Breaking News

Tag Archives: निवडणूक आयोग

जम्मू आणि काश्मीरमध्ये विधानसभेच्या २४ जागांसाठी ५८ टक्के मतदान निवडणूक आयोगाने दिली माहिती

जम्मू आणि काश्मीर विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यासाठी बुधवारी ९० पैकी २४ विधानसभा मतदारसंघांसाठी मतदान सुरू असल्याने सायंकाळी ५ वाजेपर्यंत ५८.१९ टक्के मतदान झाले. २३ लाखांहून अधिक मतदार ९० अपक्षांसह २१९ उमेदवारांचे भवितव्य ठरवणार आहेत. मतदारांना मोठ्या संख्येने मतदान करण्याचे आवाहन करून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी X (पूर्वीचे ट्विटर) वर लिहिले …

Read More »

मतदार यादी विशेष संक्षिप्त पुनरिक्षणाचा सुधारित कार्यक्रम निवडणूक आयोगातर्फे जाहीर आगामी विधानसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाचा कार्यक्रम

महाराष्ट्र विधानसभेच्या आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भारत निवडणूक आयोगाने तयारी सुरू केली आहे. त्यासाठी राज्यातील मतदार याद्या अद्ययावतीकरणाचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. भारत निवडणूक आयोगाने १ जुलै २०२४ रोजीच्या अर्हता दिनांकाच्या आधारे मतदार याद्यांचा विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रमाचे (दुसरा) वेळापत्रक निश्चित केले होते. त्यात भारत निवडणूक आयोगाने बदल केला आहे. त्यानुसार …

Read More »

नारायण राणे यांचा निवडणूकीतील विजय भ्रष्ट मार्गाने, निवडणूक आयोगाला नोटीस लोकसभा निवडणूकीत भ्रष्ट मार्गाचा अवलंब केल्याची तक्रार

रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातून नारायण तातू राणे यांनी भ्रष्ट मार्गांचा वापर करत लोकसभा निवडणुकीत विजय मिळवलेला आहे. त्यामुळे नारायण राणे यांची निवड रद्द करावी व त्यांच्यावर ५ वर्ष निवडणुक लढविण्यापासून आणि मतदान करण्यापासून बंदी लादण्यात घालण्यात यावी यासाठी कायदेशीर नोटिस ठाकरे सेनेचे उमेदवार विनायक राऊत यांनी निवडणुक आयोगाला अ‍ॅड. असीम …

Read More »

आदर्श आचारसंहिता असतानाही नवी मुंबई महानगरपालिकेत ५० कोटींच्या कामाचे वाटप वादग्रस्त संजय देसाई यांनी सेवानिवृत्त आधी केला पराक्रम

संपूर्ण महाराष्ट्रात निवडणूकीच्या अनुषंगाने आदर्श आचारसंहिता लागू असुनही नवी मुंबई महानगरपालिकेचे प्रभारी शहर अभियंता संजय देसाई यांनी ५० कोटींची निविदा उघडण्याचे धाडस दाखविले. नवी मुंबई महानगरपालिकेत ५० कोटींच्या कामाचे वाटप करताना आदर्श आचारसंहितेचे उल्लंघन झाल्याची तक्रार आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांनी निवडणूक आयोगाकडे करत निविदा रद्द करत गुन्हा दाखल करण्याची …

Read More »

उच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश तथा भाजपा उमेदवार अभिजित गंगोपाध्याय २४ तासासाठी बॅन

भारतीय निवडणूक आयोगाने कोलकाता उच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश आणि पश्चिम बंगालमधील तमलूकमधील भाजपाचे उमेदवार अभिजित गंगोपाध्याय यांनी तृणमूल प्रमुख आणि मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या विरोधात केलेल्या टिप्पणीबद्दल त्यांना फटकारले आणि त्यांना संध्याकाळी आज ५ वाजल्यापासून २४ तास प्रचार करण्यास मनाई केली. दरम्यान, काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी मंगळवारी ठामपणे सांगितले …

Read More »

अतुल लोंढे यांची पत्राद्वारे मागणी, …आचार संहितेचे उल्लंघन केल्याने कारवाई करा

लोकसभा निवडणुकीचा कार्यक्रम १६ मार्च रोजी जाहीर झाल्याने त्यादिवसापासूनच आदर्श आचासंहिता लागू झालेली आहे. आचारसंहिता लागू झाल्यानंतर सरकारी धोरणे व प्रकल्प जाहीर करणे हे मतदारांवर प्रभाव टाकणारे असून त्यातून सत्ताधारी पक्षाला लाभ मिळू शकतो असे असताना महाराष्ट्र राज्य पायाभूत सुविधा विकास महामंडळाने रस्त्यांसाठी बोली लावली आहे. हे आदर्श आचार संहितेचे …

Read More »

लोकसभा निवडणूकीच्या दुसऱ्या टप्प्यातील आठ मतदारसंघात ६२.७१ टक्के मतदान

मागील काही दिवसापासून वातावरणातील उष्मा वाढत आहे. तर दुसऱ्याबाजूला लोकसभा निवडणूकीच्या प्रचारामुळेही राजकिय वातावरण चांगलेच तापत आहे. त्यामुळे लोकसभा उमेदवारासाठी मतदानाचा दिवस असूनही आपले राष्ट्रीय कर्तव्य अर्थात मतदार राजा सकाळ आणि संध्याकाळच्या कमी उन्हाच्या कालावधीतच घराबाहेर पडत आहे. यापार्श्वभूमीवर काल दुपारी ३ वाजेपर्यंत महाराष्ट्रातील दुसऱ्या टप्प्यातील आठ लोकसभा मतदारसंघात जवळपास …

Read More »

Supreme Court चा बॅलट पेपरला नकार मात्र ईव्हीएम-व्हीव्हीपॅटसाठी दिले हे आदेश

देशात लोकसभा निवडणूका ७ टप्प्यात होत आहेत. आतापर्यंत देशात चार टप्प्यात किंवा फार तर दोन टप्प्यात निवडणूका पार पाडल्या जात होत्या. मात्र यंदा पहिल्यांदाज देशातील लोकसभा निवडणूका सात टप्प्यात पार पडत आहेत. यापार्श्वभूमीवर ईव्हीएम मशिन्सच्या वापराबाबत अॅड प्रशांत भूषण यांच्यासह काही सामाजिक कार्यकर्त्यांनी संशय व्यक्त करत ईव्हीएम मशिन्सऐवजी लोकसभा निवडणूकीत …

Read More »

मुंबई उपनगर जिल्ह्यातील चार मतदारसंघात शुक्रवारपासून उमेदवारी अर्ज

लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी मुंबई उपनगर जिल्ह्यातील २६- मुंबई उत्तर, २७- मुंबई उत्तर पश्चिम, २८- मुंबई उत्तर पूर्व, २९- मुंबई उत्तर मध्य या चार मतदारसंघात शुक्रवार दि. २६ एप्रिल २०२४ पासून उमेदवारी अर्ज भरण्यास सुरुवात होईल. त्यासाठीची तयारी संबंधित चारही लोकसभा मतदारसंघांचे निवडणूक निर्णय अधिकारी आणि जिल्हा निवडणूक यंत्रणेने केली असल्याची …

Read More »

पहिल्यांदाच राज्यस्तरीय आणि जिल्हानिहाय सदिच्छादूत करणार मतदारांना आवाहन

यंदाच्या लोकसभा निवडणुकीत मतदानाचा टक्का वाढावा, मतदान हक्काचे महत्व सांगण्यासाठी निवडणूक आयोगाच्या वतीने मतदारजागृतीचे विविध उपक्रम राबविले जात आहेत. मतदार जागृतीच्या या उपक्रमांना आता कला, क्रीडा, साहित्य आणि सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांची ‘सदिच्छादूत’ म्हणून साथ लाभली आहे. पाहिल्यांदाच राज्यस्तरीय आणि जिल्हानिहाय सदिच्छादूत मतदारांना मतदानाचे महत्व समजून देण्यासाठी आवाहन करणार आहेत. समाज …

Read More »