Breaking News

Tag Archives: उद्धव ठाकरे

प्रविण दरेकर यांची टीका, ‘मुंगेरीलाल के हसीन सपने’ संजय राऊत बघताहेत मलिन झालेली प्रतिमा सावरण्यासाठी राजीनामा देणे केजरीवालांची स्टंटबाजी

भ्रष्टाचारामुळेच अरविंद केजरीवाल यांना तुरुंगात जावे लागले. त्यांच्या मते जो चेहरा जनतेत दाखविण्याचा होता तो बुरखा फाटलेला आहे. अशावेळी आपली प्रतिमा जनतेच्या मनात मलिन झालीय ती पुन्हा सावरण्यासाठी स्टंटबाजी करण्याचा केविलवाणा प्रयत्न आपल्या स्टाईलप्रमाणे केजरीवाल करू इच्छित असल्याची टीका भाजपा गटनेते आमदार प्रविण दरेकर यांनी केली. पत्रकारांशी संवाद साधताना प्रविण …

Read More »

नाना पटोले यांचे आश्वासन, मंत्रिमंडळाच्या पहिल्याच बैठकीत जुनी पेन्शनचा निर्णय जुनी पेन्शन योजना बंद करण्याचे पाप भाजपाच्या अटलबिहारी वाजपेयी सरकारचे

सरकारी कर्मचा-यांची जुनी पेन्शन योजना लागू करण्याची मागणी राज्यातील व केंद्रतील भाजपा सरकारला टेन्शन वाटते. आता भाजपा सरकारने सुरु केलेली पेन्शन योजना कर्मचा-यांना मान्य नाही पण पंतप्रधान नरेंद्र मोदी खोटे सांगून हीच पेन्शन योजना सरकारी कर्मचा-यांनी मान्य केल्याचा ढोल बडवत आहेत. जुनी पेन्शन योजनाच लागू करावी या सरकारी कर्मचा-यांच्या मागणीला …

Read More »

उद्धव ठाकरे यांचा टोला, नाही तर गणपतीलाही पुढची तारीख दिली असती… न्यायालयाकडून निर्णयाची अपेक्षा करायची की करायची नाही आता जनतेच्या न्यायालायत

दोन तीन दिवसांपूर्वी सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश डी वाय चंद्रचूड यांच्या घरी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे गेले होते. त्यावेळी पंतप्रधान मोदी यांनी चंद्रचूड यांच्या घरच्या गणपतीची पुजाही केली. या घटनेवरून कायदेतज्ञांबरोबर राजकिय नेत्यांकडूनही मोठ्या प्रमाणावर टीका करण्यात आली. तसेच शिवसेना उबाठा गटाचे प्रवक्ते संजय राऊत यांनीही याबाबत भाष्य करत पंतप्रधान मोदी …

Read More »

उद्धव ठाकरे यांचा हल्लाबोल, निवडणूकीचा कालावधी येईपर्यंत आपली बहिण आठवत नव्हती… हे सरकार गेल्यात जमा , वेळ पडली तर तर आंदोलनकर्त्यांबरोबर आंदोलन करतील

कोकणातील दौऱ्यानंतर शिवसेना उबाठा गटाचे नेते उद्धव ठाकरे यांनी मराठवाड्याच्या दौऱ्यावर आले आहेत. आज संभाजीनगरमध्ये शिवसेना उबाठा पक्षाच्या कार्यकर्त्यांचा मेळावा आयोजित करण्यात आला. या मेळाव्यात बोलताना शिवसेना उबाठा गटाचे नेते उद्धव ठाकरे यांनी महायुती सरकारवर टीका केली. तसेच राज्यात जुनी पेन्शन योजना लागू करण्यासंदर्भात होत असलेल्या मागणीच्या अनुषंगाने आयोजित करण्यात …

Read More »

आशिष शेलार यांची मागणी, उबाठाने….माफी मागावी संजय राऊत यांनी केलेल्या टीकेवरून शेलार यांची मागणी

उध्दव ठाकरे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असताना तुम्ही लालबागच्या राजाची परंपरा खंडित केलीत, सार्वजनिक गणेशोत्सव रोखलात, गणेशभक्त आणि बाप्पाची ताटातूट केलीत. त्यामुळे उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांनी गणेशभक्त आणि लालबागच्या राजाची पायावर नाक घासून माफी मागावी, अशा शब्दांत मुंबई भाजपा अध्यक्ष आमदार आशिष शेलार यांनी संजय राऊत यांच्या टीकेला प्रतिउत्तर दिले. …

