शासकिय कोट्यातून आर्थिक दुर्बल घटकासाठी असलेले घर मिळविण्यासाठी खोटी कागदपत्रे सादर केल्याप्रकरणी देवळाली न्यायालयाने आणि तेथील वरच्या न्यायालयाने माजी मंत्री माणिकराव कोकाटे यांना दोषी ठरवित दोन वर्षाची शिक्षा ठोठावली. त्या जिल्हा न्यायालयाने दिलेल्या निर्णयाच्या विरोधात माणिकराव कोकाटे यांनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली. मात्र उच्च न्यायालयाने माणिकराव कोकाटे यांच्या शिक्षेला …
Read More »अशोका विद्यापीठाच्या अली खान महमूदाबाद यांना सर्वोच्च न्यायालयाकडून जामीन सोनीपत न्यायालयाने सुनावली होती दोन दिवसीय कोठडी
ऑपरेशन सिंदूरवरील सोशल मीडिया पोस्टसाठी अटक करण्यात आलेले अशोका विद्यापीठाचे सहयोगी प्राध्यापक अली खान महमूदाबाद यांना बुधवारी (२१ मे २०२५) सर्वोच्च न्यायालयाने अंतरिम जामीन मंजूर केला. तथापि, न्यायालयाने त्यांच्याविरुद्ध नोंदवलेल्या एफआयआरला स्थगिती देण्यास नकार दिला. सर्वोच्च न्यायालयाने प्राध्यापक अली खान महमूदाबाद यांना या प्रकरणाबाबत ऑनलाइन काहीही पोस्ट करण्यास मनाई केली. …
Read More »१३,८६४ किलो हेरॉइन तस्करीचे प्रकरणी उच्च न्यायालयाकडून जामीन मंजूर एक लाख रूपयांच्या वैयक्तिक जात मुचलक्यावर जामीन
नवी मुंबईच्या न्हावा शेवा बंदरात या प्रकरणातील मुख्य आरोपीच्या भावाची १३,८६४ किलो हेरॉइन या अमली पदार्थाची तस्करी सुरळीत होण्यासाठी १.५ लाख रुपये हस्तांतरित केल्याचा आरोप असलेल्या पंजाब लुधियाना येथील एका व्यक्तीला उच्च न्यायालयाने नुकताच जामीन मंजूर केला. उच्च न्यायालयाने आरोपी गुर्जुगदीप सिंग स्मघचा दीर्घकाळ तुरुंगवास आणि अधिकृत आरोपांची कमतरता जामीन …
Read More »अधंश्रद्धेतून बळी दिल्याचा आरोप असलेल्या वृध्दाला न्यायालयाकडून जामीन मंजूर वृद्धत्व आणि तुरुंगवासाचा कालावधी लक्षात घेऊन दिला जामीन
उत्कर्ष आणि संपत्ती मिळविण्यासाठी अंधश्रद्धेतून एका तरूणीचा बळी दिल्याचा आरोप असलेल्या साताऱ्यातील ७० वर्षीय वृद्धाला उच्च न्यायालयाने नुकताच जामीन मंजूर केला. न्यायालयाने अर्जदाराला ५० हजार रुपयांच्या वैयक्तिक मुचलक्यावर आणि तितक्याच हमीसह अटींवर जामीन मंजूर केला. अर्जदार ७० वर्षांपेक्षा जास्त वयाचा आहे. तसेच तो दोन वर्षांहून अधिक काळ तुरुंगवासात आहे. अर्जदाराविरुद्ध …
Read More »उच्च न्यायालयाकडून धीरज आणि कपिल वाधवान यांना जामीन येस बँक आर्थिक गैरव्यवहाराचे प्रकरणी पावणेपाच वर्षांहून अधिक काळ वाधवान बंधू अटकेत
येस बँक कर्ज घोटाळ्य़ाशी संबंधित आर्थिक गैरव्यवहाराप्रकरणी दिवाण हाऊसिंग फायनान्स लिमिटेडचे (डीएचएफएल) प्रवर्तक धीरज आणि कपिल वाधवान यांना उच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला. दोघेही दीर्घकाळ तुरुंगात असून त्यांच्याविरोधातील खटला नजीकच्या काळात सुरू होण्याची शक्यता नसल्याचे निरीक्षण न्यायालयाने वाधवान बंधुंना जामीन मंजूर करताना नोंदवले. मागील पावणेपाच वर्षांपासून वाधवान बंधू कारागृहात आहेत. …
