शिवसेनाप्रमुख स्व.बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकाच्या कामात खंड नको २३ जानेवारी २०२७ पुर्वी पूर्ण झालेच पाहिजे

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकाच्या कामात कोणत्याही प्रकारे खंड पडता कामा नये २३ जानेवारी २०२७ पूर्वी पूर्ण होऊन त्याचे लोकार्पण झाले पाहिजे. अशा सूचना स्मारकाचे अध्यक्ष माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज स्मारक ट्रस्टच्या बैठकीत दिल्या.

उद्धव ठाकरे दिवंगत बाळासाहेब ठाकरे राष्ट्रीय स्मारकाच्या ट्रस्टींची बैठक आज उद्धव ठाकरे यांच्या उपस्थित झाली. यावेळी स्मारकाच्या कामाचा संपूर्ण आढावा घेण्यात आला. आतापर्यंतच्या कामाचा आणि पुढील कामकाजा संदर्भात या बैठकीत माहिती देण्यात आली. स्मारकामध्ये कोणत्या गोष्टींचा अंतर्भाव असावा यासंदर्भात उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांनी मार्गदर्शन केले. यावेळी वास्तूविशारद आभा लांबा यांनी स्मारकातील कामाचे सादरीकरण केले. स्मारकाच्या कामासाठी निधी कमी पडू देणार नाही असे आश्वासन यावेळी राज्य शासनाकडून देण्यात आले.

दादर येथील शिवाजी पार्क मैदानाजवळच्या महापौर बंगल्याच्या जागी उभारले जात असलेल्या या बैठकीला स्मारकाचे सचिव, सुभाष देसाई, सदस्य आमदार आदित्य ठाकरे,  पराग अळवणी, शिंदेसेनेचे शिशिर शिंदे, राज्याचे मुख्य सचिव राजेश अगरवाल, मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे संजय मुखर्जी व अधिकारी उपस्थित होते. समितीची दुसरी बैठक येत्या सोमवारी स्मारकामध्येच दुपारी ३ वाजता होणार आहे. त्यामध्ये पुढील आवश्यक बाबींवर चर्चा आणि निर्णय होणार आहे.

About Editor

Check Also

मुंबईतील मोहरमच्या मिरवणूकीत विषाने भरलेल्या कॅप्सुलच्या माध्यमातून, मोठा घातापाताचा कट उंदिर मारण्याच्या विषाने भरलेली १४ हजार ९०० कॅप्सूल केली जप्त

मुंबई पोलिसांनी एका संशयिताकडून विष भरलेल्या १४,९०० कॅप्सूल जप्त करून मोहरमच्या मिरवणुकीला लक्ष्य करण्याचा कथित …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *