महाराष्ट्रातील भावी आंतरराष्ट्रीय व्यवसाय आणि वित्तीय केंद्र (IBFC) म्हणून “नवीन नागपूर” या भव्य प्रकल्पाला गती मिळाली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत आज नागपूर महानगर क्षेत्र विकास प्राधिकरण (NMRDA) आणि केंद्र सरकारच्या नवरत्न दर्जाच्या दोन सार्वजनिक कंपन्या – एनबीसीसी (इंडिया) लि. आणि हु डको (HUDCO) यांच्यात दोन महत्त्वपूर्ण सामंजस्य करार …
Read More »अतुल लोंढे यांची टीका, उपमुख्यमंत्री अजित पवारांची टगेगिरी कायम बेकायदेशीर काम रोखणाऱ्या महिला आयपीएस अधिकाऱ्याला अजित पवार यांची धमकी धमकी
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अंजली कृष्णा या महिला आयपीएस अधिकाऱ्याला फोनवरून दिलेली धमकी अत्यंत निषेधार्ह आहे. प्रामाणिकपणे काम करणा-या अधिकाऱ्यांना फोनवरून धमकी देऊन अवैध धंद्याविरोधातील कारवाई थांबवा म्हणून दमदाटी करणे हे चुकीचे असून अजित पवारांची ही टगेगिरी महाराष्ट्राला तसेच अजित पवारांसारख्या ज्येष्ठ मंत्र्याला शोभणारी नाही, अशी टीका प्रदेश काँग्रेसचे प्रवक्ते …
Read More »अजित पवार यांची माहिती, शासनाकडून जिल्हा नियोजनासाठी २२ हजार कोटी अभियानासाठी शासनाकडून २४५.२० कोटींची राज्यस्तर ते पंचायत समिती स्तरापर्यंत बक्षीस योजना
महाराष्ट्र शासनाने चालू आर्थिक वर्षासाठी जिल्हा वार्षिक नियोजनाखाली तब्बल २२ हजार कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला असून, त्यातील मोठा हिस्सा जिल्हा परिषदेमार्फत थेट गावपातळीपर्यंत पोहोचतो. ग्रामपंचायतींनी हा निधी पारदर्शक व सुयोग्य पद्धतीने वापरून गावांचा सर्वांगीण विकास साधावा. भारताचा आत्मा खेड्यांत आहे. खेडी समृद्ध झाली तर देश समृद्ध होईल, असे …
Read More »अजित पवार यांची माहिती, पुणे-लोणावळा’ रेल्वेच्या दोन मार्गिका आणि मेट्रोची दोन स्थानके वाढणार प्रकल्पासाठी राज्यशासनाच्या आर्थिक सहभाग देण्यास मंत्रीमंडळाची मान्यता
पुणे ते लोणावळा दरम्यान उपनगरीय रेल्वेच्या तिसऱ्या व चौथ्या मार्गाच्या महत्त्वपूर्ण प्रकल्पासाठी राज्य शासनाच्या आर्थिक सहभागाला राज्यमंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली आहे. उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे हा दीर्घकालीन प्रश्न मार्गी लागला आहे. अजित पवार पुढे म्हणाले की, मुंबई रेल्वे विकास महामंडळामार्फत सादर करण्यात आलेल्या …
Read More »अजित पवार यांची माहिती, मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनी बीड येणार रेल्वेच्या नकाशावर बीड ते परळी रेल्वे मार्ग कामाला गती देऊन रेल्वे मार्ग पूर्ण करा, बीड ते अहिल्यानगर मार्गावर सुरू होणार रेल्वे
रेल्वेमार्गापासून कोसो दूर असलेले बीड शहर लवकरच रेल्वेच्या नकाशावर येणार आहे. मराठवाडा मुक्ती संग्राम दिनी बीड ते अहिल्यानगर रेल्वे गाडी सुरू करण्यात येणार असून यामुळे अनेक वर्षापासूनचे बीडवासियांचे रेल्वेसेवेचे स्वप्न पूर्ण होणार आहे. येत्या १७ सप्टेंबर रोजी बीड ते अहिल्यानगर रेल्वे गाडीला हिरवा झेंडा दाखवून शुभारंभ करण्याचा निर्णय उपमुख्यमंत्री अजित …
Read More »अजित पवार म्हणाले की, मराठा समाजासह महाराष्ट्राच्या सर्वांगीण विकासासाठी शासन कटिबद्ध आवश्यक ती सर्व पावले उचलली जातील
