राज्यातील विनाअनुदानित शाळांना टप्प्याटप्प्याने अनुदान देण्याच्या निर्णयावर शासन ठाम असून, संबंधित शाळांनी विहित नियमांची पूर्तता केली असल्यास त्यांना लवकरच पुढील टप्प्याचे अनुदान देण्यात येईल, अशी माहिती उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानपरिषदेत दिली. विधानपरिषद सदस्य किरण सरनाईक यांनी उपस्थित केलेल्या लक्षवेधी सूचनेला उत्तर देताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, राज्यात पूर्वी अनेक शाळांना कायम …
Read More »मुख्यमंत्री फडणवीस यांची घोषणा, हिंदी भाषेसंदर्भातील पूर्वीचे दोन्ही जीआर निर्णय रद्द आता त्रिसुत्री भाषेसाठी डॉ जाधव यांच्या अध्यक्षतेखाली समिती, समितीच्या शिफारसीनुसार निर्णय घेणार
पावसाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला आयोजित सरकारी चहापानाच्या कार्यक्रमावर विरोधकांनी बहिष्कार टाकला. तरीही राज्य सरकारच्यावतीने आयोजित चहापानाच्या कार्यक्रमानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्या उपस्थितीत पत्रकार परिषद घेण्यात आली. या पत्रकार परिषदेत बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हिंदी भाषेच्या अनुषंगाने राज्य सरकारने जारी केलेले शासन निर्णय रद्द करण्यात …
Read More »द्रास येथील भारतीय लष्कराला ‘लेझर शो’ साठी राज्य शासनाकडून तीन कोटींची मदत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून मदतीचा धनादेश सैन्यदलाकडे सुपूर्द
कारगिल युद्धाची युद्धभूमी द्रास येथे भारतीय सैन्यदलाच्या शौर्याची ओळख पुढील पिढ्याना व्हावी यासाठी सरहद्द संस्थेच्या पुढाकाराने तयार करण्यात येत असलेल्या ‘लेझर शो’च्या निर्मितीसाठी महाराष्ट्र शासनाने तीन कोटींचा निधी देण्याचे शिंदे यांनी गतवर्षी जाहीर केले होते. यंदा कारगिलच्या विजयोत्सवात सहभागी होण्यासाठी गेले असता आपण दिलेला शब्द पाळत त्यांनी हा तीन कोटींचा …
Read More »डॉ दीपक सावंत यांना मंत्री पदाचा दर्जा कुपोषित माता व बालकांचा मृत्यू दर कमी करण्यासाठी नेमण्यात आलेल्या कृती दलाचे प्रमुख
राज्यातील आदिवासी क्षेत्रातील कुपोषण, माता व बालकांचा मृत्यू दर कमी करण्यासाठी तसेच विविध संसर्गजन्य रोग नियंत्रणासाठी शासनाच्या माध्यमातून एक कृती दल (टास्कफोर्स) तयार करण्यात आला आहे. या कृती दलाचे अध्यक्ष डॉ दीपक सावंत यांना शासनाकडून मंत्री पदाचा दर्जा देण्यात आला आहे. त्याबद्दल राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी डॉ दिपक सावंत …
Read More »राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेतले हे महत्वाचे निर्णय मुख्यमंत्री फडणवीस अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत निर्णयांना मंजूरी
राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत आज महत्वाचे असे ९ ते १० निर्णय घेण्यात आले. यात आणीबाणीत तुरुंगवास भोगलेल्यांना मिळाणाऱ्या मानधनात दुपट्टीने वाढ केली आहे. तर आदिवासी इंडस्ट्रियल क्लस्टरसाठी जमिन, मेसर्स रायगड पेण ग्रोथ सेंटरला मुद्रांक शुल्कात सवलत, मुंबईतील राष्ट्रीय विधि विद्यापीठास जमीन हस्तांतरणासाठी मुद्रांक शुल्क माफ, मुंबईतील राष्ट्रीय विधि विद्यापीठास जमीन हस्तांतरणासाठी …
