Tag Archives: ईडी

बेल्जियममध्ये मेहुल चोक्सी वर उपचार, वकीलाची विशेष न्यायालयात माहिती पीएनबी बँक घोटाळा प्रकरणः मेहुल चोक्सी कर्करोगाने त्रस्त ?

पीएनबी बॅंक घोटाळा प्रकरणातील फरार आरोपी आणि हिऱ्याची व्यापारी मेहुल चोक्सी कर्करोगाने ग्रस्त असल्याचा संशय आहे सध्या तो कर्करोगावर बेल्जियममध्ये उपचार घेत असल्याची माहिती वकिलांनी मंगळवारी विशेष न्यायालयाला दिली. मुंबईतील विशेष पीएमएलए न्यायालय मेहुल चोक्सीला फरार आर्थिक गुन्हेगार (एफईओ) घोषित करण्याच्या अंमलबजावणी संचालनालयाच्या याचिकेवर सुनावणी सुरू आहे. चौक्सी सध्या वैद्यकीय …

Read More »

उच्च न्यायालयाने ईडीला सुनावले, चौकटीत राहून वर्तन करा १ लाख रूपयांचा ठोठावला दंड

मंगळवार मुंबई उच्च न्यायालयाने एका महत्त्वपूर्ण आदेशात अंमलबजावणी संचालनालय (ईडी) वर १ लाख रुपयांचा दंड आकारताना असे निरीक्षण नोंदवले की ईडीसारख्या केंद्रीय संस्थांनी कायद्याच्या चौकटीत राहून स्वतःचे वर्तन करावे आणि कायदा हातात घेऊन नागरिकांना त्रास देणे थांबवावे. एकल न्यायाधीश न्यायमूर्ती मिलिंद जाधव म्हणाले की, नागरिकांना त्रास होऊ नये यासाठी कायदा …

Read More »

सुप्रिया सुळे यांचा सवाल, देशमुख, राऊतांना ईडी, मग कराडला का नाही? बारामतीत शेतकऱ्यांना धमक्या, हे गंभीर

बारामती लोकसभा मतदारसंघांमध्ये ज्या-ज्या शेतकऱ्यांना धमक्या किंवा त्यांचे फसवणूक झाली असेल तर गंभीर आहे. मी तर त्या शेतकऱ्यांशी स्वतः बोलणार आहे. याबाबत मुख्यमंत्र्यांना देखील सांगणार आहे. मुख्यमंत्री गृहमंत्री आहेत, त्यांनाच भेटणार असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी दिली. पुढे बोलताना सुप्रिया सुळे म्हणाल्या की, बीड …

Read More »

खिचडी घोटाळ्याप्रकऱणी सूरज चव्हाण यांच्या अटकेचे ईडीकडून समर्थन खिचडी घोटाळ्याशी संबंधित आर्थिक गैरव्यवहाराचे प्रकरण

कोरोना काळातील खिचडी घोटाळ्याशी संबंधित आर्थिक गैरव्यवहाराप्रकरणी शिवसेना नेते (ठाकरे गट) आदित्य ठाकरेंचे निकटवर्तीय सूरज चव्हाण यांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती. तसेच, राजकीय हितसंबंधांचा वापर करून त्यांनी खिचडी वापटाचे कंत्राट मिळवले होते, त्यामुळे चव्हाण यांची अटक कायदेशीर असल्याचा दावा सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) बुधवारी उच्च न्यायालयात केला. उच्च न्यायालयात सूरज चव्हाण …

Read More »

ईडीची ठाणेसह मालेगाव, नाशिक सूरतसह अन्य ठिकाणी छापेमारी, १२५ कोटींचा आरोप विधानसभा निवडणूकीच्या निमित्ताने आणला होता पैसा

सध्या विधानसभा निवडणूकीच्या निमित्ताने बेनामी पैशाच्या वाटपावरून सातत्याने विरोधकांकडून सत्ताधाऱ्यांवर आरोप केला जात आहे. यापार्श्वभूमीवर ईडीने आज ठाणे, नवी मुंबई, मालेगाव, नाशिक, सूरत व अहमदाबादमध्ये व्यापारी आणि बनावट कंपन्याशी संबधित २४ ठिकाणी ईडीने आज छापेमारी केली. तसेच याप्रकरणी बँक खाती आणि १२५ कोटी रूपयांचा गैरवापर केल्याचा आरोप आहे. मालेगांव येथील …

