Tag Archives: विधानसभा निवडणूक

जी परमेश्वरा यांची स्पष्टोक्ती, काँग्रेसच्या ५ गॅरंटीसाठी बजेटमध्येच ५६ हजार कोटी तरतूद पंतप्रधान मोदी व भाजपा नेत्यांचा काँग्रेस गॅरंटीबद्ल अपप्रचार, अंमलबजावणीच्या पाहणीसाठी कर्नाटकात त्यांचे स्वागत

कर्नाटकात काँग्रेस पक्षाने विधानसभा निवडणुकीवेळी दिलेल्या ५ गॅरंटींची यशस्वीपणे अंमलबजाणी सुरु असून कर्नाटकातील लाखो लोक या गॅरंटींचा लाभ घेत आहेत. सरकार स्थापन केल्यानंतर पहिल्याच मंत्रिमंडळ बैठकीत ५ गॅरंटी लागू करण्याचा निर्णय घेऊन त्याची अंमलबजावणी सुरु आहे. या ५ गॅरंटीसाठी कर्नाटक सरकारने अर्थसंकल्पातच ५६ हजार कोटी रुपयांची तरतूद केली असल्याने निधीची …

Read More »

कांद्याच्या वाढत्या दराची मुख्यमंत्री शिंदे यांच्याकडून दखल साठेबाज व्यापाऱ्यांवर कडक कारवाईचे निर्देश

सर्वसामान्य नागरिकांना कांद्याच्या वाढत्या दराचा फटका बसत असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी याची गंभीर दखल घेतली आहे. मर्यादेबाहेर कांद्याची साठवणूक करणाऱ्या व्यापाऱ्यांवर कडक कारवाई करण्याचे निर्देश त्यांनी अन्न व नागरी पुरवठा तसेच पणन विभागाला दिले आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पुढे बोलताना म्हणाले की, मोठ्या आणि लहान व्यापाऱ्यांना त्यांनी किती कांदा …

Read More »

निवडणूक आयोगाकडून आता दूरचित्रवाणी अर्थात टीव्हीवरील बातम्यांवर लक्ष दूरचित्रवाणी वाहिन्यांवर दाखविल्या जाणाऱ्या बातम्यांसाठी "इलेक्ट्रॉनिक मीडिया मॉनिटरिंग सेंटर" दक्ष

महाराष्ट्रात विधानसभा सार्वत्रिक निवडणुकांची तयारी सुरू आहे. येत्या बुधवारी म्हणजे २० नोव्हेंबर २०२४ रोजी एकाच टप्प्यात महाराष्ट्रात मतदान होणार आहे. मतदान प्रक्रिया सुरळीत आणि निर्भय वातावरणात व्हावी, यासाठी भारत निवडणूक आयोग तसेच मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालय यांच्याकडून आवश्यक ती खबरदारी घेण्यात येत आहे. भारत निवडणूक आयोगाकडून देशातील दूरचित्रवाणी वाहिन्यांवर निवडणुकांसंबंधित …

Read More »

रमेश चेन्नीथला यांची खोचक टीका, पंतप्रधान नरेंद्र मोदींची हवा संपली… राहुल गांधींच्या उद्या चिमूर व धामणगाव रेल्वे येथे सभा तर प्रियंका गांधींच्या शिर्डी व कोल्हापुरात सभा, १७ तारखेला प्रियंका गांधी गडचिरोली व नागपूरात.

काँग्रेस अनुसूचित जाती व अनुसुचित जमातींचे आरक्षण संपवणार असल्याचा पंतप्रधान नरेंद्र मोदींचा आरोप अत्यंत खोटा व जनतेची दिशाभूल करणारा आहे. काँग्रेस पक्षानेच देशाला संविधान व आरक्षण देऊन मागास जातींना हक्क व अधिकार दिले व वर्षानुवर्षे मनुवाद्यांनी केलेल्या अत्याचारातून त्यांची सुटका केली. आरक्षण व संविधान संपवण्याचे प्रयत्न तर नरेंद्र मोदींचा भारतीय …

Read More »

नवाब मलिक यांच्या अडचणी वाढण्याची शक्यताः दोन आठवड्यानंतर सुनावणी नियमित जामीन अर्जावर उच्च न्यायालयात दोन आठवड्यांनी सुनावणी

माजी राज्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार) नेते नवाब मलिक सध्या अंतरिम वैद्यकीय जामीनावर बाहेर आहेत. विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी मिळाल्याने ते सध्या कोणत्याही आडकाठीविना प्रचारात व्यग्र असल्याच्या दाव्याची उच्च न्यायालयाने गुरूवारी दखल घेतली. मलिक यांनी नियमित जामीनासाठी काही महिन्यांपूर्वी केलेल्या याचिकेवर तातडीने सुनावणी घेण्याचे आणि गुणवत्तेच्या आधारे त्यावर निर्णय देण्याचे …