Read More »अजित पवार यांची माहिती, कुंडमळा पूल दुर्घटना दुर्दैवी; मदत व बचावकार्याला सुरुवात दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार
मावळ तालुक्यातील कुंडमळा येथे इंद्रायणी नदीवरील पूल कोसळून झालेली दुर्घटना दुर्दैवी, वेदनादायी असल्याचे सांगत या दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्यात येईल, अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली. दुर्घटनेत काही नागरिक व पर्यटक नदीच्या प्रवाहात वाहून गेल्याची प्राथमिक माहिती आहे. दुर्घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिक, स्थानिक प्रशासनाने …
Read More »पुणे विभागातील कोविड-19 परिस्थितीचा उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून आढावा ओमीक्रॉनचे जेएन, एक्सएफजी व जीएफ ७-९ हे उपप्रकार आढळले
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विधानभवन येथे आयोजित बैठकीत पुणे विभागातील कोविड-19 साथीच्या अनुषंगाने आढावा घेतला. लक्षणे सौम्य असली तरी वृद्ध तसेच सहव्याधी असलेल्या व्यक्तींनी विशेष काळजी घेणे आवश्यक असून आरोग्य विभाग, महानगरपालिका तसेच इतर स्थानिक स्वराज्य संस्थांनी समन्वयाने काम करावे, अशा सूचना त्यांनी यावेळी दिल्या. या बैठकीस विभागीय आयुक्त डॉ. …
Read More »मुख्यमंत्री फडणवीस यांनी घेतला म्हाडाच्या प्रकल्पांचा व प्रस्तावित नियमावलींचा आढावा बीडीडी चाळीच्या सदनिकांचे हस्तांतरणाचे नियोजन
विकास नियंत्रण नियमावली ३३ (७) अंतर्गत प्रस्तावित सुधारणा यासह म्हाडाच्या विविध अधिनियम अंतर्गत प्रस्तावित सुधारणांचा तसेच म्हाडा मार्फत राबविण्यात येणाऱ्या बीडीडी चाळ व इतर प्रकल्पांचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आढावा घेतला. सह्याद्री अतिथीगृह येथे झालेल्या बैठकीस उपमुख्यमंत्री तथा गृहनिर्माण मंत्री एकनाथ शिंदे, गृहनिर्माण राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर, मुख्य सचिव सुजाता सौनिक, नगर विकास …
Read More »अजित पवार यांचे आदेश, इंदापूर, माणगाव रस्त्यांचे काम पूर्ण होईपर्यंत चार पर्यायी रस्त्यांची कामे मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी
मुंबई – गोवा राष्ट्रीय महामार्गावर इंदापूर आणि माणगाव बायपास रस्त्याचे काम पूर्ण होईपर्यंत प्रवाशांची वाहतूक कोंडीतून सुटका होणे आवश्यक आहे. त्यासाठी मोरबा रोड ते मुंबई-गोवा हायवे रस्ता, साईनगर कालवा ब्रिज ते उत्तेखोल कालवा गावापर्यंतचा रस्ता आणि निजामपूर रोड कालवा ते भादाव रस्ता हे माणगाव नगरपंचायत हद्दीतील तीन रस्ते आणि मुंबई – …
Read More »महाराष्ट्र राज्य अनुसूचित जाती आयोगास वैधानिक दर्जा राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय
महाराष्ट्र राज्य अनुसूचित जाती आयोगास वैधानिक दर्जा देण्यासाठी कार्यवाही करण्यास आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते. त्यानुसार आगामी विधिमंडळ अधिवेशनात विधेयक आणण्यात येणार आहे. सामाजिक न्यायाचे तत्त्व प्रभावीपणे राबविण्यासाठी राज्यात २००५ मध्ये अनुसूचित जाती जमाती आयोगाची स्थापना करण्यात आली होती. केंद्र शासनामध्ये अनुसूचित जाती …
Read More »
Marathi e-Batmya