४ जून रोजी लोकसभा निवडणुकीच्या मतमोजणीपूर्वी “केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी १५० जिल्हा दंडाधिकारी आणि जिल्हाधिकाऱ्यांना बोलावले होते” या दाव्यावर निवडणूक आयोगाने रविवारी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते जयराम रमेश यांच्याकडून अधिक माहिती मागवली. जयराम रमेश यांना लिहिलेल्या पत्रात, निवडणूक मंडळाने त्यांना आज संध्याकाळी ७ वाजेपर्यंत त्यांच्या दाव्याचे समर्थन करण्यासाठी तपशील सामायिक …
Read More »लोकसभा निवडणूकीच्या सातव्या टप्प्यासाठी दुपारी १ वाजेपर्यंत ४० टक्के मतदान पंजाब, उत्तर प्रदेश, पश्चिम बंगाल, बिहार, ओ़डिशा, हिमाचल प्रदेश, झारंखड आणि चंदिगड मधील मतदान
लोकसभा निवडणूकीच्या शेवटच्या अर्थात सातव्या टप्प्यातील ५७ लोकसभा मतदारसंघात आज १ जून रोजी उत्तर प्रदेशातील वाराणसीसह सात राज्ये आणि केंद्रशासित प्रदेश चंदीगडमधील ५७ मतदारसंघांसाठी मतदान होत आहे, जिथून वाराणसीत पंतप्रधान नरेंद्र मोदी सलग तिस-यांदा लोकसभा निवडणूकीसाठी उभे आहेत. दुपारी १ वाजेपर्यांत या ८ ही राज्यांमधील ५७ जागांवर ४० टक्के मतदान …
Read More »केंद्रीय निवडणूक आयोगाची माहिती, राज्यातील आचारसंहिता सध्या शिथिल नाहीच नवीन लोकसभा स्थापित झाल्याची अधिसूचना आयोगाकडून प्रसिद्ध होईपर्यंत आचारसंहिता कायम
सद्यःस्थिती लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-२०२४ अंतर्गत महाराष्ट्रातील सर्व टप्यातील मतदान प्रक्रिया पूर्ण झालेली आहे. तरी आदर्श आचारसंहिता अद्यापपर्यंत सुरु असून त्यात कोणत्याही प्रकारची शिथिलता देण्यात आलेली नाही. निवडणूकीचा निकाल जाहीर झाल्यानंतर नवीन लोकसभा स्थापित झाल्याची अधिसूचना आयोगाकडून प्रसिद्ध होईपर्यंत आचारसंहिता कायम राहणार असल्याचे मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाने प्रसिद्धीपत्रकान्वये कळविले आहे. आचार …
Read More »विधान परिषद शिक्षक, पदवीधर आणि राज्यसभेसाठी २५ आणि २६ जूनला मतदान विधान परिषदेच्या चार जागांसाठी तर राज्यसभेच्या एका जागेसाठी निवडणूक
केंद्रीय निवडणूक आयोगाने महाराष्ट्र विधानपरिषदेच्या शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघाची निवडणूक जाहीर केली आहे. मुंबई पदवीधर, कोकण विभाग पदवीधर, नाशिक विभाग शिक्षक तसेच मुंबई शिक्षक मतदारसंघ अशा ४ जागांकरिता निवडणूक होत असून सोमवार, २६ जून २०२४ रोजी मतदान होणार आहे. या निवडणूक प्रक्रियेबाबत काही सूचना असल्यास राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींनी दि.३० मे …
Read More »निवडणूक आयोगाकडून पहिल्या पाच टप्प्यातील मतदानाची आकडेवारी जाहिर मतदानानंतर किमान तीन ते जास्तीत जास्त दिवसही लागू शकतात
केंद्रीय निवडणूक आयोगाकडून मतदानानंतर एकूण मतदानाची आकडेवारी जाहिर करण्यास उशीर करत असल्याच्या कारणावरून सर्वचस्थरातून निवडणूक आय़ोगावर टीकेची झोड उठलेली आहे. त्यातच यासंदर्भात सर्वोच्च न्यायालयातही याचिका दाखल करण्यात येत असल्याच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय निवडणूक आयोगाने (ECI) शनिवारी पहिल्या पाच टप्प्यातील मतदानासाठी मतदारांची परिपूर्ण संख्या जाहीर केली. निवडणूक आयोगाने सांगितले की त्यांनी आपल्या …