“मराठा समाजाच्या आरक्षणासह इतर मागण्यांबाबत महाराष्ट्र शासनाने पहिल्या दिवसापासून सकारात्मक व संवेदनशील भूमिका घेतली होती. आंदोलनकर्त्यांच्या भावनांचा सन्मान राखत आणि त्यांना न्याय मिळावा यासाठी शासनाने सतत प्रयत्न केले. त्या अनुषंगाने मंत्रिमंडळ उपसमितीच्या शिफारशींवर तातडीने निर्णय घेऊन आज शासन निर्णय प्रसिद्ध करण्यात आला असल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले. पुढे बोलताना …
Read More »मराठा आंदोलनावर राज ठाकरे यांची स्पष्टोक्ती, सगळ्यांच उत्तर एकनाथ शिंदेच देऊ शकतील मराठा-ओबीसी वादावर राज ठाकरे यांनी मांडली भूमिका
जवळपास वर्षभरापासून राज्यातील मराठा समाजाच्या आरक्षण प्रश्नी मराठा आंदोलक समर्थक मनोज जरांगे पाटील यांनी आतापर्यंत अनेकवेळा आंदोलन केले. तसेच मागील काही वर्षी नवी मुंबईत मराठा आरक्षण प्रश्नी मनोज जरांगे पाटील यांनी आंदोलन केले होते. त्यावेळी तत्कालीन मुख्यमंत्री तथा विद्यमान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वतः विशेष शासन निर्णय जारी करत त्याची …
Read More »उद्धव ठाकरे मराठा आंदोलनावर म्हणाले, सरकारने आंदोलकांशी संवाद साधावा छत्रपती शिवाजी महाराजांची शपथ खावून आश्वासन देणारे गावी जाऊन बसले का
मुंबई मराठी माणसांची राजधानी आहे. त्यामुळे मराठी माणूस आपल्या न्याय हक्कासाठी मुंबईत येणार नाही, तर काय गुजरात किंवा गुवाहाटीला जाणारा का? असा सवाल शिवसेना उबाठा प्रमुख उद्धव ठाकरे यांनी करत मराठा समाजाच्या आरक्षणासाठी शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर शपथ घेणारे गावी जाऊन बसले असा टोला एकनाथ शिंदे यांना यावेळी लगावला. इंडिया आघाडीचे …
Read More »हर्षवर्धन सपकाळ यांचा सवाल, एकनाथ शिंदे व देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या घोषणांचे काय झाले? नांदेडच्या विकासात बळवंतराव चव्हाण व वसंतराव चव्हाणांचे मोलाचे योगदान
स्व. बळवंतराव चव्हाण व वसंतराव चव्हाण हे सर्वांना सोबत घेऊन जाणारे बहुजन समाजातील सर्वसमावेश नेतृत्व होते. मराठवाडा तसेच नांदेड जिल्ह्याच्या विकासात दोघांचे व चव्हाण कुटुंबियांचे अनन्यसाधारण योगदान आहे. या भागात त्यांनी केलेले कार्य दिर्घकाळ लक्षात राहणारे आहे, असे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी म्हटले आहे. नांदेड जिल्ह्यातील नायगाव …
Read More »कर्नाटकाच्या विधिमंडळात आरएसएसचे गीत, उपमुख्यमंत्री डी के शिवकुमार यांची माफी विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात आरएसएसचे गीत
गेल्या आठवड्यात राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात विधानसभेत राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (आरएसएस) चे गीत नमस्ते सदा वत्सले मातृभूमे गाऊन वाद निर्माण करणारे केपीसीसी अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री डी.के. शिवकुमार यांनी २६ ऑगस्ट रोजी ‘काँग्रेस आणि इंडिया आघाडीतील ज्यांच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत’ त्यांची माफी मागितली. १९८० पासून काँग्रेस पक्ष आणि गांधी कुटुंबाप्रती …
Read More »
Marathi e-Batmya