Read More »

नवाब मलिक यांना पुन्हा ईडीकडून अटकेची शक्यता ? उच्च न्यायालयात धाव घेतल्याने अटकेची शक्यता बळावली

सर्वोच्च न्यायालयाने मनी लाँड्रिंग प्रकरणात महाराष्ट्राचे माजी मंत्री नवाब मलिक यांना ३० जुलैला वैद्यकीय कारणास्तव जामीन मंजूर केला होता. वैद्यकीय जामीन घेताना त्यांनी आपले अनेक अवयव निकामी झाले असून तातडीच्या उपचारांची गरज आहे, असा दावा करण्यात आला होता. त्यामुळे उच्च न्यायालयात नवाब मलिकांच्या जामीनाचे प्रकरण प्रलंबित असल्याने तो निर्णय लागत …

Read More »

ईडीची उच्च न्यायालयात धाव नवाब मलिक यांचा जामीन रद्द करा उच्च न्यायालयात याचिका; जामिनाच्या अटींचे उल्लंघन केल्याचा दावा

माजी मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते (अजित पवार) नवाब मलिक यांनी अंतरिम वैद्यकीय जामिनाच्या अटींचे उल्लंघन केल्या दावा करून त्यांचा जामीन रद्द करावा, अशी मागणी करणारी याचिका मंगळवारी उच्च न्यायालयात करण्यात आली आहे. अंतरिम जामिनाच्या रुपी मिळालेल्या स्वातंत्र्याचा मलिकांकडून गैरवापर सुरू असून निव़डणूक प्रचाराच्या निमित्ताने ते साक्षीदारांना प्रभावित करीत असल्याचा …

Read More »

ईडी कडून फ्लिपकार्ट आणि अॅमेझॉनची चौकशी सुरु दोन्ही कंपन्यांच्या अधिकाऱ्यांना बोलविणार

काही ई-कॉमर्स कंपन्यांच्या विक्रेत्यांवर ईडीने छापे टाकल्यानंतर काही दिवसांनी कथित विदेशी गुंतवणुकीच्या कायद्याच्या उल्लंघनाची चौकशी सुरू केल्याने भारताची आर्थिक गुन्हे एजन्सी फ्लिपकार्ट आणि ॲमेझॉनच्या अधिकाऱ्यांना बोलावेल, असे एका वरिष्ठ सरकारी सूत्राने सांगितले. वॉलमार्टच्या मालकीच्या फ्लिपकार्ट Flipkart आणि ॲमेझॉन Amazon ची भारतातील $७० अब्ज ई-कॉमर्स बाजारपेठेत विक्री झपाट्याने वाढत असताना नियोजित …

Read More »

सर्वोच्च न्यायालयाने अरविंद केजरीवाल अटकेप्रकरणी सीबीआयला फटकारले अटक करण्याआधी न्यायालयाला विचारायला पाहिजे होते

दिल्ली लीकर पॉलिसी प्रकरणी ईडीच्या अटकेत असलेले मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना पुन्हा सीबीआयने अटक केली. या अटकेवरून सर्वोच्च न्यायालयाने सीबीआयवर फटकारत ताशेरे ओढले. यावेळी सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केले की, जेव्हा तुम्ही कोठडीत असाल… तुम्ही त्याला पुन्हा अटक करत असाल, तर तुम्हाला न्यायालयाची परवानगी घ्यावी लागेल. फौजदारी प्रक्रिया संहितेत काहीतरी आहे, …

Read More »

कोरोना घोटाळ्याप्रकरणी संशयात असलेल्या इक्बालसिंह चहल यांच्याकडे गृह विभागाची धुरा मुख्य सचिव सुजाता सौनिक यांच्याकडील गृह विभागाचा अतिरिक्त चार्ज काढला

मुंबई महापालिकेचे आयुक्त म्हणून कामगिरी बजावत असताना कोरोना काळात झालेल्या घोटाळ्या प्रकरणी तत्कालीन पालिका आयुक्त इक्बाल चहल यांना चौकशीसाठी ईडीने बोलावणे होते. तर केंद्रीय निवडणूक आयोगाने लोकसभा निवडणूकीच्या कालावधीत मुंबई महापालिकेच्या आयुक्त पदावरून इक्बाल सिंह चहल यांची उचलबांगडी करण्याचे आदेश दिले होते. परंतु दरम्यानच्या काळात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या जवळचे …

Read More »