Tag Archives: प्रवक्ते

पीटर नवारो यांची टीका परराष्ट्र खात्याने फेटाळून लावली परराष्ट्र खात्याचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी पत्रकार परिषदेत दिले प्रत्युत्तर

परराष्ट्र मंत्रालयाने (MEA) शुक्रवारी व्हाईट हाऊसचे व्यापार सल्लागार पीटर नवारो यांच्या अलीकडील विधानांना जोरदारपणे नकार दिला आणि त्यांना “चुकीचे” आणि “दिशाभूल करणारे” म्हटले. MEA चे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी पत्रकार परिषदेत बोलताना म्हटले की, “आम्ही पीटर नवारो यांनी केलेली चुकीची आणि दिशाभूल करणारी विधाने पाहिली आहेत आणि अर्थातच, आम्ही ती …

Read More »

अतुल लोंढे यांची टीका, उपमुख्यमंत्री अजित पवारांची टगेगिरी कायम बेकायदेशीर काम रोखणाऱ्या महिला आयपीएस अधिकाऱ्याला अजित पवार यांची धमकी धमकी

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अंजली कृष्णा या महिला आयपीएस अधिकाऱ्याला फोनवरून दिलेली धमकी अत्यंत निषेधार्ह आहे. प्रामाणिकपणे काम करणा-या अधिकाऱ्यांना फोनवरून धमकी देऊन अवैध धंद्याविरोधातील कारवाई थांबवा म्हणून दमदाटी करणे हे चुकीचे असून अजित पवारांची ही टगेगिरी महाराष्ट्राला तसेच अजित पवारांसारख्या ज्येष्ठ मंत्र्याला शोभणारी नाही, अशी टीका प्रदेश काँग्रेसचे प्रवक्ते …

Read More »

काँग्रेसची टीका, फडणवीसांची सपकाळांविषयी ‘नया है वह’ प्रतिक्रीया हिंदी सक्ती मानसिकतेतून’ ‘काँग्रेस अध्यक्षांना’, गुन्हेगारी आरोपांबाबत अँफीडेव्हीट देण्याची गरज कधी भासली नाही..!!

मुख्यमंत्री फडवीसांवर हिंदी’चा प्रभाव किती खोलवर पोहेचलाय हे काँग्रेस अध्यक्ष हर्षवर्धनजी सपकाळांचे आरोपां प्रती, पत्रकारांनी त्यांना विचारलेल्या प्रश्नांवर, फडणवीसांनी अनाहुत पणे दिलेली.. ‘नया है वह’ ची प्रतिक्रिया” हिंदी सक्तीच्या मानसिकतेतुन दिसुन आली व मोदी-शहांच्या दमनशाही वृत्तीचा मुख्यमंत्र्यांना ‘वाण नाही पण गुण लागला’हे स्पष्ट झाल्याचे टिकात्मक प्रतिपादन काँग्रेस राज्य प्रवक्ते गोपाळ तिवारी यांनी  …

Read More »

काँग्रेस नेते राहुल गांधी यांचे परराष्ट्र मंत्री डॉ एस जयशंकर यांना पुन्हा सवाल एक्सवरून विचारला सवाल, तर पवन खेरा यांचा आरोप त्यांच्यामुळे पाकिस्तानी पळून जाण्यात मदत झाली

ज्या दिवशी परराष्ट्र सचिव विक्रम मिस्री यांनी काँग्रेसचे शशी थरूर यांच्या अध्यक्षतेखालील परराष्ट्र व्यवहारावरील संसदीय स्थायी समितीला भारत आणि पाकिस्तानमधील परराष्ट्र धोरणातील घडामोडींबद्दल माहिती दिली, त्याच दिवशी काँग्रेसने परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांच्यावर दुटप्पीपणाची टीका केली. काँग्रेसने केलेल्या नव्या राजकिय हल्ल्यात, राहुल गांधी यांनी पुन्हा एकदा परराष्ट्र मंत्री डॉ एस …

Read More »

अतुल लोंढे यांचा पलटवार,… आधी भाजपाच्या नेत्यांनी पंतप्रधान मोदींचे ट्विट नीट पहावे छत्रपती शिवाजी महाराजांच्या अवमानाबद्दल माफी तर भाजपानेच मागावी

शिवजयंतीच्या निमित्ताने राहुल गांधी यांनी केलेल्या ट्विटवरून भाजपाचे नेते जो आकांडतांडव करत आहेत त्याआधी त्यांनी त्यांचे सर्वोच्च नेते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे ट्वीट नीट पहावे आणि नंतर बोलावे. छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान जर कोणी केला असेल तर भाजपानेच वारंवार केला असून त्यांनीच माफी मागावी, अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे …

Read More »

शरद पवार गट म्हणतो, माढा मतदारसंघात अजित पवारांची राष्ट्रवादी फुटणार

माढा लोकसभा मतदारसंघाच्या जागेवरनं अजित पवारांची राष्ट्रवादी फुटणार असा दावा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे मुख्य प्रवक्ते महेश तपासे यांनी केला. शरद पवार गटाचे प्रवक्ते महेश तपासे म्हणाले की, माढ्याचे खासदार रणजीतसिंह नाईक निंबाळकर यांच्या वाहनावर गाजरांचा वर्षाव त्यांच्याच मतदारांनी केल्याचे चित्र महाराष्ट्राने पाहिलं. त्यातच फलटणचे रामराजे नाईक निंबाळकर …

Read More »

अतुल लोंढे यांचा सवाल,… निधी देण्यासाठी पैसा काय सरकारच्या बापाचा आहे का?

भारतीय जनता पक्षाचे सरकार विरोधकांशी सूडबुद्धीने वागते हे काही नवे नाही, विरोधी पक्षांची सर्वबाजूंनी कोंडी करण्याचा भाजपा सरकार सातत्याने प्रयत्न करत असते. निधी वाटपात भेदभाव करण्याचे प्रकारही उघड झालेले आहेत. मुंबईतील केवळ सत्ताधारी पक्षांच्याच आमदारांना ५०० कोटी रुपयांची खैरात करणे व विरोधी पक्षांच्या एकाही आमदाराला एक फुटकी कवडीही न देणे …

Read More »

अतुल लोंढे यांचा सवाल, मनोज जरांगेंचे उपोषण सोडण्यास देवेंद्र फडणवीस का गेले नाहीत? एकनाथ शिंदेंनी जरांगेंना दिलेल्या शब्दाला फडणवीसांचा पाठिंबा आहे का?

मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी अंतरावली सराटी गावात उपोषणास बसलेल्या मनोज जरांगे यांनी १७ व्या दिवशी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शब्दावर विश्वास ठेवून उपोषण सोडले हे चांगले झाले. मुख्यमंत्री स्वतः गेले म्हणजे सरकार जरांगे यांना भेटले असाच त्याचा अर्थ होतो पण तिघाडी सरकारमधील सर्वात मोठा पक्ष असलेल्या भारतीय जनता पक्षाचे …

Read More »