Read More »पोक्सोतंर्गत गुन्हा दाखल झालेल्यास उच्च न्यायालयाकडून जामीन शारीरिक संबंध दोघांच्याही संमतीनेच
अर्जदार आणि पीडितेमध्ये प्रस्थापित झालेले शारीरिक संबंध हे दोघांच्याही परस्पर संमतीने असल्याचे निरीक्षण नोंदवून उच्च न्यायालयाने नुकताच पोक्सोअंतर्गत गुन्हा दाखल असलेल्या अर्जदाराला जामीन मंजूर केला. घटनेदरम्यान पीडिता मुलगी अल्पवयीन होती हे सिद्ध करण्यासाठी कोणतेही पुरावे, सामग्री रेकॉर्डवर ठेवलेली नाही. प्रकरणाचा बारकाईने अभ्यास केला असता लक्षात येते की, अर्जदार आणि पीडित …
Read More »उच्च न्यायालयाचे मत, भारतात मानसिक आजारकडे दुर्लक्ष स्क्रिझोफ्रेनिया ग्रस्त आणि दोषसिद्ध आरोपीला जामीन मंजूर, जन्मठेपेची शिक्षाही स्थगित
समाजाकडून बहिष्काराची किंवा भेदभावाच्या भीतीपोटी भारतात मानसिक आजार लपवून ठेवला जातो. परिणामी, मानसिक आजाराकडे दुर्लक्ष केले जाते, असे मत उच्च न्यायालयाने नुकत्याच एका प्रकरणात नोंदवले. तसेच वडिलांच्या खुनप्रकरणी दोषी ठरलेल्या आणि स्क्रिझोफ्रेनियाग्रस्त ३५ वर्षीय व्यक्तीला उच्च न्यायालयाने जामीन मंजूर करत त्याचे शिक्षेविरोधातील अपील अंतिम सुनावणीसाठी दाखल करून जन्मठेपेची शिक्षाही स्थगित …
Read More »मिरारोड दंगल प्रकरण: उच्च न्यायालयाकडून १४ जणांना जामीन सर्व आरोपींना कोठडीत ठेवण्याची आवश्यकता नाही
अयोध्येतील राममूर्ती प्राण प्रतिष्ठापनेच्या पूर्वसंध्येला मीरा रोड येथे उसळलेल्या जातीय हिंसाचाराप्रकरणी अटकेत असलेल्या १४ तरुणांना उच्च न्यायालयाने नुकताच जामीन मंजूर केला आहे. सर्व कथित आरोपींना कोठडीत ठेवण्याची आवश्यकता नसल्याचे न्यायालयाने जामीन मंजूर करताना स्पष्ट केले. उच्च न्यायालयाने आपल्या आदेशात म्हटले की, अटकेत असलेल्या सर्व अर्जदारांचा अयोध्येतील राममूर्ती प्राण प्रतिष्ठापनेचा सोहळा …
Read More »एनडीपीएस प्रकरणी कुस्तीपटू काइल कमिंग्सला जामीन मंजूर उच्च न्यायालयाने केला मंजूर जामीन
बेल्जियममधून २८१ ग्रॅम मेथॅम्फेटामाइन (एमडी), एमडीएमए गोळ्या आणि पावडर मागवल्याप्रकरणी उच्च न्यायालयाने नुकताच पुण्याचा २३ वर्षीय कुस्तीपटू काईल कमिंग्सला एनडीपीएस प्रकरणी जामीन मंजूर केला. काइल कमिंग्ज यांना अटक करणे हे सर्वोच्च न्यायालयाने घालून दिलेल्या कायदेशीर प्रक्रियेचे उल्लंघन असल्याचे नमूद करून न्या. मनीष पितळे यांनी अर्जदार काईल कमिंग्सला काही अटींसह जामीन …
Read More »प्रदीर्घ काळ तुरुंगवास भोगणाऱ्याला उच्च न्यायालयाकडून जामीन मंजूर अंदाजे एक हजार कोटी रुपयांच्या १९१.५० किलो हेरॉईन बाळगण्याचा आऱोप
अपुरा पुरावा आणि खटल्याच्या प्रगतीविना प्रदीर्घ काळ तुरुंगवास भोगावा लागल्याचे निरीक्षण नोंदवून क्लियरिंग एजंट व मेसर्स एम. बी. शिपिंग आणि लॉजिस्टिक सर्व्हिसेसमध्ये भागीदार असलेल्या कोंडीबा गुंजाळ यांना उच्च न्यायालयाने अंदाजे एक हजार कोटी रुपयांच्या १९१.५० किलो हेरॉईन जप्तीच्या प्रकरणात जामीन मंजूर केला. गुंजाळ यांचा या अंमली पदार्थांच्या तस्करीत सहभाग असलेला …
Read More »
Marathi e-Batmya