Read More »शिक्षक, पदवीधर मतदारसंघाच्या निवडणूकीची नवी तारीख जाहिर आता विधान परिषदेसाठी २६ जून रोजी द्वैवार्षिक निवडणूक
भारत निवडणूक आयोगाने महाराष्ट्र विधानपरिषदेच्या शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघाच्या निवडणूकीचा कार्यक्रम जाहीर केला आहे. मुंबई पदवीधर, कोकण विभाग पदवीधर, नाशिक विभाग शिक्षक तसेच मुंबई शिक्षक मतदारसंघ अशा ४ जागांसाठी निवडणूक होत असून सोमवार, २६ जून २०२४ रोजी मतदान होणार आहे. विलास विनायक पोतनीस (मुंबई पदवीधर मतदारसंघ), निरंजन वसंत डावखरे (कोकण …
Read More »केंद्रीय निवडणूक आयोगाला निर्देश देण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकार मतदान केंद्र निहाय मतदानाची टक्केवारीची माहिती वेबसाईटवर अपलोड करण्याची माहिती
सर्वोच्च न्यायालयाने २४ मे रोजी निवडणूक आयोगाला लोकसभा निवडणुकीदरम्यान मतदान केंद्रनिहाय मतदानाचा डेटा आपल्या वेबसाइटवर अपलोड करण्याचे निर्देश जारी करण्यासंदर्भात एडीआर या संस्थेने दाखल केलेल्या याचिकेवर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली. मात्र एडीआरने दाखल केलेल्या याचिकेवर थेट अंतरिम दिलासा देण्याऐवजी एडीआरने दाखल केलेल्या याचिका सर्वोच्च न्यायालयाने नाकारत सदरची याचिका मुख्य …
Read More »जितेंद्र आव्हाड यांचे टीकास्त्र, निवडणूक आयोगाच्या गलथानपणाचा मतदारांना फटका
महाराष्ट्रामध्ये पाचव्या टप्प्यात झालेल्या लोकसभा निवडणुकीच्या मतदार यादी मधून अनेकांचे नाव गहाळ झाली होती तर निवडणूक आयोगाच्या गलथानकारभारामुळे अनेक मतदारांना आपला मतदानाचा अधिकार बजावता आला नाही. निवडणूक विभागाकडून करण्यात आलेल्या चुकीमुळे मतदारांना मतदानापासून वंचित राहावे लागले आहे असे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी टीका केली. आज …
Read More »उद्धव ठाकरे यांचे आवाहन, …उद्याची सकाळ उजडली तरी मतदान कराच
मुंबई आणि एमएमआर परिसरातील अनेक मतदान केंद्रांवर वेळेत मतदानाची प्रक्रिया पार पाडली जात नाही. त्यामुळे अनेक मतदार हे मतदान केंद्रावर वेळ लागत असल्याने मतदान न करताच परतत आहेत अशा तक्रारी सातत्याने येत आहेत. हा वेळ जेणेकरून मतदारांनी मतदानच करू नये यासाठी जाणीवपूर्वक करण्यात येत आहे. तर माझे मतदारांना आवाहन आहे …
Read More »मतांच्या रिअलटाईम टक्केवारीबाबतच्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी
सर्वोच्च न्यायालयाने शुक्रवारी (१७ मे) भारतीय निवडणूक आयोगाला (ECI) फॉर्म 17-C च्या स्कॅन केलेल्या प्रती आपल्या वेबसाइटवर अपलोड करण्याचे निर्देश मागणाऱ्या अर्जावर उत्तर दाखल करण्यासाठी एका आठवड्याची मुदत दिली आहे. निवडणुकीनंतर लगेचच बूथमध्ये मिळालेल्या मतांच्या संख्येची माहिती तातडीने जाहिर केली जात नाही याबाबत सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली. असोसिएशन …
Read More »
Marathi e-Batmya