Read More »

राज्याच्या विधानसभा निवडणूक प्रचारातून पंतप्रधान मोदी यांची एक्झिट मुंबईतल्या सभेत पंतप्रधान मोदीं यांची घोषणा, ही माझी शेवटची सभा

राज्यातील विधानसभा निवडणूकीच्या प्रचारासाठी उमेदवारी अर्ज भरल्यानंतरच्या दुसऱ्या आठवड्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचा प्रवेश झाला. अद्याप चार-पाच दिवस विधानसभा निवडणूकीच्या प्रचाराला शिल्लक राहिलेले असतानाच भाजपा महायुतीच्या प्रचारातून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विधानसभा निवडणूकीच्या प्रचारातून एक्झिट घेत असल्याचे जाहिर केले. मुंबईत महायुतीच्या झालेल्या प्रचारसभेत पंतप्रधान नरेंद्र …

Read More »

मल्लिकार्जून खर्गे यांचे आव्हान,… शेतकऱ्यांच्या सोयाबीन, कांदा, दूध, कापसाच्या भावावर बोला महाराष्ट्राच्या निवडणुकीचा ३७० कलमाशी काय संबंध?

महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी व केंद्रीय गृहमंत्री अमित शाह प्रचार सभांमधून महाराष्ट्राच्या जनतेच्या प्रश्नावर काहीच बोलत नाहीत. इंदिरा गांधींनी पुनर्जन्म घेतला तरी जम्मू काश्मीरमधील ३७० कलम पुन्हा लागू करु शकत नाहीत अशी दर्पोक्ती करत आहेत. महाराष्ट्रातील निवडणुकीत ३७० कलमाचा काय संबंध? महागाई, बेरोजागारी प्रचंड वाढली आहे, महाराष्ट्रातील शेतकरी …

Read More »

मुंबईतील निवडणूक कर्तव्यावरील पोलीस कर्मचाऱ्यांच्या टपाली मतदानाला प्रारंभ पोलीस कर्मचाऱ्यांचे सुविधा केंद्रामध्ये टपाली मतपत्रिकेद्वारे उत्साहात मतदान

राज्यात विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या अंमलबजावणीसाठी प्रशासन सज्ज झाले आहे. निवडणूक कर्तव्यावरील पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांना मतदानाचा हक्क बजावता यावा, यासाठी मुंबई शहर जिल्ह्यातील धारावी, सायन कोळीवाडा, शिवडी, भायखळा, मलबार हिल, मुंबादेवी, कुलाबा या सात विधानसभा मतदारसंघात सुविधा केंद्रामध्ये (Facilitation Centre) आजपासून टपाली मतदानाला प्रारंभ झाला. राज्यात एका टप्प्यात येत्या २० …

Read More »

काँग्रेस नेते राहुल गांधी यांची नांदेडच्या बसस्थानकाला भेट महिला प्रवाशांशी साधला संवाद महागाई आणि बेरोजगारी प्रश्न महिलांकडून उपस्थित

जनतेत मिसळणे, त्यांचे प्रश्न जाणून घेणे या गोष्टी आताच्या राजकिय वर्तुळात दुरापास्त झाले आहे. त्यातच १२ वर्षापासून सत्तेत असलेल्या भाजपाच्या नेत्यांना तर आता जनतेत मिसळून त्यांच्या व्यथा, त्यांचा त्रास जाणून घेण्याचे तर आता विसरूनच गेले असताना काँग्रेस नेते तर राहुल गांधी हे मात्र संधी मिळेल तेव्हा शेतकरी असो, सर्वसामान्य नागरिक …

Read More »

राहुल गांधी यांचा आरोप, भाजपाने महाराष्ट्रातील प्रकल्प गुजरातला पळवून बेरोजगारी वाढवली काँग्रेसने पेसा कायदा आणून आदिवासींचे हक्क अबाधित ठेवले

संविधानाने सर्वांना सन्मानाने जगण्याचा अधिकार दिला आहे पण पंतप्रधान नरेंद्र मोदी संविधानाला रिकामे पुस्तक म्हणतात. संविधान रिकामे पुस्तक नाही तर त्यात बिरसा मुंडा, भगवान बुद्ध, महात्मा गांधी, महात्मा फुले, डॉ. आंबेडकर यांची विचारसरणी आहे. संविधानात भारताचे ज्ञान, देशाचा आत्मा आहे. नरेंद्र मोदींनी संविधानाला रिकामे पुस्तक म्हणून बिरसा मुंडा, भगवान बुद्ध, …

Read More »