Read More »

मंत्रालयातील स्वेच्छानिवृत्तीनंतर सहसचिव सिद्धार्थ खरात यांचा शिवसेना प्रवेश मेहकरमधून विधानसभा निवडणूक लढण्याची शक्यता

राज्यातील प्रशासकीय अधिकारी राजकारणात उतरण्याची अनेक उदाहरणे असताना मंत्रालयातील आणखी एका ज्येष्ठ अधिकाऱ्याने आता राजकारणाची वाट धरली आहे. मंत्रालयात ३ दशकांहून अधिक काळ सेवा बजावत सहसचिव (गृह) या पदावर पोहोचलेले सिद्धार्थ खरात यांनी अलिकडेच स्वेच्छा सेवानिवृत्ती घेतली. त्यानंतर आज मंगळवारी शिवसेना उबाठा पक्षात प्रवेश केला. आगामी विधानसभा निवडणुकीत बुलढाणा जिल्ह्यातील …

Read More »

नारायण राणे यांचा आरोप, दंगली घडवण्याचे उबाठा चे कारस्थान शिवरायांच्या पुतळ्यावरून गलिच्छ राजकारण करणा-यांना जनता जागा दाखवेल

निवडणुका डोळ्यासमोर ठेवून मालवण येथील छत्रपती शिवरायांच्या पुतळ्यावरून महाविकास आघाडी गलिच्छ राजकारण करत राज्यात दंगली घडवण्याचा प्रयत्न करत आहे अशा शब्दांत माजी केंद्रीय मंत्री खा. नारायण राणे यांनी उद्धव ठाकरे व महाविकास आघाडीच्या नेत्यांवर सोमवारी जोरदार हल्ला चढवला. भाजपा प्रदेश कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये ते बोलत होते. यावेळी माजी आ. …

Read More »

जोडे मारो आंदोलनः उद्धव ठाकरे यांचा सवाल, पंतप्रधानांनी माफी कशाची मागितली शिवद्रोही, गेट ऑऊट ऑफ इंडिया

मालवण येथील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळ्याप्रकरणाच्या विरोधात आज महाविकास आघाडीच्या शिवसेना उबाठा, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्यावतीने जोडे मारो आंदोलन करण्यात आले. यावेळी उद्धव ठाकरे, नाना पटोले, संजय राऊत यांच्यासह अनेक नेते हुतात्मा चौक ते गेट वे ऑफ इंडियापर्यंत काढलेल्या मोर्चात पायी चालत गेले. तर राष्ट्रवादीचे प्रमुख नेते …

Read More »

राड्यानंतर उद्धव ठाकरे, शरद पवार आणि नाना पटोले यांची तातडीने घोषणा येत्या रविवारी गेट वे ऑफ इंडियाजवळ आंदोलन करणार-पत्रकार परिषदेत माहिती

मालवण येथील राजकोट येथील ठाकरे समर्थक आणि राणे समर्थकांमधील राड्यानंतर मुंबई शिवसेना उबाठाचे प्रमुख उद्धव ठाकरे, राष्ट्रवादीचे प्रमुख शरद पवार आणि काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी तातडीने बैठक घेत मातोश्री येथे पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत या तिन्ही नेत्यांनी शिवप्रेमीकडून गेट वे ऑफ इंडिया येथे आंदोलन करणार असल्याची घोषणा …

Read More »

उद्धव ठाकरे यांचा टोला, आजचं आंदोलन हे विकृत विरूध्द संस्कृती… भरपावसात बदलापूरप्रश्नी शिवसेना उबाठाची सरकारच्या विरोधात निदर्शने

बदलापूर येथील दोन चिमुरडींवर झालेल्या अत्याचारप्रकरणी स्थानिक बदलापूरकरांनी आंदोलनाच्या माध्यमातून सरकारच्या विरोधात जनप्रक्षोभ बाहेर आला. त्यानंतर राज्यातील महाविकास आघाडीकडून महाराष्ट्र बंदची हाक दिलेली असताना मुंबई उच्च न्यायालयाने त्यास अटकाव केला. तरीही महाविकास आघाडीच्या नेत्यांनी राज्यात काळ्याफिती आणि काळे झेंडे घेऊन आंदोलन केले. शिवसेना उबाठाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिवसेना भवनजवळ …

Read More »