राज्याचे कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांना एका प्रकरणात नाशिक सत्र न्यायालयाने शिक्षा सुनावली आहे त्यामुळे अजित पवार यांनी कोकाटे यांचा तत्काळ राजीनामा घ्यावा अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे मुख्य प्रवक्ते महेश तपासे यांनी मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलताना केली. महेश तपासे बोलताना पुढे म्हणाले की, आता अजित पवार म्हणू शकणार नाही …
Read More »धनंजय मुंडे यांची माहिती, मला बेल पल्सी आजाराचे निदान वाढत्या भ्रष्टाचाराच्या आरोपांवर धनंजय मुंडे यांनी दिली माहिती
मागील काही महिन्यांपासून मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी मंत्री धनंजय मुंडे यांचे विश्वासू सहकारी वाल्मिक कराड यांच्याशी असलेल्या कथित संबधावरून आणि कृषी खात्यातील भ्रष्टाचाराच्या प्रकरणावरून धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया आणि भाजपाचे आमदार सुरेश धस यांच्याकडून सातत्याने करण्यात येत आहे. तसेच सुरेश धस आणि धनंजय …
Read More »मुख्यमंत्री फडणवीस यांची घोषणा, आग्रा येथे छत्रपती शिवाजी महाराजांचे भव्य स्मारक उभारणार रामसिंगची कोठी असलेल्या जागेचे अधिग्रहण करणार
आग्रा येथे छत्रपती शिवाजी महाराजांना ज्या रामसिंगच्या कोठीत ठेवण्यात आले होते ती सध्याच्या मीनाबाजार भागातील जागा महाराष्ट्र सरकार अधिग्रहित करणार असून तेथे छत्रपती शिवाजी महाराजांचे भव्य स्मारक उभारणार असल्याची घोषणा राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आग्रा येथे केली. यासंदर्भात आपण उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याशी चर्चा करणार असल्याचेही यावेळी …
Read More »आंबेगावातील शिवसृष्टीच्या दुसऱ्या टप्प्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते लोकार्पण शिवसृष्टीच्या पुढील टप्प्यासाठी ५० कोटी रुपये निधी देण्याची मुख्यमंत्र्यांची घोषणा
छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्य, स्वधर्म व स्वभाषा या त्रिसुत्रीवर आधारित शिवसृष्टी येथे मांडण्यात आलेले दालन अत्यंत प्रेरणादायी असून महाराष्टातील व देशातील प्रत्येक विद्यार्थ्यांनी या शिवसृष्टीला प्रेरणा आणि अभ्यासाचे केंद्र म्हणून भेट द्यावी, असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिवसृष्टीच्या दुसऱ्या टप्प्याचे लोकार्पण प्रसंगी केले. तसेच शिवसृष्टीच्या पुढील टप्प्याचं काम अधिक …
Read More »राज्यात डान्स बार पुन्हा सुरू होणार; कायद्यात दुरूस्ती करण्याची चर्चा आमदार रोहित पाटील यांचा इशारा तर आम्ही रस्त्यावर उतरून निषेध करू
राज्याच्या तिजोरीवरील पडणारा आर्थिक ताण कमी करण्यासाठी ज्यांच्या खांद्यावरून राज्य सरकारने आर्थिक स्थिती सुधारली त्या तळीरामांसाठी राज्यातील दारूवरील काही करात कपात करण्याचा निर्णय मध्यंतरी राज्य सरकारने घेतला. तरही वाईनशॉप मध्ये मिळणाऱ्या दारूच्या तुलनेत बीअर बार आणि परमीट रूम मध्ये मिळणारी दारू महागच आहे. तरीही दारूच्या विक्रीतून मोठ्या प्रमाणावर महसूल राज्य …
Read More »येत्या २८ फेब्रुवारीला रवींद्र नाटयमंदिर आणि पु.ल.देशपांडे महाराष्ट्र कला अकादमीचे उद्घाटन सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड. आशिष शेलार यांचे मुंबईकरांना आमंत्रण
मुंबईच्या मध्यवर्ती भागी असलेले रवींद्र नाट्यमंदिर आणि पु.ल.देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी पुन्हा नव्याने २८ फेब्रुवारी २०२५ पासून नाट्यरसिकांच्या सेवेत दाखल होत आहे. या संकुलांचे उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, सार्वजनिक बांधकाम शिवेंद्रराजे भोसले, कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता मंत्री मंगलप्रभात लोढा, खासदार अनिल देसाई, आमदार महेश सावंत आदी मान्यवरांच्या हस्ते २८ फेब्रुवारी २०२५ …
Read More »राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत सहाव्या राज्य वित्त आयोगाची स्थापना करण्यास मान्यता आयोगाच्या अध्यक्ष आणि सदस्यांच्या नावाची शिफारस राज्यपालांना करणार
सहावा राज्य वित्त आयोग स्थापन करण्यास आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत आज मान्यता देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते. हा आयोग १ एप्रिल २०२६ ते ३१ मार्च २०३१ या पाच वर्षांच्या कालावधीसाठी शिफारशी करेल. या शिफारशींबाबत अहवाल सादर करण्यास या आयोगाला ३१ डिसेंबर २०२५ पर्यंतची मुदत असेल. आयोगाचे अध्यक्ष …
Read More »राज्य अंमली पदार्थ विरोधी टास्क फोर्स ; ३६४ पदांना, त्यासाठीच्या खर्चास मान्यता राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय
राज्यात अंमली पदार्थ विरोधी टास्क फोर्स स्थापन करण्यास तसेच त्याकरिताच्या ३४६ पदांना व त्यासाठीच्या खर्चास आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते. राज्यात अंमली पदार्थ विरोधी टास्क फोर्स स्थापन करण्यासाठी 31 ऑगस्ट २०२३ रोजीच्या शासन निर्णयानुसार मंजुरी देण्यात आली आहे. या फोर्ससाठी आवश्यक असणारे ३४६ पदांच्या …
Read More »सुप्रिया सुळे यांचा निर्धार, आता मुख्यमंत्र्यांसमोर पदर पसरवून न्याय मागणार हा लढा मी लढणार, माझा शब्द; ग्रामस्थांना आश्वासन, देशमुख आणि मुंडे कुटुंबीयांची सांत्वन भेंट
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या राष्ट्रीय कार्याध्यक्षा खासदार सुप्रिया सुळे यांनी आज मस्साजोग येथे दिवंगत सरपंच संतोष देशमुख आणि परळी येथील दिवंगत महादेव मुंडे यांच्या कुटुंबियांची भेट घेत सांत्वन केले. यावेळी पक्षाचे ज्येष्ठ नेते तथा आमदार जितेंद्र आव्हाड, खासदार बजरंग सोनवणे आणि आमदार संदीप क्षीरसागर हे देखील उपस्थित होते. यावेळी …
Read More »पीएस, ओएसडीचे बँक खाते क्लिअर तरच पोस्टींग, अनेक मंत्री अद्यापही विना स्टाफच मुख्यमंत्री फडणवीस यांच्या नियमाने अजित पवार, एकनाथ शिंदे वगळता सर्वच मंत्री हैरान
राज्याच्या राजकारणात सत्तास्थानी विराजमान झालेल्या आणि मंत्री पदाचे नाव जाहिर झाल्यापासून संबधित मंत्र्यांकडे पीएस आणि ओएसडी पदावर वर्णी लागावी या साठी अनेक अधिकाऱ्यांचे लॉबिंग सुरु होते. पुढे त्या संबधित पीएस आणि ओएसडीच्या माध्यमातून त्या संबधित मंत्री आणि विभागात काय चालते याची वंदता सर्वतोमुखी आहे. मात्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री …
Read More »
Marathi e-Batmya