उद्धव ठाकरे मराठा आंदोलनावर म्हणाले, सरकारने आंदोलकांशी संवाद साधावा छत्रपती शिवाजी महाराजांची शपथ खावून आश्वासन देणारे गावी जाऊन बसले का

मुंबई मराठी माणसांची राजधानी आहे. त्यामुळे मराठी माणूस आपल्या न्याय हक्कासाठी मुंबईत येणार नाही, तर काय गुजरात किंवा गुवाहाटीला जाणारा का? असा सवाल शिवसेना उबाठा प्रमुख उद्धव ठाकरे यांनी करत मराठा समाजाच्या आरक्षणासाठी शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर शपथ घेणारे गावी जाऊन बसले असा टोला एकनाथ शिंदे यांना यावेळी लगावला.

इंडिया आघाडीचे उपराष्ट्रपती पदाचे उमेदवार सेवानिवृत्त न्यायाधीश  बी.सुदर्शन रेड्डी यांनी आज उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. त्यानंतर उद्धव ठाकरे यांनी पत्रकारांशी संवाद साधला.

पुढे बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले की, या सरकारने सत्तेत आल्यानंतर काही दिवसांतच न्याय देण्याचा शब्द दिला होता. एकनाथ शिंदे यांचे नाव न घेता त्यांनी तर या प्रकरणी छत्रपती शिवाजी महाराज यांची शपथ ही घेतली होती. मग आरक्षण देण्याची ग्वाही देणारे गावी पळाले का? आता नुसती दर्शने घेत आहेत. एवढी जनता जनार्दन मुंबईत आल्यावर त्यांना सामोरे जा. नुसतं घरोघरी काय फिरता, अशी खरमरीत टीका ही यावेळी केली.

उद्धव ठाकरे पुढे बोलताना म्हणाले की, आतापर्यंत या लोकांना वापरून फेकून देण्यात आले. मराठी माणसं मुंबईत दंगल करण्यासाठी नाही तर आपल्या हक्कासाठी आली आहेत. त्यामुळे सरकारने तातडीने संवाद साधून त्यांचा न्याय हक्क दिला पाहिजे असेही यावेळी सांगितले.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जरांगे यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून कुणी तरी आंदोलन चालवत आहे, असा आरोप केला त्यावर बोलताना उद्धव ठाकरे शेवटी म्हणाले की, त्यांनीच कोण कोणाच्या खांद्यावर बंदूक ठेवून हे आंदोलन चालवत आहे हे सांगावे. जरांगे यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून देण्याची वेळ सरकारने का येवून दिली. मी या प्रकरणी काही बोललॊ तर माझ्या हातात काहीच नाही. तुम्ही दहा जणांच्या भूमिका विचारण्यापेक्षा थेट आंदोलकांशी संवाद साधला पाहिजे असा सल्लाही यावेळी राज्य सरकारला दिला.

About Editor

Check Also

एमपीएससी अध्यक्ष-सचिवांच्या राजीनाम्यासाठी पुण्यात हजारो विद्यार्थ्यांचा आक्रोश मोर्चा माजी मंत्री आ. विश्वजीत कदम यांच्यासह काँग्रेस नेते पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा मोर्चात सहभाग

एमपीएससी MPSC च्या परीक्षा प्रक्रियेतील कथित गैरप्रकार, अनियमितता, संशयास्पद मूल्यमापन, निकालातील गोंधळ आणि विद्यार्थ्यांच्या विविध प्रलंबित प्रश्नांविरोधात एमपीएससी MPSC अध्यक्ष व …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *