Tag Archives: नसीम खान

मुंबई उच्च न्यायालयाचे आदेश, चांदिवली विधानसभा निवडणुकीतील ईव्हीएमची तपासणी करा ईव्हीएमची (EVMs) तपासणी आणि छाननी करण्याचा आदेश ऐतिहासिक, १६ आणि १७ एप्रिलला मुंबईत (diagnostic check) तपासणी होणार – नसीम खान

भारताच्या निवडणूक इतिहासात पहिल्यांदाच, मुंबई उच्च न्यायालयाने ईव्हीएमची (EVMs) तपासणी आणि छाननी करण्यास परवानगी दिली आहे. न्यायमूर्ती सोमशेखर सुंदरेसन यांनी हा आदेश दिला आहे. या प्रकरणातील याचिकाकर्ते हे काँग्रेस कार्यसमितीचे सदस्य आणि माजी मंत्री नसीम खान आहेत तर प्रतिवादी दिलीप लांडे आहेत. २०२४ च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत, शिंदेसेनेचे उमेदवार दिलीप लांडे यांनी, मुंबई उपनगर …

Read More »

नसीम खान यांचा आरोप, अल्पसंख्याक समाजाला विकासापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न भाजपा सरकार अल्पसंख्याक विरोधी, ५ टक्के आरक्षण रद्द

राज्यातील भाजपा महायुती सरकारने मुस्लीम समाजाला देण्यात आलेले ५ टक्के शैक्षणिक व नोकरीतील आरक्षण रद्द करण्याचा घेतलेला निर्णय अत्यंत चुकीचा व अल्पसंख्याक समाजावर अन्याय करणारा आहे. आरक्षण रद्द करुन भाजपा सरकारने अल्पसंख्याक समाजाला विकासाच्या प्रवाहात येण्यापासून रोखण्याचे पाप केले असून भाजपा सरकार मागासवर्गीय व अल्पसंख्याक समाजाच्या विरोधी आहे, असे माजी मंत्री …

Read More »

पुण्याचे माजी महापौर व राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांचा काँग्रेस पक्षात प्रवेश लोक उगवत्या सुर्याला नमस्कार करतात पण जगताप यांनी वैचारिक लढ्यासाठी काँग्रेस पक्षात प्रवेश केला: हर्षवर्धन सपकाळ

पुण्याचे माजी महापौर व राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी आज महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या उपस्थितीत काँग्रेस पक्षात प्रवेश केला. यावेळी त्यांच्यासोबत पुण्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अनेक पदाधिकाऱ्यानीही काँग्रेस पक्षात प्रवेश केला. प्रशांत जगताप यांना अनेक पक्षांचे आमंत्रण असतानाही त्यांनी काँग्रेस पक्षात प्रवेश करणे पसंद केले. …

Read More »

हर्षवर्धन सपकाळ यांचा आरोप, राज्यात कायदा सुव्यवस्थेचा बोजवारा, राज्यात भ्रष्टाचार बोकाळला स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी टिळक भवन येथे आढावा बैठक संपन्न

राज्यात नगरपालिकांच्या निवडणुका पार पडल्या असून आता महानगरपालिकांच्या निवडणुका होत आहेत. काँग्रेस पक्षाने निवणुकीसाठी सर्व तयारी केली आहे. स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका या कार्यकर्त्यांच्या निवडणुका असतात, या निवडणुकीत इंडिया आघाडीच्या घटक पक्षांशी चर्चा सुरु असून जेथे गरज असेल तेथे आघाडी करण्याचा निर्णय स्थानिक नेतृत्व घेईल, असे अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे …

Read More »

रमेश चेन्नीथला यांचा आरोप, भाजपा, रा. स्व. संघाचे धर्माच्या नावावर विष पसरविण्याचे काम जातीनिहाय जनगणनेमुळे मराठा आरक्षणाचा प्रश्न सुटेल: हर्षवर्धन सपकाळ

माजी पंतप्रधान राजीव गांधी यांनी सर्वात प्रथम देशात सद्भावना यात्रेची सुरुवात केली. हर्षवर्धन सपकाळ यांनी महाराष्ट्रात सद्भावना यात्रा सुरु केली आणि पहिल्याच यात्रेच्या घोषणेनंतर एका मंत्र्याला राजीनामा द्यावा लागला. भाजपा व राष्ट्रीय स्वयंसेवक संघ जाती धर्माच्या नावावर देशात विष पसरवून दुही माजवण्याचे काम करत आहे. म्हणून सद्भावना वाढीस लागावी यासाठी …

Read More »

पवईतील जयभीम नगरातील मागासवर्गीयांची घरे तोडणा-या अधिकारी व बिल्डरवर गुन्हे दाखल माजी मंत्री नसीम खान यांनी केलेल्या पाठपुराव्याला यश, ६५० कुटुंबियांना न्याय मिळणार

पवईच्या जयभीम नगरमधील जवळपास ६५० मागासवर्गीय परिवारांवर ६ जून २०२४ रोजी मुंबई महानगरपालिकेचे अधिकारी, पोलीस, बिल्डर निरंजन हिरानंदानी व स्थानिक आमदार यांनी संगनमताने बेकायदेशीर कारवाई केली. पोलिसांनी घरात घुसून लहान मुले, गरोदर महिला, ज्येष्ठ नागरिक यांना मारहाण करत जबरदस्तीने घरांवर बुलडोझर चालवून त्यांना बेघर केले. याप्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशाने …

Read More »

अमित शाह व भाजपा विरुद्ध मुंबईत बहुजन समाजाचा निषेध मोर्चा गृहमंत्र्यांनी जाहीर माफी मागून त्वरित राजीनामा द्यावा .. नसीम खान

उत्तर मध्य मुंबई जिल्ह्यातील चांदिवली मतदार संघात माजी मंत्री व प्रदेश कॉँग्रेस कार्याध्यक्ष आरिफ नसीम खान यांच्या नेतृत्वात सकल बहुजन समाजाच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या बद्दल लोकसभेत अपमान करणारे वक्तव करणारे भारताचे गृहमंत्री अमित शाह यांच्या विरुद्ध भव्य निषेध मोर्चा काढण्यात आला. मुंबईतील साकीनाका येथील पेनुनसुला हॉटेल पासून …

Read More »

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या विरोधात आचारसंहिता भंग प्रकरणी गुन्हा दाखल करा मविआचे चांदिवलीचे उमेदवार नसीन खान यांच्या मुख्य पोलींग एजंटची निवडणूक आयोगाकडे तक्रार

विधानसभा निवडणुकीसाठी मतदान सुरु असताना राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी चांदिवली मतदारसंघात अनधिकृतपणे भेट देऊन शिवसेनेचे उमेदवार दिलीप लांडे यांच्यासाठी रोड शो करून मतदान करण्याचे आवाहन केले. मुख्यमंत्री शिंदे यांची हि कृती आदर्श आचारसंहितेचा भंग करणारी असून मुख्यमंत्री शिंदे व दिलीप लांडेंविरोधात भारतीय न्याय संहिता कलम १७१ व लोकप्रतिनिधी कायदा …

Read More »

काँग्रेसची मागणी, राज्यात १८सप्टेंबर रोजी ईद-ए-मिलादची सुट्टी जाहीर करा नसीम खान यांची मुख्यमंत्र्यांना लेखी पत्राद्वारे मागणी

१७ सप्टेंबर रोजी राज्यातील गणेश विसर्जन आहे. त्या दिवशी राज्य सरकारकडून शासकिय सुट्टी जाहिर करण्यात आलेली आहे. तर १६ सप्टेंबर रोजी महमंद पैगंबर यांचा जन्म दिवस आहे. त्यामुळे १६ सप्टेंबर रोजीची महमंद पैगंबर यांच्या जयंती निमित्त जाहिर करण्यात आलेली सुट्टी १८ सप्टेंबर रोजी जाहिर करावी अशी मागणी माजी मंत्री व …

Read More »

काँग्रेस नेते नसीम खान यांची नाराजी दूर म्हणाले, वर्षा गायकवाड माझ्या लहान बहिण

लोकसभा निवडणूकीच्या उमेदवारीवरून काहीसे नाराज झालेल्या काँग्रेसचे माजी आमदार नसीम खान यांनी काँग्रेसच्या प्रदेश कार्याध्यक्ष पदाचा राजीनामा देत उत्तर-मध्य लोकसभा मतदारसंघातील पक्षाच्या उमेदवार वर्षा गायकवाड यांच्या प्रचारापासून दूर राहण्याचा निर्णय घेतला. मात्र आज अखेर माजी आमदार नसीम खान यांनी आपली नाराजी दूर झाल्याचे सांगत पुन्हा एकदा काँग्रेस पक्षात सक्रिय होत …

Read More »