे

राज्यात चाळीस तालुक्यात दुष्काळ जाहीर करण्यात आला आहे. परंतु हा दुष्काळ जाहीर करत असताना सरकार राजकारण करत असल्याचे निदर्शनास आले आहे. दुष्काळ जाहीर केलेल्या चाळीस तालुक्यापैकी जवळपास ३३ ते ३५ तालुक्यांचे आमदार हे सत्ताधारी पक्षाचे असून त्यात काही मंत्र्यांचेही तालुके आहेत. विरोधी पक्षातील आमदारांच्या फक्त चार ते पाच तालुक्यांचा दुष्काळी …

Read More »

अतुल लोंढे यांचा आरोप, मुख्यमंत्र्यांचे निवासस्थान गुन्हेगारांसाठी पर्यटनस्थळ आहे का ? रेव्ह पार्ट्या आयोजित करणा-या एल्वीस यादवला ‘वर्षा’वरील गणपती आरतीचा मान

मुख्यमंत्र्यांचे सरकारी निवासस्थान ‘वर्षा’ बंगल्यावर सर्वसामान्य लोकांना प्रवेश मिळणे मुश्कील असते. वर्षा वर प्रवेश देताना विविध पातळ्यांवर सुरक्षेची तपासणी केली जाते. पण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या काळात वर्षावर गुंडांना सहज प्रवेश मिळत असल्याचे दिसते. सापांच्या विषाच्या रेव्ह पार्ट्या आयोजित करणा-या एल्वीस यादव सारख्या टुकार युट्युबरला विशेष आमंत्रण देऊन ‘वर्षा’वरील गणपती …

Read More »

आठच दिवसात राज्य सरकारकडून ५ हजार कोटी रूपयांचे पुन्हा कर्ज रोखे दहा वर्षे आणि ११ वर्षाचे अनुक्रमे प्रति २ हजार ५०० कोटींचे कर्जरोखे

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अर्थमंत्री अजित पवार यांच्या पाठीशी असलेल्या महाशक्तीच्या जोरावर राज्यातील सरकार कायदेशीर की बेकायदेशीर या वादात आहे. या सरकारच्या अर्थनीतीमुळे महाराष्ट्राच्या तिजोरीवर चांगलीच गळती लागल्याचे दिसून येत असून आठ दिवसाच्या अंतराने पुन्हा एकदा राज्य सरकारकडून निधी उपलब्ध करण्यासाठी तब्बल ५ हजार कोटी रूपयांचे कर्ज …

Read More »

विजय वडेट्टीवार यांचा आरोप, शासन आपल्या दारी कार्यक्रम अपयशी ठरल्यानेच मंत्रालयाबाहेर… मंत्रालयाबाहेरच्या रांगा म्हणजे राज्यात जनतेची कामे होत नसल्याचा पुरावा

सरकारचा शासन आपल्या दारी हा कार्यक्रम अपयशी ठरला आहे. त्यामुळेच जनतेला शासनाच्या दारी जावे लागत आहे. परंतु शासनाने जनतेची तिथेही अडवणूक केली आहे. मंत्रालयात होत असणाऱ्या आंदोलनाचा सरकारने धसका घेतला असून मंत्रालय प्रवेशासाठी जाचक नियम बनवले आहे. सरकारचे हे अपयश असून मंत्रालयाबाहेरच्या रांगा म्हणजे राज्यात जनतेची कोणतीही कामे होत नसल्याचा …

Read More »

मराठा आरक्षणविषयक सर्वपक्षीय बैठकीत “या” मुद्यावर एकमुखी ठराव राज्यात शांतता, कायदा सुव्यवस्था राखण्याचे आवाहन

मराठा समाजाला आरक्षण देण्याबाबत सर्वांचे एकमत असून कायदेशीर बाबी पूर्ण करूनच टिकणारे आरक्षण देण्यासाठी राज्यातील सर्वच पक्ष एकत्रितपणे काम करायला तयार आहेत. मात्र, राज्यात कुणीही कायदा हातात घेऊ नये, राज्यातील शांतता, कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवावी, असे आवाहन आज सह्याद्री अतिथीगृह येथे झालेल्या सर्वपक्षीय बैठकीत करण्यात आले. तसेच या सर्व …

Read More »